सचिनचं गुपित….100शब्दांची गोष्ट

Written by
 1. तुझं सीक्रेट माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे …हं

  मोहन रिक्षाचालक, सचीन ला जन्म देऊन आई देवाघरी गेली.
  आईविना पोरका सचिन,पण मोहन ने कधीच आईची उणीव भासू दिली नाही. त्यांच्या शेजारीच रमा बाई रहायच्या, सचिन तुलना आत्या म्हणायचा. आपल सगळं गुपित त्यांना सांगायचा….
  मोहन अहोरात्र मेहनत करायचा…

  एकच इच्छा ,आपल्या पोरानं खूप शिकून मोठा माणूस बनावं……
  सचिन शिकला, स्वप्न साकार झालं, बस..आता बाबांचा रिक्षा बंद….
  त्याला नोकरीच पत्र आलं….
  बाबांना surprise द्यायचं म्हणून हे गुपित फक्त आत्यालाच सांगितलं.
  आत्यानेही ते जपलं.
  सुटबुट मध्ये सचिनला पाहून बाबाना आनंदाश्रू आवरेना…
  कारे!मला आत्ता सांगतोस!
  अहो बाबा ते आमचं गुपित होत..
  आत्ता मात्र रिक्षा बंद, आणि छान आरामात जगायचं
  मी आहे ना आत्ता…..

  लता राठी

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत