संघर्ष माउलीचा

Written by

संघर्ष माउलीचा
जळगावात एका साधारण कुटुंबात तिचा जन्म झाला. आई वडील भा ऊ बहिण असा परिवार होता. आठ नऊ वर्षांची अल्लड़ पोर होती. लहानपणी मन सोक्त जगायची . तापी नदी मध्ये अंघोळ करून पोहायची. शाळेची खुप आवड होती. पण परिस्थिती मुळे जास्त शिक्षण घेता आलं नाही.घरची परिस्थिती अगदीच बेताची होती.आई वडील ही साधे होते. अगदि वयात यायचा आधीच हिच लग्न लाऊन दिले. नवरा एका s. T महामन्डळ मध्ये नोकरी करत होता. नोकरी सरकारी होती. आणि दोघांमधे 20 वर्षांनी अंतर होते. अशा परिस्थितीत तिच लग्न लाऊन दिले.
लग्न करुन सुखी संसाराची स्वप्न डोळ्यासमोर ठेवून ती नवरया सोबत मुंबई ला आली. मुंबईची आधिपासूनच आवड होती म्हणून ती खुपच आनंदि होती.पण तीचा तो आनंद जास्त काळ टिकला नाही कारण सासू नावाच ग्रहण तिच्या संसाराला लागले. आणि लग्ना चा नवरा ही तिचे हाल करू लागला. सासू नळ्ंद ही त्यात भर घालत होते. तिचा जीवनचा हा संघर्ष चालू झाला होता. सासू बाई असून सुद्धा तिच्या वेदना समजून घेत नव्हती. अगदीच तिचा पहिल्या बाळंबाळंतपणात तिचे खुप हाल केले. सातव्या महिन्यात मुलगी झाली म्हणून नवरा बघायला पण आला नाही. जेवण पण कोणी दिले नाही. शेजारच्या लोकानी तिला आधार दिला. नवरा फक्त दारू पिऊन असायचा. सगळा पैसा त्याची आई घेऊन गावला जायची. माहेरची माणस देखिल लांब होती म्हणून कोणाचिही मदत मिळाली नाही. असाच संसार रेटत असताना नवर्याची नोकरी गेली. तसेही त्याच्या नोकरीचा पैसा तिला मिळतच नव्हता. पण दिवसभर घरात दारू पिऊन तिला फ़क्त मारझोड करित होता. अशाच परिस्थिती मध्ये ती खंबीर उभी होती ती फ़क्त तिच्या पिल्लांसाठी. अशाच एका दिवशी नवरा तिला सोडून गावीच गेला तो परत कधीच आला नाही. आता हळुहळू ती स्वत:चा पायावर उभी रहिली. आसपासच्या लोकंजवळ घरकाम करुन ती तिचा घरची चूल पेटवत होती. नवर्यचा पैसा प्रेम आधार काहीही तिच्या नशिबात नव्हतं.होता तो फक्त संघर्ष. नवर्याने तर घरातले देव, भांडी , वस्तु अगदीच दारुमुळे विकले होते. हातात काहीही पैसा नव्हता. शिक्षण जास्त नसल्यामुळे एका दवाखान्यात नर्स चे काम शिकून ती तिथेच कामाला लागली. पण लहान लहान मुल कोणाकडे ठेवणार म्हणून ती त्यांना कामावर नेत होती. मुलांची शाळा आणि तिच काम संभाळत होती. वेळप्रसंगी फक्त बिस्किट तर कधी महिनाअखेरीस फक्त पानी पिऊन ती माऊली न पोर रहायची. पावसात तर घरात फक्त सगळी कडे पाणीच पानी असायचे. कोणाचाही आधार त्या माउलीला मिळाला नाही. देव ही फक्त परिक्षा घेत होता. देवाने एकच उपकार केलेले तिची मुल मात्र खुप समजदार होती. कधीच कोणत्याच वस्तूंचा हट्ट केला नाही. अगदि सणासुदीला ही लोकानी दिलेल्या जुन्या कपड्यावर ती पोर खुश रहायची. कारण ही त्या लहान मुलांना समजत होते. की आई कडे पैसे नाहित.
असेच दिवसामागून दिवस जात होते. आणि मुलाने 10 ची परिक्षा दिली. आणि तो घरी आला. आला तो एक छोटी नोकरीच शोधून आला. कारण परीक्षेचा निकाल लागयला खुप अवधी होता. त्या दिवशीपासून तो त्या माउलीला म्हणाला की आई आजवर तू आमच्यासाठी खुप केले पण आता तू घरात राहुन आराम करायचं. आणि त्या दिवसापासून तो मुलगा घरची जबाबदारी पार पाडू लागला तो आजपर्यंत पार पाडत आहे. मुलींची लग्न झाली. त्यानीही त्यांचा जिवावर नोकरी करुन लग्नाचा खर्च उचलला. मुलगा ही परदेशात नोकरी साठी गेला. मुली आणि मुलगा दोघेही आपल्या संसारात सुखी आहेत. आणि त्याना बघुन ती माऊली ही खुश आहे.
पण…….
आजही या माऊली चा संघर्ष चालूच आहे. आजही ही माउली मुलांचा सुखी संसारासाठी झटत आहे. मुलांला पत्नीचे प्रेम आणि नातवंडाना वडिलांचे प्रेम मिळावे म्हणून ही माउली त्याना परदेशात वास्तव्यास ठेउन स्वत: एकटी घरात खंबीरपणे स्वत:चे दुख:, त्रास , अश्रू लपवून तिचे हसू दाखवत आहे. स्वत:चा सासुने केलेला छळ, त्रास मागे ठेउन ती स्वत:चा सुनेचे खुप लाड करत आहे. सुनेच्या सगळ्या भावना समजून तिच्या वरही मुली सारखेच प्रेम करत आहे.
आयुष्यभर हाल त्रास सहन केलेली ही माउली आजही एकदम खंबीर पणे ताठ मानेने उभी आहे. एक आदर्श आई बनली आहे,तिच्या सुनेची प्रेमळ माउली बनली आहे.
अशा या मायमाउलीस देव सुखी, निरोगी दीर्घायुष्य देवो हीच समर्थ चरणी प्रार्थना.
लेखिका: सौ. राजेश्री पाटील..
(कथा आवडल्यास जरूर पुढे पाठवा.)

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा