संसाराच गणित

Written by

संसाराच गणित

नवरा बायकोच्या नात्याच
गणित अजब असतं,
Love काय Arrange काय
शेवटी सेम असतं ,

सुरूवातीचे फुलपाखरी दिवस
लवकरच निरोप घेतात,
ऑफिस,शाळा वाढलेले खर्च
दोघांच्या कंठाशी येतात,

भरीस भर म्हणून आता दोघेही
एकमेकांना पक्के ओळखू लागतात
आवाजाची पट्टी बघुन
पुढचा बाॅल टाकतात,

तु तु मी मी करत करत
गाडा पुढे जातच असतो
कूर्मगतीने का होईना
कष्टांचे चीज होतंच असतं,

कधीतरी खुप थकायला होतं
मग BP SUGAR चेक होत,
कितीही busy झालो झालो तरी
रिपोर्ट घ्यायायला जोडीनेच जातो,

आवाजाच्या पट्टी वरुन आता
तब्येतीचा अंदाज येतो
काही न बोलताही
तुप मीठ भात का बटाटे वडा
हे ओळखता येते

संध्याकाळ जशी जवळ येते
तसे दोघांनी एकमेकांना जपु लागतात
आपल नंबर आधी असुदे
असे देवाला चारचारदा सांगतात.

प्रज्ञा बापट

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा