वेळ आहे आत्ताच समजून घ्या….

Written by

वेळ आहे आत्ताच समजून घ्या….

सगळी कामं आटोपून नेहाने स्वतःला बेडवर झोकून दिले…. तिला फार बरे वाटले, सकाळी पाच वाजल्यापासून तिची दगदग सुरू होती… अजून दिपक आला नव्हता, त्याला आजही यायला उशिर होणार होता…. पडल्या पडल्या कधी झोप लागली कळलेच नाही…. 11.30 वाजता बेल वाजली, दिपक आला होता….. ती उठली त्याच्यासाठी जेवन गरम करू लागली…. त्याला जेवन वाढून ती परत झोपली….. हल्ली ओफिसमध्ये कामाचा व्याप खूप वाढला होता…. घर संभाळून नोकरी करत होती ती… संसार छान रमला होता त्यांचा…. सासूसासरे, दोन मुले, नवरा आणि सासरी पटत नाही म्हणून घर सोडून आलेली त्याची बहीण व बहिणीची सात वर्षांची मुलगी…. अशा सगळ्यांना धरुन छान संसार फुलवला होता तिने…. कधी राग नाही, रुसवेफुगवे नाही आणि कसलीही अपेक्षा नाही….

जेवन झाल्यावर दिपकनेही स्वतःला अंथरुणात झोकून दिले….. ती गार झोपली होती, त्याने तिला जवळ घेतलं आणि प्रणयाच्या दिशेने वाट करू लागला… तस नेहाने नकार दिला…. आज नको ना रे…. माझा मूड नाहीए ….. तसा दिपक रागाने उठून बसला…..

तो : तुझ हल्ली रोजचच झालय….

ती : नाही रे, पण अंगात त्राणच नाहीए….

तो : रोज तेच तेच कारण नको देउस…. तु मला जवळच करत नाहीएस…. आता झोपताना पण असच आणि सकाळी पण असच….

ती : तस नाही रे ….. अर्धवट झोप उडाली की मला नाही सहन होत… खूप अशक्तपणा जाणवतो….. सकाळी पाच वाजल्यापासून राबतेय…. गेले दहा दिवस झोप नाही झाली रे नीट… please मला झोपू देत…..

तो : तुझा माझ्यातला interest संपलाय…. बोल ना दुसरा कोणी आवडतो का???

ती : गप रे ….. तुला कळतय का??? तु काय बोलतोय ते???

तो : हे आता नेहमीच झालय….

दिपक उठतो आणि बाहेर गॅलरीत जाऊन बसतो नी तिथेच झोपून जातो…..

सकाळी कोणीच कोणाशी बोलत नाही… दोघेही आपापल्या कामाला निघून जातात…..

खर म्हणजे दिपकची बहिण आल्यापासून सासूबाईंनी कामातून पूर्णपणे हात काढून घेतला… नुसत्या दोघी मायलेकी गप्पा मारत बसायच्या…. नेहा सगळ करून आॅफिसला जायची, आल्यावर पण तिच सगळ करायची, तिन्ही मुलांच बघायची, त्यांनी केलेला पसारा हा तिच्या कामात भर घालत होता…. आणि खाण्यामध्ये प्रत्येकाची वेगळी फर्माईश….. पार थकून जात होती…. रात्री दिपकच उशिरा येण मग परत त्याच्यासाठी उठा, त्याच खानपिण बघा. …बापरे…. .

दोघांचाही रुसवा सुरूच होता … दिपकला समजावून पण तो ऐकत नव्हता…. अस आठवडाभर सुरू होत, एका रात्री तर तिला न जुमानता त्याने आपली शरीराची भूक शमवली…. ती उठून रडायलाच लागली….. तिच्या रडण्याने दिपकला खूप राग आला आणि त्याने तिच्या कानाखाली मारली….. आणि पाठ करून झोपून गेला….

नेहा फक्त त्याच्या पाठमोर्‍या चेहर्‍याला बघत बसली…. हाच का तो दिपक ज्याने आपल्याशी प्रेम विवाह केला…. जो आपल्यावर खूप प्रेम करायचा…. घरच्यांना त्यानेच तर मनवल होत लग्नासाठी … पदोपदी आपल्यासाठी घरच्यांशी भांडला….
मी खरच खूप थकलेय… त्याच्या कॅपेसिटीची नाही राहिले मी….. सतत आजारी पडत चालेय… दिपक माझ्यावर आता संशय घ्यायला लागलाय…. त्याचा विश्वास संपलाय …..असे एकना एक विचार तिच्या डोक्यात घोळत होते…. त्याच विचारात तिने डोकेदुखीची गोळी खाल्ली, लगेच अंगदुखीची पण गोळी खाल्ली अस करत तिने विचाराच्या तंद्रीत सात ते आठ गोळ्या पटापट खाल्लया…. आणि जाउन दिपकला बिलगून म्हणाली सॉरी…..

दिपक पण आता नरमला, म्हणाला ” I am sorry. … ” मी हात उचलायला नको होता…. कामाचा खूप व्याप वाढलाय गं, एकही गोष्ट मनासारखी होत नाहीये ग, सतत नकार येतय सगळीकडून, रात्री हलक झाल की झोप छान लागते मला….. पण तुही नकार दिल्याने अजून चीड आली की निदान ही ईच्छा तरी पूर्ण होईल…. तर ते पण नाही …..”
I am sorry ” मी अस वागायला नको होत, please मला समजून घे…. तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवत म्हणाला….. तिही त्याला बिलगून झोपली…..

काही वेळाने तिला फार अस्वस्थ वाटू लागले, ती उठली जाउन उलटी करुन आली, शरीर पूर्ण घामाघूम झालं होतं आणि अचानक ती चक्कर येऊन टेबलपाशी पडली…. त्या आवाजाने दिपकला जाग आली, बघतो तर नेहा खाली पडली होती, तिच्या डोक्यातून रक्त वाहत होत…. तो पटकन उठून तिच्या जवळ गेला…. तिला उठवू लागला…. काही केल्या ती शुद्धीवर येत नव्हती…. त्याने सगळ्यांना उठवलं आणि गाडी काढुन तिला थेट हॉस्पिटलला घेऊन गेला….

रात्रीचे 3.30 वाजले होते….. तो डॉक्टरांच्या गयावया करू लागला…. डॉक्टरांनी सांगितले एका वेळेस अनेक गोळ्या घेतल्याने reaction झालय….. डॉक्टर ओळखीचे होते म्हणून पोलिसांना सांगितले नाही, नाहीतर आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला असता….. नेहा अजूनही बेशुद्धावस्थेत होती…. दिपक खूप रडायला लागला …. तिच्या बाजूला बसून तिचा हात हातात घेऊन तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पहात होता…..

पाच तासाने नेहा शुद्धीवर आली त्याने तिला कडकडून मिठी मारली आणि माफी मागितली….. नेहाने पण आपली चूक मान्य करत परत अस न करण्याच वचन दिलं….. नेहा बरी होऊन घरी आली…. दिपकने दोघांसाठी खास सात दिवसाची महाबळेश्वर टूर बुक केली आणि या थकाथकिच्या जिवनात स्वतःसाठी वेळ दिला….. आता दरवर्षी ते दोघे एकदा तरी outdoor picnic काढतात फक्त स्वतःसाठी…..

समाप्त

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि मला follow करायला विसरू नका.)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत