संयम

Written by

मनाचा वारू कल्पनेच्या नगरीत चौफेर उधळी ।
फसवी प्रलोभने आभासी जगाची त्यासी लुभवी ।।
उडवुनी धुळ स्वप्नांची जाई वास्तवासी भुलूनी ।
रंगात रंगुनी स्वप्नांच्या कामनेच्या वनी यथेच्छ विहारी ।।

भंगता स्वप्न येता जाग होई भान वास्तवाचे ।
करुनी विलाप होई उद्विग्न मांडी रुदन पश्चातापाचे ।।
संयमाची लगाम असे जरुरी फिरुनी परतण्या भू वरी ।
इच्छितस्थळी पोहचवी संयम मनाचा वारू हर्ष करी ।।

 

© सुनीता पाटील

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा