शोध…!!

Written by

            खूप शोधलं तिला नाही सापडली ती मला..ती जेव्हा घरी असायची माझ्या सोबत वावरायची तेव्हा कधीच किंमत नसायची तिची! अहो टिफिन घेतला का?रुमाल घेतलात ना? हे सारं म्हणजे कटकट वाटायची तिची,कधीच काही करू शकलो नाही तिच्यासाठी..ना प्रेमाने एखादी साडी आणू शकलो, ना तोंडभरून तिने केलेल्या जेवणाचं कौतुक करू शकलो! बायकोवर एखादा जोक दिसला की तो मात्र तिला न चुकता कुत्सितपणे हसून वाचून दाखवायचो,ती मात्र मी असं करते का ओ.. इतकच बोलून हसून सोडून द्यायची. दिवसभर कष्ट करायची तरी कामावरून घरी आलो की हसून स्वागत करायची. मला वाटायचं काय काम असतात हिला दिवसभर! पण ती मात्र कधीच रागवयची नाही.मुलांना बजावून ठेवायची,बाबा कंटाळून येतात शांत राहा हं.. पण मला मात्र हे कधीच समजायचं नाही. सगळ्या घराचं सुख पाहाताना स्वतःच दुःख मात्र विसरून जायची. मी मात्र प्रत्येक गोष्टीचा राग तिच्यावर काढायचो,नेहमीच तिला गृहीत धारायचो. खरचं खूप कौतुक करायचयं तिचं, प्रेमाने जवळ घ्यायचयं तिला! आज मात्र मी तिला शोधतोय जेव्हा ती या जगात नाहीये, सत्तरीवर आलेला मी आज मात्र तिची साथ शोधतोय!

©अपूर्वा सुकेशीनी पांडुरंग.

Follow Instagram: @spandan_shabdanche.

Fb-स्पंदन_शब्दांचे.

[email protected]

All copyrights reserved©.

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.