शाणा पोगा

Written by

#शाणा_पोगा

नंदिनीताईंचा बंड्या सत्तावीस वर्षाचा घो# झाला होता पण एक काम करेल तर शपथ. एकच मुल म्हणून नंदिनीताईंनी त्याला सगळं जागेवर आणून दिलेलं. त्याचे लहानपणापासून केलेले अतिलाड आत्ता त्यांना भारी पडत होते.

बंड्या सकाळी उठला की त्याला हातात पाणी,चहा द्यावा लागे. नंदिनीताईच त्याची रुम साफ करायच्या. बेडवर बेडशीट घालायच्या. ती बेडशीटही बंड्याला अगदी चुण्याविरहित लागे. नंदितीताई बेडवर बसून साऱ्या कोपऱ्यातून बेडशीटच्या कडा दुमडत.

तसंच बंड्याच्या जेवणाच्या फर्माइशी..कधी पावभाजी,कधी मिसळपाव,तर कधी पापलेट,सुरमई, कधी कोंबडीवडे. हेही नसे थोडके तर लेज,डोरिटोची पाकीटे,चॉकलेट, बिस्कीटं सगळं नंदिनीताईंना आणून ठेवावं लागे. एकदोनदा त्यांनी बंड्याला सांगितलही ,”अरे,तुला काय लागतं ते आणत जा रे तुझं तुच.” पण ऐकेल तो बंड्या कसला!

आणि एक दिवस बंड्याने एटम बॉम्ब टाकला..”आईबाबा, माझ्या ऑफिसातली गायत्री मला खूप आवडते. मला तिच्याशीच लग्न करायचय.”

बंड्याचे बाबा चिडले पण नंदिनीताईंनी त्यांना शांत केलं. त्या म्हणाल्या,” अहो,बघुया तरी निदान, या सुंभाला कोणी पसंत केलंय ते. आठ आठ दिवस दाढी करत नाही. दोन दोन महिने केस कापत नाही. कोणाला बरं आवडलं असेल हे ध्यान🐒. मला तर बाई भारीच उत्सुकता लागलेय त्या मुलीला पहायची. बंड्या,मला तिचा मोबाईल नंबर दे रे. ”

बंड्याकडून मोबाईल नंबर घेऊन नंदिनीताईंनी गायत्रीला फोन केला.

“हेलो,गायत्री का🤔”

“अं,हो.”

“अगं,मी बंड्याची..अ..आपलं हे ते..ऋषीची आई बोलतेय.”

ऋषीच्या आईचा फोन म्हणल्यावर गायत्री
जरा तिथल्यातिथेच टीशर्ट नीट करुन बसली.

“नमस्कार काकू, बोला.”

“अगं,तुला भेटायचं होतं मला. नवरत्न हॉटेलजवळ येशील का संध्याकाळी पाच वाजता.”

“हो काकू,येते मी तिथे डन.”

“डनडनाडन,ठेवते गं मी फोन.,पण माझ्या सुपुत्राला सांगू नकोस हं. हे आपलंतुपलं सिक्रेट बरं का.”

“हो काकू.”

“अगं,नको गं काकू म्हणूस. लयच म्हातारं झाल्यासारखं वाटतं.”

“मग काय म्हणू🤔”

“नंदिनी म्हणशील🙅”

“येस नंदिनीदी.”

गायत्रीला ह्या नंदिनीकाकू प्रथम भ्रमणध्वनीमध्येतरी फारच जवळच्या वाटल्या.

दोघीही नवरत्न हॉटेलमध्ये गेल्या.

“गायत्री,बाळा तू काय घेणार?”

“चहा चालेल.”

“मी बाई,मस्तानी घेणार”

“काकू🙊नंदिनीदी मलापण👶”

“अगं,गायत्री आपल्याला हवं ते विनासंकोच खावं. मला एक कळत नाही,तुला कसं आवडलं ग आमचं ध्यान🙊अं आमचा ऋषी.”

“अगं दी, ऋषी मला फार प्रामाणिक, प्रांजळ वाटला. त्याचा निरागसपणा भावला मला.”

तेवढ्यात वेटर मस्तानी घेऊन आला.

“प्रांजळ वगैरे आहे तो. निरागसही आहे पण आधीच क्लीअर कट्ट सांगून ठेवते तुला. अगं एक नंबरचा आळशी आहे गं आमचा बंड्या.. हे ते ऋषी. नाव त्याचं तोंडात येतच नाही बघ माझ्या. खादाडही आहे अगं. सारखं बाहेरचं खायला लागतं. पण,स्वतः जाऊन आणायला नको. व्यायामाच्या नावाने बोंब. मी उठवलं नाही तर ढुंगणावर ऊन येईपर्यंत झोपून राहील आणि हो भाज्यांचे लयच नखरे गं. भाज्या खायला मागत नाही अजिबात. पावभाजी बरी खातो चाटूनपुसून. वेज पुलाव खातो. सारखं वेगळंवेगळं लागतं. खिशातला रुमाल कधी स्वतःहून काढत नाही. सगळा गलिच्छ कारभार. दाढी करत नाही. केस कापत नाही. बघ बाई तुला आधीच पुढच्या संभाव्य अडचणींची कल्पना देते. नाहीतर म्हणशील कुठून हे ध्यान गळ्यात पडलं!”

“अगं दी,मला आवडते त्याची ती हेअरस्टाईल आणि दाढीसुद्धा. म्हणून माझ्यासाठी राखलेय त्याने.😍 आणि भाज्यांच म्हणशील तर एकदा लग्न होऊदे मग आणते मी त्याला लायनीवर. तू नको टेंशन घेऊ.”

“गुणाची गं माझी सून ती.”

नंदिनीताई व त्यांचे यजमान गायत्रीच्या आईवडलांना भेटले. लग्नाची बोलणी झाली आणि ऋषी व गायत्रीचं शुभमंगल सावधान झालं.

ऋषी,गायत्री हनिमून वग्रै करुन आले.

नेहमीचं रुटीन सुरु झालं.

सकाळी सहा वाजता गायत्रीने ऋषीला उठवून घातलंन. ऋषी परत झोपू पहात होता पण गायत्री व्रात्य. तिने थंडगार बर्फाचा क्यूब त्याच्या टिशर्टमध्ये टाकला.🙃

“अगाईगं,गार गार, उठतो गं बाई🙏😔”

ऋषी निमुटपणे ब्रश करायला गेला.

“ए आई गं$$ गीझर लाव गं.”

“आईंना मी मॉर्निंग वॉकला पाठवलंय,ऋष्या.”

“मग माझी तयारी कोण करणार?”

“शाण बाळ ते. गिझर लाव आणि हो टॉवेल,अंडरवेअर, बनियन वग्रै घेऊन जा बाथरुममध्ये. ओरडत बसू नकोस. मी कारली चिरतेय. तुझ्या तोंडात बोटं घालीन नायतर.🙄”

ऋषी गपगुमान आंघोळीला गेला. कधी नव्हे ते आपले कपडे आपण घेतले.

” ऋषी डार्लिंग, मी अंघोळ करुन येते तोवर ही बेडशीट चेंज कर,रुममधला कचरा काढ,आपले डबे भर.एवढं करशील न शोन्या.😘”

“अं..हो हो का नाही😚”

डब्यातली भाजी पाहून ऋषीने आईला फोन लावला.

“आईगं🙄”

“काय रे बंड्या🤔”

“मी कधी खाल्लेय का कारल्याची भाजी?😢”

“अरे ,गायत्रीने मला व तुझ्या बाबांना कम्पलसरी मॉर्निंग वॉक करायला सांगितलय. किचनपण तिने आल्याआल्याच स्वतःच्या ताब्यात घेतलन. मला म्हणाली,मीच रोज ठरवणार कोणत्या भाज्या करायच्या त्या. माझ्या नवऱ्याच्या तब्येतीची मी आत्तापासून काळजी घेणार. थोड्या दिवसांनी तुला काय ते जॉगिंग बिगिंगलाही धाडणार आहे म्हणत होती. पण मी नाही हो तुमच्यात बोलणार. डोळे ढाप आणि खा कारल्याची भाजी चपाती. बाकी सुगरण आहे हो गायत्री. पसंत आवडली रे बंड्या तुझी.”

बंड्या शॉक्स,😔 गप गुमान त्याने कारल्याची भाजी चपाती गिळली. न गिळून सांगतो कोणाला😉

संध्याकाळी वरणभात,पोळ्या करुन नंदिनीताई व त्यांचे यजमान फिरायला गेले(सुनेच्या सूचनेनुसार).

ऋषीने आल्याबरोबर इकडेतिकडे कपडे टाकले. हातपाय धुवून सोफ्यावर टॉवेल फेकून मोबाईलवर गेम खेळत बसला.

गायत्री भाजीची पिशवी घेऊन आली.

ऋषी डार्लिंग..मला हॉल नीटनेटका दिसला पाहिजे गडे असं म्हणून ऋषीच्या गालावर एक पप्पी😘 देऊन ती बाथरुममध्ये वॉश घ्यायला गेली.

ऋषी पाघळला. कधी नव्हे ते सवताच्या हाताने सवताचे शूज शू रेकवर लावून ठेवले. कपडे लॉँड्री बेगमध्ये टाकले(खिशातलं रुमाल,टुथपिक वग्रै काढून🤗)

तेवढ्यात..

“ऋषी,मटार सोलायला घे हं आणि हो गाजरं स्वच्छ धुवून किसून ठेव. मी चहा टाकते आपल्यासाठी.करशील ना रे एवढं तुझ्या शोन्यासाठी🤗”

“अगं,तुझ्यासाठी काहीही. अजून कसली भाजी चिरायची असेल तर दे आणून.”

“नको रे तेवढच कर मी पटदिशी भाजी,झटकनी हलवा करते माझ्या शोन्यासाठी. तोवर सिंकमधल्या भांड्यांवर हात मारशील ना रे😘😘”

“अं हो हो का नाही. हे बघ गाजर किसले की भांडी घासायला आलोच.🏃”

रात्री नंदिनीताईंनी गायत्रीच्या केसांना छान तेल लावून मालिश करुन दिलंन.

“गायत्री,गुणाची आहेस गं तू. मला ह्या बंड्याने आयुष्यभर दमवलंय. चांगला वचपा काढ हो.🤗 मी काही म्हणणार नाही.”

“वचपा वग्रै नाही गं दी पण या ऋष्याला शिस्त नक्कीच लावेन मी.उद्या पाठवते बघ जॉगिंगला.”

दोघींनी एकमेकींच्या हातावर टाळी दिली.

आणि खरंच एक दोन महिन्यांत गायत्रीने बंड्याला लायनीवर आणलन. बंड्या सगळ्या भाज्या मुकाट्याने खाऊ लागला. घर नीटनेटकं ठेवू लागला.

गायत्रीने नंदिनीताईंच्या बंड्याला शाणा पोगा बनवलन.🤗याचं क्रेडिट नंदिनीताईंनापण जातं बरं का कारण त्यांनीही गायत्रीच्या कामात ढवळाढवळ केली नाही. आईच्या उतू गेलेल्या मायेला आवरतं घेतलं.

———–गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.