वेलकम 2020💃💃

Written by

“चलते चलते मेरे ये गीत याद रखना…….
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना….
हे गाणं गुणगुणत आपण 31stसाजरा करण्याचा तयारीला लागतो.जसजसा सूर्य माळवायला लागतो,आपल्या मनाची हुरहूर वाढत जाते.
अंगाला झोंबणाऱ्या बोचऱ्या थंडीतही आपला उत्साह द्विगुणित असतो.
अर्थातच भूतकाळातील सुख-दुःखाच्या हिंदोळ्यावर भविष्यकालच्या स्वागतासाठी ,वर्तमानकाळात आपण सज्ज असावे असाच हेतू…..
नववर्ष !
वाईटावर चांगल्या विचारांनी मात करून आनंदाची वाट दाखवणारा क्षण!
अस म्हणतात,
शेवट गोड तर सर्वच गोड…..
याच धर्तीवर वाटतं,
सुरवात चांगली, तर पुढचं सर्वच चांगलं.कुठल्याही गोष्टीची सुरवातच जर चांगली झाली तर आपल्याला आत्मविश्वासाची नवी वाट अगदी सहजतेने मिळते.आणि मनापासून आपण त्याचा स्वीकार सुद्धा सहजतेने करतो. जाणार प्रत्येक वर्ष काहीतरी देऊनच जातो, तसच येणारही काहीतरी घेऊनच येतं.
विविध संकल्पाचा हा क्षण…
मला नेहमी हा प्रश्न पडतो….
प्रत्येक वर्षाचे 365 दिवस,30 दिवसांचा महिना,12 महिन्यांचे वर्ष, 12 तासाच दिवस…. हे सर्व आपल्या सोयीसाठीच …तरीपण वर्ष संपल रे संपल की आपण मागल्या वर्षी काहीतरी हरवलंय, किंवा हे करायचं राहून गेलं, ते राहून गेलं….
पशचाताप करत परत नवीन वर्षात नवीन संकल्प….
खर तर अख्या आयुश्यात येत नसतो कधीही उद्या…
भूतकाळावर चालवावी
विसमरणाची गदा….
वर्तमानातच आनंदाने जगावे सदा….
पण “निरोप” हा आवश्यकच…
निरोप या शब्दातच असंख्य भावना दडलेल्या आहेत…
म्हणजेच गेल्या वर्षाला निरोप द्यायचा… म्हटल्यानंतर थोडं का होईना मन गलबलून येतच. कितीतरी मागील प्रसंग डोळ्यासमोर येतात….पण याशिवाय पुढचा प्रवास अशक्यच… कारण पुन्हा नवीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी हा निरोप आवश्यकच म्हणावा लागेल…
पण कोणी काहीही म्हणो….
मला मात्र नवीन वर्ष आलं की खूप आनंद होतो….
कारण…..
नवीन नवीन वर्षात नेहमीच
येतो माझा वाढदिवस….
जर नवीन वर्ष आलेच नसते
तर माझा वाढदिवस सुद्धा झालाच नसता….😊
मागचे झाले, गेले विसरून नव्या उमेदीने जगुया….
नव्या वर्षात मिळतील
नव्या नव्या मित्र- मैत्रिणी…
जुन्याना मात्र नाही विसरायचं
हं….😊
शेवटी म्हणावंसं वाटतं.
बहरत यावी नववर्षाची पाऊलवाट,अमृतमय आनंद फळांनी….. यासारख्या असंख्य शब्दांच्या संगतीने नवीन वर्षात आणीन आव्हाने पेलण्यासाठी आपण सर्वच आपआपल्या परीने सज्ज आहोत.
यासाठीच तर… नवीन वर्षाची सुरवातच जर चांगली, तर नक्कीच पुढचं सर्व चांगलंच….👍
चला तर मित्र-मैत्रिणींनो ही नवं-नाविन्याची, नवं-चैतन्याची, नवं-आत्मविश्वासाची पाऊलवाट आपणा सर्वांस समृद्धतेच्या शिखराकडे घेऊन जावी हीच मनापासून हार्दिक शुभेच्छा💐💐

शेवटी कुठंतरी वाचलेल्या दोन ओळीं आठवतात
नववर्षा तू घेऊन ये
सुख समृद्धी अन आरोग्याची वाट
कर दिंनदुबळ्यांचा नायनाट.
गुडबाय 2019
वेलकम2020

©️®️लता राठी
share करा मात्र माझ्या नावासह, ही नम्र विनंती🙏

Article Categories:
इतर

Comments are closed.