शिक्षक….भावी पिढीचा शिल्पकार ..!!

Written by

शिक्षक” या शब्दाची जादु अजुनही कायम आहे.शिक्षणाचे महत्त्व क्षणांक्षणांला शिक्षकांच्यामुळे जाणवते. शिक्षण म्हणजे समजण , स्वतः विचार करणं , समाजासाठी जीव तुटणं , कष्ट करुन शकणं , चांगला माणुस होणं, संकुचितपणा नष्ट होणं , चंगळवादापासुन दुर राहणं , स्वावलंबी होणं अशा सार्या गोष्टींचे शिक्षण केवळ शिक्षकच देतो व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व निर्माण करतो . शिक्षकांच्यामुळे आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते .शिक्षकवर्गा़बद्ल कितीही लिहिले तरी साहित्यक्षेत्रातिल सर्व प्रकार अपुरे पडतील .समाजात व विद्यार्थ्यांच्यात महत्तम स्थान निर्माण करणार्या शिक्षकांबद्ल लिहण्यास शब्दांनाही काव्यरुप घ्यावे लागले.

?

शिक्षक….भावी पिढीचा शिल्पकार ..!!

शिक्षक म्हणजे गुरु असतो

आईवडिलानंतरचा बाप असतो

चुकले तर समजावुन सांगणारा मार्गदर्शक असतो

मनावर संस्कार घडवणारा शिल्पकार असतो

स्वच्छतेचा मंत्र देणारा आरोग्यरक्षक असतो

मुलांच्या मनाचा आरसा असतो

समाजमनाचा दुवा असतो

ज्ञानामृत पाजणारा विद्यार्थ्यांचा देव असातो

शिक्षणाचे बहुमोल क्षेत्र असतो

गरजवंतांच्या डोकीवरचे छत्र असतो

कधी कधी तो छडी असतो

तर कधी कधी अमृताची गोडी असतो

असा हा शिक्षक म्हणजे शिक्षकच असतो

संस्कृतीचा खरा रक्षक असतो

✍

नामदेव पाटील .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत