शाहिद?

Written by

शहीद?….

(रांगोळीतून आणि कवितेतून एक प्रयत्न)

चिमुकल्या हातांनी थांबवलं होतं का रे तुला??,..
जाऊ नकोस ना रे बाबा देशासाठी लढायला,..
हवा आहेस ना रे तू आई, आजी, आजोबाला,..
राहूच शकत नाही रे सोडून तुझी परी तुला,…?

घेऊन पिल्लु कडेवरी घातली समजूत मनासाठी,..
आता येतो जाऊन ग मी लढायचं आहे देशासाठी,..
आपली भारतमाता सुद्धा आहे माझी वाट पहात,…
ती ही रडेल तुझ्या सारखी जर मी घुसून बसलो घरात,…

जाऊदे पिल्ल्या मला आता अडकवू नको तुझ्या मिठीत,..
नक्की थांबेल मी जास्त दिवस,.. येणाऱ्या पुढच्या भेटीत,…
तू घेऊन झेंडा हातामध्ये उभी रहा मग ऐटीत,…
नको आणु नाते आपले माझ्या देशाच्या ड्युटीत,..?

युद्ध जिंकले,देश जिंकला,…पिल्लु पाहे वाट,..
बाबा काही परत येईना,…गेला गुंडाळून झेंड्यात,..गेला गुंडाळून झेंड्यात….??

कारगिल शहीद जवानांना श्रद्धांजली????©स्वप्ना मुळे,.. औरंगाबाद…

Article Tags:
Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा