शब्द❤️

Written by

शब्द!!
मग ते गोड की कडू हे महत्वाचं नाही,
किती बोललो हे पण महत्वाचं नाही,
कुठल्या भावनेनं बोललो त्यालाही काही महत्व नसतं,
शब्दांना धार असते म्हणतात!
🙂प्रेम हि असतंच कि शब्दात!😜
शब्दाने मन जुळतात,एकत्र येतात तेपण याच शब्दांमुळे!
शब्द तेच, मनाला लागले तर काट्यांप्रमाणे टोचतात. आवडले तर मन प्रसन्न करतात,शब्दांनी तेज येतं नात्यात…
हेच शब्द मनांना जवळ आणतात,एकत्र बांधून ठेवतात,
शब्दांना धार असते म्हणतात,शस्त्राप्रमाणे वापरले तर ओरखडे,घाव घालतात,धार भारी पडते प्रेमाच्या गोड शब्दांवर देखील…मग ते शब्द कितीही तुपात तळलेले असले आणि साखरेच्या पाकात घोळलेले असले तरी.
हेच शब्द नाते जपतात,आयुष्य घडवतात,व्यवहार शिकवतात.
हेच शब्द डिग्री बहाल करवतात रागिष्ट,गर्विष्ठ,हेकेखोर,प्रेमळ (हि सगळ्यांची आवडती डिग्री) , कधी कधी हेच शब्द तोंडघशी पडतात,मन दुखावतात,नाते लांबवतात.दुरावतात!
कितीही असलं तरी जीभ कधीतरी घसरते च,शब्द मात्र राहतात चवीला😜
पण अनुभव काही वेगळंच सांगतात!
फक्त आयुष्यात अनुभवांनी शिकवलय गप्प राहणं चांगलं असतं !शब्दांची भाषा आहे पण नेमकी व्याख्या नाही. कारण “शब्दांनी” बहुतेकदा माणसं दुरावतात असं
म्हणतात.मग ती माणसं जवळची असो किंवा लांबची!
खरं आहे ना!😊
तेच शब्द गोड बाहेर पडले तर सगळेच खुश नाही का?
शब्द वापरावे जपून आणि ठेवावे जपून!
आपण एकमेकांना या शब्दांद्वारे हा मस्त संदेश देऊया आपलेपणाने आणि तेवढ्याच आपुलकीने
“तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला”
©✍️पल्लवी पाटील

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.