शिक्षणाचा अभाव? की… बोलणाऱ्यांची मानसिकता

Written by

का स्त्रीच स्त्रीला समजून घेत नाही.

   शिक्षणाचा अभाव..?  की.. बोलणाऱ्यांची मानसिकता?
©®जयश्री कन्हेरे -सातपुते
आज एक बातमी वाचली.. “चौथ्यां बाळंतपणात आई गेली.. चौथीही मुलगीच झाली.. मुलींचे वय अनुक्रमे.. 6वर्ष, 4वर्ष, 2वर्ष आणि आता झालेली चौथी मुलगी..”
जे झाल ते फारच वाईट  झाल. एकामागे एक चार मुली.. त्या स्त्रीच्या शरीराची काय हालत झाली असेल…?
आशा बातमीवर fb वरच्या एका ग्रुपवर… मसालेदार चर्चा सुरु होती.. स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या भगिनी त्यावर ताशेरे ओढत होत्या.. पुढील प्रमाणे..
1. किती लोभ बायांना मुलगा हवा यासाठी जीव कशाला धोक्यात घालायचा.. (हिला कोण सांगेल की काही जगी स्त्रियांची मर्जी चालत नाही )
2. अजूनही हे लोक मुलगा -मुलगी भेदभाव करतात.. असा राग येतो न यांची मानसिकता पाहून..
3. काही नाही हो.. फक्त शिक्षणाचा अभाव आहे हा… अशिक्षित लोक असेच करतात व बायकोचा जीव गमावून बसतात.. (समोर सांगतेच या सुशिक्षित लोकांचे कारनामे )
4.  बायांनी विरोध करायला हवा.. स्वतःला जपायचं न. (इथे शिकलेल्या, नोकरीवाल्या  नाही करू शकत… तिथे गरीब स्त्रीया काय करतील.
अशा बऱ्याच कमेंट आहेत पूर्ण लिहीत नाही…

माझ्यामते  याला शिक्षणाचा अभाव नाही  म्हणता येणार,
मी माझ्या  आजूबाजूला बरेच उच्च शिक्षित ( दोघेही नोकरीवर) जोडपे बघीतले आहेत.  ज्यांना पहीली मुलगी झाल्यानंतर  मुलासाठी चार ते पाच गर्भपात केले व नंतर (कोणत्या पध्दतीने माहीत नाही)  त्यांना मुलगाच झाला.
मी विचारण्याचा प्रयत्न केला पन मला गर्भपात करण्याचे कारण म्हणजे  गर्भ  खराब होता असं सांगण्यात आला..
पण इतकंही मूर्ख नाही आहोत आपण न समजण्याइतपत..
आता सांगा….
पहील्या मुलीनंतर चार पाच गर्भपात करणारे पाचव्यांदा किंवा सहाव्यांदा मुलाला जन्म  देतातच..  का तर सरकारचा नियम, नाहीतर  या उच्च शिक्षितांनी पण  जन्म दिलाच असता मधल्या  चार मुलींना.
त्या मुलींना गर्भात मारण्याच पाप नसेल बसल का त्याच्यावर?
हे सांगितले  यासाठी  कारण आजची घटना झाल्यामुळे  त्यांच्या शिक्षणावर बोलल जात म्हणून मला आलेला अनुभव  सांगितला.

काही भागात  अजूनही मुलगाच सर्व  काही  तोच नाव चालवेल ही गोष्ट  ईतकी मनात रुजलेली आहे की त्याच्या  बाहेर पडण्याची कुणाचीच तयारी नाही.
त्यामुळे  मुलगाच झाला पाहिजे  हा अट्टाहास असतो मग आईचा जीव गेला तरी चालेल.
यासाठी  महीलांनीच  पुढाकार  घ्यायला  पाहिजे.  व मानसिकता बदलायला पाहिजे,(बरेच जागी स्त्रियांचा हट्ट असतो मुलगा व्हावा ) तेव्हाच विचारसरणी बदलेल व स्त्रीभ्रूण हत्या  किंवा मुलाच्या  हव्यासापोटी आईचा होणारा मृत्यू टाळता येईल.
बायांनी काय विरोध करायच्या.. मोठ मोठ्या घरी.. बायांच कुणी ऐकत नाही.. एक तर चेक करून घेतात गर्भ.. नाहीतर काही जालीम उपाय फिरताय मोबाईल वर ते देखील उच्च शिक्षित लोकच करतात.. मग अशा वेळी या उच्च शिक्षित स्त्रिया विरोध करतात का नवऱ्याचा किंवा घरच्यांचा.. फरक इतकाच असतो यांचं सगळं झाकलेलं गुपित असत.. शिक्षणाचा वापर करून..
आणि सामान्य लोक ज्यांना या वरील कॉमेंट मधे “शिक्षणाचा अभाव म्हंटल ” अशांच बातम्या द्वारे उघड पडत..
कितीतरी मजूर असे आहेत ज्यांनी दोन मुलीवर ऑपरेशन केल..
एकाच्या तर पत्नीला पहिल्या बाळंतपणात त्रास झाला.. मुलगी झाली..तरी त्यांनी दुसरा चान्स घेतला नाही..
दोन जोडपी अशी आहेत ज्यांच्या लग्नाला 18,.. 20वर्ष होत आली.. मुलबाळ होत नाही म्हणुन नाही बायकोला त्रास पण दिला नाही दुसरं लग्न देखील केल नाही.. पैसा नसल्यामुळे IVF किंवा इतर इलाज देखील करू शकले नाही. कदाचित त्याना याची माहिती नसेल.. जास्त शिक्षण नसतं न त्यांच..
आता करा विचार.. अशा घटनेवर आपण काय बोलायला हवं..??, ??

शेवटी एक सांगते जे मला वाटत
ज्यांना मुली आहेत  त्यांच्या मुली लग्न होऊन सासरी जतात.

व ज्यांना मुल आहेत त्यांचे मुल नोकरी निमित्त बाहेर गावी,  विदेशात जातात.
ज्यांचे जवळ असतात त्यांचे भांडणांमुळे  आई वडीलांनपासून वेगळे राहतात.
मग सांगा… जर आपल्या जवळ शेवटपर्यंत कुणीच (मुलगा /मुलगी)  राहणार नाही  मग हा अट्टाहास कशाला?
तर आपन मेल्यानंतर आपल   (नवर्‍याच)  नाव चालवण्यासाठी. (आईच नाव सहसा चालतच नाही ) आता येत आहे शाळेतील सर्टिफिकेट वर…

नाव चालवण म्हणजे  नेमक काय?  हेच मला कळत नाही.

मला पन एक गोड मुलगी आहे  व आम्ही  खूप  खुश  आहोत.  आणि  विश्वास आहे ती आमच (दोघांचही)  नाव चालवेल.
तुम्हाला माहिती आहे नाव चालवणे म्हणजे नेमक काय?  माहिती असेल तर सांगा मला प्लिज उत्तराच्या प्रतीक्षेत.. समाप्त… ©®जयश्री कन्हेरे सातपुते
यातून एकच सांगायचे होते की कुणाच्याही शिक्षणावर, बोलण्याचा अधिकार नाही आपल्याला.. जे होत ते चुकीचंच होत हे मान्य आहे मला.. पण आपल्याला बोलण्याचा चान्स मिळाला म्हणुन.. शिक्षणावर तरी बोलू नये..
उच्च शिक्षित मूलगा होण्यासाठी काय काय मार्ग अवलंबतात हे मी वेगळे सांगायला नको.. ज्यांना माहिती असत मुलगा. मुलगी भेद आपणच मिटवायला हवा.. असे लोक सुद्धा मुलाच्या हव्यास करतात.. मुलीचे गर्भ पडतात.. म्हणूनच सोनोग्राफी सेंटर बंद करण्यात आले..

एखाद्या गरीब व त्या कॉमेंट नुसार अशिक्षित लोकांना.. इतकी माहिती नसते याविषयी व असली तरी तितका पैसा नसतो.. त्यामुळे मुलगा होई पर्यंत ते मुलं होऊ देतात (हे चुकीचंच आहे )
मात्र सुशिक्षित लोकांसारखे गर्भलिंग चाचणी करून ते पापी होत नाही.
शिक्षण असणाऱ्यांनी शिक्षणाचा उपयोग सामाज सुधारणेसाठी कमी व स्वतःच्या फायद्यासाठी जास्त केलेला आहे (सर्वच म्हणतं नाही मी काही अपवाद आहेतच शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करा.. जयश्री कन्हेरे सातपुते.
धन्यवाद ?
फोटो साभार गुगल ?©®जयश्री कन्हेरे सातपुते.

Article Categories:
सामाजिक

Comments

  • छान समजावून सांगितलं. लोकांना अश्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे. लेख वाचून समजत समाजात थोडा जरी फरक पडला तरी सार्थक झालं. मुलगा मुलगी फरक करायलाच नको.

    Triveni 17th ऑगस्ट 2019 7:26 am उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत