शेवटी एकटीच (भाग-1)

Written by

साधारण चार वर्षांपूर्वीची गोष्ट. नेहा अभय च्या प्रेमात पडली होती. तिने ही गोष्ट त्याला सांगितली. तस अभी ला ही ती आवडत होती, त्यामुळे कोणते ही आढेवेढे न घेता त्यानं लगेच होकार दिला.
तशी नेहा काही फार छान नव्हती दिसायला. रंगाने सावळी, थोडीशी जाड, केस अगदी सरळ, पण डोळे खुप बोलके होते तिचे, शिवाय राहणीमान नीटनेटकं असल्यामुळे पटकन नजरेत भरायची. अभयच म्हणालं तर तो अगदी गोरापान, नाक सरळ, डोळ्यावर मस्त चष्मा, काळेभोर केस आणि उंचपुरा अगदी Handsome दिसायचा तो.
प्रेमात पडल्यानंतर जी काय घालमेल असते आणि भेटीची ओढ असते ती अगदी छान अनुभवत होते दोघे जण. आपण बाहेर फिरायला जाऊ असा अभी तिच्याजवळ हट्ट करू लागला. हे बघ अभी मी अस कधी बाहेर गेले नाही घरी न सांगता मला भीती वाटतीय चुकून जरी घरी कळलं तर वाट लागेल माझी. अगं “पिल्लु” तुझा अभी आहेना सोबत तुझ्या मग का भीती वाटते तुला? हो रे अभी तरी पण…
हे बघ पिल्लू आता पण नाही आणि बिन नाही आपण जायचं म्हणजे जायचं मला काही माहीत नाही आणि जर नाही आलीस तर मी एका मुली सोबत बोलणार नाही हा मग बघा बाबा आता काय करायचं ते. अभीच अस बोलणं ऐकून नेहा ला वाईट वाटत आपल्या मूळ अभी दुःखी होईल आणि अभी च नाराज होणं म्हणजे तिचा जीव टांगणीला लागलं शिवाय काळजी वाटते ती वेगळीच. हो नाही करत शेवटी नेहा तयार झाली. अभी खुप खुश होता कारण प्रेमात पडल्यापासून दोघे बाहेर फिरायला गेलेच नव्हते.
ठिकाण कोणते, ड्रेस कोणता घालायचा, गिफ्ट काय द्यायचं आणि किती वाजता बाहेर पडायचे असे छपन्न प्रश्न पडत होते दोघांना पण…
सगळ्या चर्चे अंती 5 ऑगस्ट हा दिवस फिक्स झाला,आता दोघे पण त्या दिवशीची मना पासून वाट पाहू लागले.

Article Categories:
प्रेम

Comments are closed.