संवेदनशीलता?

Written by

एका पोस्टमनने एका घराचे दार ठोठावले आणि हाक दिली,’पत्र घ्या.

आतुन एका लहान मुलीचा आवाज आला,

‘येते येते.’

पण तीन -चार मिनीटे झाली तरी आतून कुणीही आले नाही.

त्यामुळे पुन्हा एकदा पोस्टमनने आवाज दिला, ‘अरे दादा,घरात कुणी असेल तर येऊन चिठ्ठी घ्या.’

पुन्हा एकदा त्याच लहान मुलीचा आवाज आला. ‘पोस्टमन काका, दरवाज्या खालुन चिठ्ठी आत टाका, मी येतेच आहे.’

पोस्टमनने रागातच चिडून म्हटले,
‘नाही.मी ईथे उभा आहे. पत्र रजिस्टर आहे.
पावतीवर तुम्हाला सही करायची आहे.’

जवळ जवळ सहा- सात मिनीटांनंतर दरवाजा उघडला.

पोस्टमनला आतापर्यंत उशीर झाल्यामुळे बराच राग आला होता आणि कधी एकदा दरवाजा उघडतो आणि आपण त्या मुलीली ओरडतो असे त्याला झाले होते.पण दरवाजा उघडताच तो आश्चर्यचकित झाला.

कारण त्याच्या समोर एक लहान मुलगी उभी होती, पण तिला दोन्ही पाय नव्हते.

ती कुबड्यां च्या आधारे उभी होती.

पोस्टमन गुपचुप पत्र देऊन व तिची सही घेऊन निघुन गेले.

आठवडा -दोन आठवड्यांनी जेव्हा कधी त्या मुलीला पत्र येत असे,
पोस्टमन एक आवाज देऊन ती मुलगी येईपर्यंत दरवाजा बाहेर तिची वाट पाहत.

एक दिवस जेव्हा त्या मुलीने पाहीले की, पोस्टमन काका चप्पल न घालताच सगळ्यांची पत्रे वाटतात,
तेव्हा तिला फार वाईट वाटले.
दिवाळी जवळ आली होती.
त्यामुळे पोस्टमनकाकांना दिवाळीची भेट काय द्यायची याचा विचार ती मुलगी बऱ्याच दिवसा पासुन करत होती.

एके दिवशी तिने काकां कडून चिठ्ठी घेतली.

ते जाताच त्या मातीवराल त्यांच्या पायांचे ठसे एका कागदावर पेनाच्या साहाय्याने काढुन घेतले.

दुसऱ्या दिवशी तिच्याकडे काम करणाऱ्या बाईने बाजारातुन तिला त्या मापाच्या चपला आणुन दिल्या.

दिवाळी आली आणि पोस्टमन काका गल्लीतील सगळ्यां कडून दिवाळीचे बक्षीस मागत होते.

त्यांनी विचार केला की,
या लहान मुलीकडून आपण काहीही घ्यायचे नाही, पण तिला भेटुन दिवाळीच्या शुभेच्छा नक्की देऊन जाऊ या.

त्यांनी त्या मुलीचा दरवाजा ठोठावला
आतुन आवाज आला

,’कोण आहे..?’
‘पोस्टमन’ उत्तर मिळाले.

लगेचच ती मुलगी हातात एक गिफ्ट पँक घेऊन आली आणि तिने पोस्टमन काकांना ते दिले व म्हटले,
‘ काका दिवाळीच्या शुभेच्छा.

आणि हो हे पाकीट घरी जाऊन उघडायचे.
‘घरी जाऊन जेव्हा त्यांनी ते पाकीट उघडले,
तेव्हा ते फार भावुक झाले. कारण त्यात त्यांच्या करीता एक जोडी चपला होत्या.

ते पाहुन त्यांचे डोळे भरून आले.

पुढच्या दिवशी पोस्टमन ऑफिसमध्ये जाताच त्यांनी पोस्ट मास्तरांना सांगीतले की,
मला बदली हवी आहे.

पोस्ट मास्तरांनी कारण विचारले असता त्यांनी भरल्या डोळ्यांनी सर्व सांगीतले.

‘आजनंतर मी परत कधी त्या गल्लीत जाणार नाही. कारण त्या मुलीने स्वतःला पाय नसूनही माझ्या पायांची गरज ओळखली,

तिने मला चपला दिल्या, पण मी तिला कधीही तिचे पाय परत मिळवुन देऊ शकत नाही.

‘ ‘संवेदनशीलता’ ही जीवनात खुप महत्वाची आहे.

कारण दुसऱ्यांचे दुःख समजणे खुप गरजेचे आहे.

अनुभव करणे आणि त्याच्या दुःखात सहभागी होणे खुप गरजेचे आहे.

हा एक असा मानवी गुण आहे,ज्याच्याशिवाय माणुस अपुर्ण आहे.?????

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा