शिक्षकदिनानिमित्य ….!!

Written by

? शिक्षकदिनानिमित्य…..!!

समाजघटकांशी एकरुप होणारे नात म्हणजे शिक्षक….!ज्या कल्पकतेने शिक्षणाला सोनेरी सुगंध देण्याच कार्य पिढ्यानपिढ्या शिक्षक करत आहेत त्याच शिक्षणाची मुल्ये रुजविताना तोच जोमदारपणा त्यांंच्यात कायम टिकुन आहे.अबालवृधांना आवडणारे शिक्षक जरी शासकीय कामाकाजात अडकला असला तरी फळ्यावरील खडूची माया कधी अंतरली नाही.केवळ शैक्षणिक ध्यास व शिक्षणाचा विकास हेच सर्व शिक्षकांचे सकारात्मक धोरण राहिले आहे.
नव्या शैक्षणिक बदलांना सामोरे जाताना शिक्षकांना अनेक समस्यांच्या सामना करावा लागत आहे.बदलत्या शैक्षणिक धोरणांचा अंगीकार करुन शिक्षक अधिक कार्यक्षम होत आहे.शिकवण्याची कला , मुलांना हाताळताना लागणारा संयम , आपला हजरजबाबीपणा यामुळे शिक्षक खर्या अर्थाने मार्गदर्शक ठरु लागला आहे.मुलांच्यात मिळून मिसळून राहून शैक्षणिक संस्कार रुजवणारे शिक्षकच मुलांना तारु शकतात .
आज काळ बदलला तरी शिक्षकवर्गा़बद्ल आदर , आपुलकी अजुनही मनात घर करुन आहे.पुर्वी छडी मारणारा शिक्षक व आजचा डिजीटल युगातिल शिक्षक यात जरी फरक असला तरी ध्येय हे एकचआहे…सर्वांना सर्वांगसुंदर शिक्षण देणं…!आज भारत सक्षम करावयाचा असेल तर शिक्षण चांगले व दर्जेदार असले पाहिजे , आणि शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहचले पाहिजे यासाठी शिक्षकवर्ग हा चांगला असला पाहिजे.
खेडोपाडी शिक्षण पोहचल्यामुळे घराघरातुन तरुण शिकून समृद्ध जीवन जगत आहेत .बदलत्या वैभवाचा खरा सुत्रधार व आधारवड हा शिक्षकच आहे… शिक्षकांचे महत्त्व विषद करण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ५ सप्टेंबर हा दिवस ” शिक्षक दिन ” म्हणून साजरा केला जातो.या शिक्षकदिनानिमित्य सर्व आदरणीय शिक्षकांना त्रिवार वंदन…!!

✍नामदेव पाटील.

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा