शांतताप्रिय मी आणि गणपती बाप्पा

Written by

 

#गणपती बाप्पा आणि मी

मी तशी खूप शांतता प्रिय.
मला शांत वातावरण खुप आवडतं.
खूप आवाज, गोंगाट यात मला खूप गुदमरल्यासारखं होतं. सतत टीव्ही सुद्धा मला नकोसा वाटतो…..
जेव्हा मी एकटी असते, किंवा घर खूप शांत असतं, तीच माझा स्वतःचा आवडीचा वेळ……मी आणि माझी पुस्तक, पेन ,ब्रश,पेंसिल्स, कॅनव्हास बोर्ड हेच माझे जिवलग मित्र-मैत्रिणी…
कुणाला एकटं बिलकुल करमत नाही, पण मी मात्र याला अपवाद.
मला आठवत नवीनच लग्नानंतर माझ्या मिस्टरांना अचानक गावी जावं लागलं ,त्यांत माझी तब्येत बरी नसल्या कारणाने मीही जाऊ नव्हते शकत,कारण प्रवास खूप लांबचा होता,याना माझी काळजी वाटतं होती….(नवीन असताना काळजी थोडी जास्तच ना😌)हा झाला गमतीचा विषय….
मग मीच म्हटलं तूम्ही बिनधास्त जा मी राहीन एकटी…पण मला 10,12 पुस्तक आणून द्या,कुठल्याही विषयावरचे पुस्तक, कादंबऱ्या चालतील मला…माझं खर वेड कळलं यांना…
खरंच पुस्तकं म्हणजे माझा वीक पॉईंट…कुठलंही रेल्वे स्टेशन असो, किंवा बस स्टँड असो माझी नजर भिरभिरत असते ती पुस्तकांच्या स्टालकडे ….प्रत्येक वेळेस बुक्स मी घेणारच.
साड्यांच्या दुकानात जेवढं मन रमनार नाही,तेवढं पुस्तकांच्या दुकानात छान वेळ जातो माझा…मग ते चित्रकलेच दुकान असो किंवा कादंबऱ्यांचं….कुठल्याही पर्यटन स्थळांना भेटी देताना तिथल्या व्यक्तीचे आत्मचरित्र मी घेतेच…
रामेश्वरमचे….अब्दुल कलाम
सेवाग्राम….विनोबाजी
हल्दीघाटी….महाराणा प्रताप
असे अनेक आत्मचरित्र आहेत माझ्या संग्रही.
याला वेडं ही म्हणता येईल.
पुस्तकांशी मैत्री करता करता कधी लिखाणाला सुरवात झाली कळलंच नाही,पहिल्यांदा थोडी घाबरायचे पण आताशा थोडी लिहायला लागलेय……
लिखानावरून
सहजच सुचलं….(थोडसं विषयांतर)
थोड्या दिवसांपूर्वीच गणेशोत्स उत्साहात साजरा झाला.
10 दिवस बाप्पा आपल्या सोबतीला होते.
लोकमान्य टिळकांनी सर्व धर्म समभाव म्हणून गणेशोत्सवाची सुरवात केली.पण आता मात्र गणेशोत्सवाचे चित्रच पालटलं.
गणपती म्हणजे विद्येची देवता.कुठलंही शुभ कार्य सुरू करण्याआधी आपण गणपतीला पूजतो. विद्येची देवता म्हटल्यानंतर बाप्पाना पण शांतता प्रिय असतील ना???(हा मला पडलेला प्रश्न) विचार करता करता झोप लागली.झोपेत चक्क बाप्पाशीच भेट झाली…आणि मी माझा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला…बाप्पा!खरंच तुम्हाला इतका गोंगाट आवडतो का हो?
तुम्हाला त्याचा त्रास नाही होत?
धवणीप्रदूषणामुळे डोकं नाही दुखत?
किती हो तो dj चा आवाज….?
माझ्या प्रश्नाच्या सरीवर सरी….
पण बाप्पा मात्र शांतपणे माझं ऐकत होते.
मी शांत बसले तसे बाप्पा म्हणाले,”अग तुला शांतता आवडते, म्हणून काय ती सर्वांनाच प्रिय असेल “, खर सांगू , मला पण खुप त्रास होतोय याचा….
पण वर्षातून एकदाच 10 दिवसासाठीच येतो,मग होऊ देत सर्वांची इच्छा पूर्ण.😊😊
पूर्वी खूप छान होत ग, नाटक, भारुड, जादूचे खेळ,सर्व कस शांततेत चालायचं…..पण काळ बदललाय तस सर्व बदलतंय,
सर्वांना कळतंय धवणीप्रदूषण खूप वाईट…पण होऊन जाऊ दे सर्वांची मज्जा👌👌
मी पण खूप खूप enjoy करतोय…तू पण enjoy कर💃💃
खरंच ते दहा दिवस कसे गेले कळलंच नाहीं.
बाप्पा म्हणाले,”अग तू निवांत झोप आता, दहा दिवस कसे सरलेत, कळलं सुद्धा नाहीं”,पुढल्या वर्षी मी येणारच, त्यावेळेस मात्र धवणीप्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करूया आपण……
तेवढ्यातच 5चा गजर वाजला…आणि
मी स्वप्नातून जागी झाले.
बाप्पानी स्वप्नात येऊन मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली.😊
गणेशोत्सव तर सरलाय…..पण बाप्पा मात्र अजूनही माझ्या सोबतीला.बाप्पा असेच नेहमी माझ्या पाठीशी रहा, मला तुमच्या आशीर्वादची नितांत आवश्यकता आहे.🙏🙏
🙏
🌿🌿🌹🌷🌿🎋🌺🍎🍎🍱🌿

©️ लता राठी✒✒
अर्जुनी/मोर
गोंदिया
आवडल्यास share करा पण नावासह ही नम्र वीनंती🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा