#शिवा.. !!(भाग -1)

Written by

एकदम छोटंसं गाव अगदीच पाच पन्नास घर असलेलं.. एकदम गरीब कुटुंब म्हणजे रोज कमवून रोज खायचं अस.. आई वडील आणि पाच भावंड.. सर्वांचं पोट भरेल अस रोज कमवायचं.. गावात जास्त कोणतीच सोय नव्हती तो स्वतंत्र भारत नुकताच झालेला काळ. रोज च सामान रोज घेऊन यायचं.. आणि ज्या दिवशी नाही जमणार आणायला त्यादिवशी उपाशी झोपायचं.. 
शिवा मधला मुलगा, हुशार सगळे होते पण परिस्थिती अशी नव्हती कि त्यानां शिक्षण दिल जाईल.. त्याच्या शिक्षनासाठी चा खर्च पेलवणारे आई वडील नव्हते.. त्यानां अशक्य होत ते म्हणून जमेल तस एका मुलाचा खर्च ते करू शकत होते म्हणून मोठा मुलगा शिकू लागला.. 
शिवा ला शिकण्याची खूप इच्छा होती.. त्याला मजुरी करत आयुष्य नव्हतं घालवायचा. त्याने हट्टाने शिक्षणाचा द्यास घेतला.. वडिलांनी support केला.. गावात फक्त चवथी पर्यन्तचीच शाळा.. आता दुसऱ्या गावात जायचं म्हणल्यावर पैसे लागणार.. आईवर वडिलांकडे जितके असायचे ते मोठया भावाचा खर्च करायचे .. गावात होती शाळा तोवर भागून गेलं आता मात्र शिवा ला वडिलनकडून मदत बंद झाली.. शिवा ला काहीही करून पुढे शाळा शिकायची होती.. शिवा ने शाळेतील सरा कडे मदत मागितली कि फक्त माझा दाखला पुढच्या वर्गात टाका.. सर बोलले अरे पण तु त्या गावी जाणार कसा..? 
शिवा हट्टी.. तो बोलला फक्त माझं इतकं काम करा.. आणि सरानी त्याच काम केल.. शिवा आता रोज पहाटे लवकर उठून चालत त्या गावी जायचा.. कोणी मदत केली तर सायकलवर जायचा.. जवळच गाव होत 1, 1.30 लागायचं चालत जायला.. पण वही पुस्तकं याचा खर्च कसा करणार.. घरातून सगळी मदत बंद झालेली.. आता शिवा जमेल तशी काम करू लागला.. त्याच्या बादलीत तो पैसे जमवत होता.. सुट्टीचा दिवस.. उन्हाळा सुट्ट्या.. दिवाळी सुट्ट्यात तो काम करू लागला.. आणि त्या पैस्यांनी तो शाळा शिकू लागला.. अशीच 7 वि आली.. 7वीनंतर स्कॉलरशिप मिळायची पण तेंव्हा एका घरात एकाच मुलाला मिळायची.. ती शिवा च्या मोठया भावाला मिळाली.. मग शिवाला कुठून तरी समजलं कि आडनाव change केल्यावर मिळू शकते scholership. मग काय शिवा ने त्याच्या आडनावात बदल करून घेतला आणि स्क्लारशिप मिळवून पुढे शिकू लागला..आता 10वी झाली.. 
आता पुढच्या शिक्षणासाठी शहरात जावं लागणार होत.. म्हणजे अजून खर्च.. तोवर शिवा चा मोठा भाऊ पण हुशार असल्यामुळे शिकत होता पण त्याला घरून support होता.. शिवा हट्टाने शिकत होता.. भांडण करायचा पण शिकायचं सोडलं नाही.. 
शिवा च्या आई वडिलाना वाटलं जेवढी थोडीफार शेती आहे ती शिवा ने बघावी.. मोठा नोकरी करेल.. पण शिवा चे स्वप्न वेगळेच होते त्याला मोठं बनायचं होत आणि त्याला ते पूर्ण करायचे होते. 
आता शिवा आणि शिवा चा भाऊ दोघे शहरात गेले तेपण एकाच दोघे हॉस्टेल वर राहत होते.. करून खात होते.. शिवा चा मोठा भाऊ सुरवातीपासूनच कुचकट होता.. तो शिवावर नेहमीच जळायचा शिवा पण अजिबात कोणाचं ऐकत नसे.. . घरून आई ने काही दिलेलं तो कधीच शिवा ला द्यायचा नाही.. त्यासाठी शिवा भांडायचं देखील पण त्याचा काहीच उपयोग नसायचा.. कारण शिवा त्याच्या मनाचा ऐकत होता..शिवा ला सगळेच अति हट्टी समजायला लागले. 
मग शिवा चा भाऊ हळू हळू जेवण, धन्य सगळं लपून ठेऊ लागला जे ने करून शिवा च्या हाती काहीच लागू नये.. इकडे शिवा सगळी रूम शोधायचा पण काहीच सापडत नसे.. जवळ पैसेपण नसायचे कि पोटाची आग बाहेर काही खाऊन वीजवावी.. उपाशी झोपून.. दिवस काढायचा.. 
सुट्या मध्ये गावी गेला कि शेतिची काम करू लागला.. तो त्याच्या शेतात मेहनत न करता दुसरीकडे काम करायचा म्हणजे मोबदल्यात पैसे मिळतील जे शहरात कामाला येतील.. गावी तेंव्हा खडी फोडायची.. रस्ता बनवायची.. विहीर खोदायची खूप काम चालायची.. अशी काम शिवा करू लागला… आणि पैसे साठवायचे.. विहीर खोदताना अवघड टप्पयावर उभ राहिले कि जास्त पगार मिळायचा. मग शिवा त्या अवघड टप्पयावरची काम करू लागला.. आणि पुढचं शिक्षण घेऊ लागला…मग त्याच आरामात भागायचं.. 
मोठा भाऊ शिकला.. त्याला नोकरीत लागली.. शिक्षक म्हणून.. मग तर काय घरात आईवडील भाऊ बहीण सगळे तो म्हणेल तस चालू बोलू लागले.. शिवा मात्र आपलीच धुंदीत असायचा.. तो नेहमी स्वतःच ऐकायचं.. त्याच्या या स्वभावाला सगळे वैतागले होते. 
मोठया भावाचं लग्न झाला.. बहिणीची लग्न झाली.. आता शिवसाठी मुली ची शोधाशोध चालू होती.. परिस्तिथी फारशी बरी नव्हती आणि शिक्षण पण चालू होती.. त्यामुळे स्थळ शिवा ला आवडण्यासारखं नसायचं.. शिवाला बायको शिकलेली करायची होती जी निदान पुढे मुलांना तरी घडवेल.

शिवा चे मित्र कोणी पोलीस मध्ये गेले… घरची परिस्तिथी चांगली होती ते आरामात शिकून निघाले.. शिवा ला पुढे काहीतरी करून नोकरी करायची होती. पण मोठया भावाला वाटायचं कि आता लग्न करून टाकावं म्हणजे जरा तरी अडकेल.. 
शिवा ला हट्टी, तर्हेवाईक, रागीट अश्या उपमा मिळू लागल्या. शिवा ला कोणाच्या बोलण्याचं घेणंदेणं नसायचं.. त्याचा तो प्रामाणिक वागायचा. 
एक स्थळ आलं.. मुलगी खूप सुंदर.. त्या काळात 10वी झालेली, एकुलती एक.. बघताक्षणी दोघे एकमेकांना आवडले.. पण मुलीच्या वडिलांनी मुलाची घरची परिस्थिती बघून नकार दिला. मुलीला शिवा पसंत होता, शिवा होताच एकदम देखणा.. ऋषीं कपूर, गोरा, उंच, रागीट, हसरा. मुलगी सुंदर तर होती पण शिकलेली पण होती. शिवाय एकटीच. भाऊ नव्हता ना बहीण होती. मुलीच्या वडिलांची जमीन पण भरपूर होती. 

हे स्थळ मोठया भावाला नको होत.. त्याला वाटलं मुलगी एकटीच म्हणजे सगळी संपत्ती याला मिळणार.. त्याने खूप आढेवेढे घेतले लग्नसाठी.. पण शिवा ला सगळ्या बाजूने हे योग्य वाटत होत. शिवा भावाच्या ऐकण्यातला कधीच नव्हता. त्याने लग्नासाठी होकार दिला. 
शिवा पण काही साधा सरळ थोडी होता.. इतक्या खडतर प्रवासात एकटा चालणार साधाभोळा कधीच राहत नसतो.. त्याच्यातला चांगुलपणा.. भाबडेपणा परिस्थिमुळे कधीच च्छिन्न झाला होता . शिवा ला व्यसन कशाचं नव्हतं. हुशार, निर्व्यसनी, देखणा!! आणि उमा सुंदर, सोज्वळ, शिकलेली !! सगळयांनी कौतुक केल शिवा ने नशीब काढलं म्हणून.. !
सौ. प्रिया महेश पुरी.

 शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात 🙏

फोटो :google. 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.