व्यसन सोडून लाखो कमवण्याची संधी…

Written by

नमस्कार मित्रांनो,
आज आपण अशी एक गोष्ट बघुया ती म्हटली तर खूप साधी आणि म्हटली तर खूप महत्वाची. आपण सहज उघड्या डोळ्याने आजूबाजूला बघितले तर असे लक्षात येते की व्यसनाधीनता वाढत चालली आहे. याचे अनेक कारणे आहेत जसे की हातामध्ये सहज उपलब्ध असणारा पैसा, व्यासानांचे चित्रपटाच्या माध्यमातून होणारे उदात्तीकरण इत्यादि.
व्यसनाधीनता आपल्याला शारीरिक दृष्ट्या हानिकारक तर आहेच पण त्याचे आर्थिक परिणाम ही खूप मोठे असतात.
उदाहरणादाखल आपण असे गृहीत धरू की रमेश नावाच्या एका तरुणाला सिगारेट पिण्याचे व्यसन आहे.

जर रमेश दिवसाला तीन ते चार वेळा जरी सिगारेट पित असेल तरी साधारणपणे त्याचा खर्च ३० ते ४० रुपये होतो. जर त्याने सिगारेट न पिता हे पैसे वाचवले आणि कुठल्याही चांगल्या mutual फंड च्या एसआयपी ल दर महा गुंतवले तर दीर्घकालीन दृष्टया किती फायदेशीर होऊ शकते ते आपण पाहू.
दरमहा गुंतवणूक १००० रुपये.
कालावधी ३० वर्षे
Mutuala फंड चे returns जर बघितले तर साधारणपणे १२ ते १८ % मिळतात. आपण १५% गृहीत धरू.
वरील बाबी लक्षात घेऊन हिशोब केला तर ३० वर्षामध्ये जमा होणारी रक्कम पाहून नक्कीच आश्चर्य होईल. ती रक्कम आहे ७० लाख रुपये. यात तुमची गुंतवलेले रक्कम आहे फक्त ३.६० लाख.

१५% रिटर्न काही प्रमाणात मार्केट नुसार कमी जास्त होऊ शकतो. असे असले तरी मिळणारा परतावा नक्कीच तुम्हाला व्यसन सोडायला विचार करायला भाग पडेल हीच अपेक्षा.
उदाहरण सिगारेट चे घेतले आहे हेच ईतर व्यासणाना पण लागू होते.
जर आपणाला mutual फंड मधील गुंतवणूक जोखमीचे वाटत असेल तर इतरही पर्याय जसे रिकरींग deposit, ppf, पोस्ट मधील गुंतवणूक इत्यादि. यांचे return थोडे कमी पण खात्रीशीर असतात साधारणपणे ७ ते ९ % पर्यंत.
तुम्ही स्वतः सुद्धा रिटर्न तपासू शकता. गूगल वर एसआयपी कॅल्क्युलेटर सर्च केले तर कॅल्क्युलेटर संबंधित अनेक लिंक मिळतील. कोणतीही वापरू शकता.
ह्या लेखामध्ये आपण फक्त जर व्यासन बंद करून invest केले तर मिळणारे फायदे बघितले. याशिवाय ही अनेक फायदे आहेत जसे इन्शुरनस चे premium व्यासानामुळे जास्त द्यावे लागतात. ते वाचू शकतात.
चला तर अशा करुया की हा लेख वाचून काही जणांचे तरी आयुष्यात बदल होतील.
टीप : मी नोंदणीकृत financial advisor नाहीये. हे माझे वयक्तिक मत आहे. कुठलाही गुंतवणूक करण्यासाठी आपण financial advisor चे मार्गदर्शन घेऊ शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत