…सच केह रहा है दिवाना…??

Written by

रेहना है तेरे दिल मे माझा आवडता पिकचर ….त्यातलं ते गाणं मला विशेष आवडतं( अंहह…ते नाही जे तुमच्या लगेचच डोळ्यासमोर आलं….)
“सच केह रहा है दिवाना…दिल…दिल ना किसींसे लगाना…”
रं.(आर)माधवन (आपला) त्याचा इमोशनल अभिनय,.. एकदम परफेक्ट…पण गाण्याचा मधल्या कडव्यात जो रं. माधवन रडतो ना….हाय रे मार डाला… एकदम फिदा…तो आपल्यासाठी नाही रडत आहे हे माहीत असूनसुद्धा त्याची कळ हृदयाला घायाळ करते ( लगेच युट्युब वर बघूनच टाका हे गाणं… बरं…का…??) मग तो खूपच आवडतो …
असो तर मूळ मुद्दा असा की त्याचे ते ऑक्सबोक्शी रडणे बघून…”मर्द को कभी दर्द नही होता..”.ह्या तत्त्वावर जोपासलेली पुुरुषीवृत्ती ,पुरुषांच्या खांद्यावर उगाचचा नुसता बडेजाव करण्यासाठीचं लादलेलं ओझं वाटतं… का त्यांनी रडूच नये का…त्यांचंही  मन भरून येत असेल…त्यांना पण कशाची तरी भीती वाटू शकते…दोन आसवे गाळले की एकदम हायलाईटच होतात…((बिच्चारे )….हा ही एक त्यातल्या त्यात वादग्रस्तच  शब्द आहे ☺️☺️)

प्रसंग १ : उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सर्व गावी गेलो होतो.नेहमीप्रमाणे आमच्या चिंतनने अतिउत्साहात त्याचा आवडता बॉल शेतातल्या झाडीत हरवला तसा हा जोर जोरात भोकाड पसरायला लागला.

शेजारचे म्हातारे काका तिथेच झाडाखाली बसून त्याची गम्मत बघत होते. न राहवून शेवटी ते बोललेच…अरे कोण रे तू…पक्याचा बारका का …कशाला रडतो रे …पोरीवानी…
हे ऐकून आमचे चिंतन महाराज लागले की चिंतन करायला…☺️☺️☺️

मी काय मुलगी आहे का…असं का बोलतात मला…

मी:अरे बाळा म्हातारे आहेत ते…. असं बोलू नये

चिंतन:पण माझा बॉल हरवला तर मी रडू नको तर  काय हसू …☺️☺️☺️

चिंतनचे विचारमंथन सुरू झाले…

चिंतन चं खरं तर काहीही चुकत नव्हतं,त्याचा प्रश्न एकदमच लॉजिकल होता…,रडण्यासाठी का हवं आहे मुलगा मुलगी भेद…मुलगा म्हणून चक्क रडूच नये का…

प्रसंग 2:(ठिकाण सोसायटीचे आवार.).. सात आठ मध्यम वयाची (मोठी छोटी) मुले…खूप मोठया आवाजातला गोंधळ…

अरेरे …क्या हुआ..क्यू मारामारी चालू है…गपचूप खेलो ना…

टोळी:  आंटी आंटी…वरदने बोला की…चिंतन लंडकीयो की तरह रोता है…इसलीये उस्को टीम मे नहीं ले रहे है…चिंतन को देखो आप सच मे लडकी की तरह रो रहा है…( तोंड झाकून सर्वांची फिदीफिदी… आणि फुसफूस…)

चिंतन ची स्वारी पुन्हा रडतच लिफ्ट मध्ये शिरली..

मी ही मग त्याच्या स्वतःहुनच माझ्याकडे येण्याची वाट पाहिली…

चिंतन : आई मला मुलांसारखं रडायचं …मला सांग ना मुलं कसं रडतात…
ह्या…!!!!☺️ऐकून हसू की रडू झालं…सारखं सारखं रडण्यावरील कमेंट ऐकून …त्याला काहीही सुचतच नव्हतं……त्याच्या रडण्याची प्रोसेसच हँग झाली होती वाटतं…
घरी आल्यावर नवऱ्याबरोबर बरंच घमासान मेंदूवादळ ( brain storming. )झालं ह्या विषयावर…
सकाळी उठल्यावर तो जरा गप्प वाटला म्हणून चौकशी केली तर तो म्हणाला, असू दे मी काय मुलगी आहे का…उदास होऊन रडायला…

(हा प्रसंग 3 …जो अनपेक्षित होता मला ☺️☺️☺️)
पुढची माझी प्रतिक्रिया ऐकल्यावर…आता काही खरं नाही…म्हणून तो स्वतःशी हसतच बाथरूम मध्ये पळाला…

रडणं ही किती स्वाभाविक आणि नैसर्गिक कृती आहे…

मग  लहान मुलांना ह्याचे उलटे धडे का गिरवले जातात.
अजूनही बरीचशी जनता रडणं हा फक्त स्त्रीयांचाच प्रांत मानतात…ज्या अर्थी हा कुत्सित टोमणा असतो… की घाबरून रडणं शोभत नाही पुरुषांना…परंतु घाबरून रडणं हे कुणालाच शोभत नाही… ना मुलीला ना मुलाला…
आणि स्त्री ही घाबरट असती…तर जिजाबाईचा शिवबा घडलाच नसता…ना…आईच्या संस्कारातच बहुतांशी अपत्याची घडण दडलेली असते…मग हा येता जाताचा स्त्रीवरून रडण्याचा शेरा का…???

(आणि दुर्दैव असं की बऱ्याचदा स्त्रियासुद्धा असंच मानतात…बोलतात…टोमण्यात ..? )

एक वेळ मान्य केलं की ती जास्त भावनिक आहे,रडून मन हलकं करते मग हीच गोष्ट पुरुषांनी केली… तर त्यात वावगं काय… केवळ पुरुष आहे म्हणून त्यांनी व्यक्त होण्याचाच अधिकार गमवणं किंबहुना त्यांच्या मेंदूवर ते बिंबवणं हे चुकीचं नाही का???…(मुलींना हसू नको सांगणारी आणि मुलांना रडू नको …व्यक्त होण्यावर जर लिंगांवरून बंधन बिंबवलं जात असेल तर…विचार करा…ह्याची नक्किच गरज आहे…?)

पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या समजुतीवरून जर काही विचार रोजच्या बोलण्यातून प्रसारित होतात तर आज आपण त्या विचारांना नाकारायला नकोत का…आपल्यातले पालकत्व ह्याची जबाबदारी घेत नाही का…

मुलांनाही रडू द्या आणि मुलींनाही…सोशिकपणा दोघांमध्येही आहे…आभाळ दोघांच्याही मनात दाटते…बरसण्याचा अधिकार दोघांनाही आहे…
पुरुषांच्या भावना जेंव्हा ओथंबतात ना…त्यातूनही मायाच पाझरते…काळोख सारा वाहून जातो…त्यामुळं नात्यांना एक नवी झळाळी मिळते.भावना कोंडून कोंडून होणारी त्यांची चिडचिड सहन करण्यापेक्षा चार अश्रू गाळून जर त्यांची सुटका होत असेल तर ती त्यांनी नक्कीच करावी…नव नवीन आव्हान स्वीकारायला…मग त्यांनाही नवीन उमेद नको का…

हसणे, रडणे,घाबरणे इत्यादी क्रिया किती स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे त्यात स्त्री पुरुष वाटाघाटी नको…वरून ते कोवळ्या वयात लहान मुलांच्या मनावर चुकीची समजुत ठसवतात.हीच शिकवणूक नंतर वागणुकीतून आपल्या जीवनात दिसू लागते.

अर्धेअधिक कलह,वादविवाद उगाचच मनात घर करून बसलेल्या चुकीच्या समजुतीपासूनच उत्पन्न होत असतात…नाही का…विचार नक्की करा ह्यावर…

मग कुणी आसपास बोललं की काय मुलींसारखा रडतोस…तेंव्हा तुमचे उत्तर तयार ठेवा…“मर्द को भी दर्द होता है…डोन्ट हेट टियर्स… लोकांनो…”

तर मी पुन्हा एकदा रडतानाही गोड दिसणाऱ्या आपल्या हॅन्डसम रं. माधवनला आठवून “पुरुषांनाही मोकळेपणाने रडू द्या रे…” संघटनेची सभासद ????..येथेच थांबते…भेटू पुन्हा कधीतरी …नवीन विषय …घेऊन…

———————-  पूनम तावडे लोखंडे.
(वरवर जरी सर्रासपणे वापरला जाणारा हा टोमणा …ही गोष्ट छोटी आणि विनोदी वाटत असली तरी ह्यात कुठेतरी नेहमीच्याच “स्री पुरुष वादविवाद ” …ह्याची मूळे रुजलेली दिसतात…त्यामुळेच हा विषय मी माझ्या पद्धतीने तस्साच मांडला आहे…

 • ..चिंतन हे येथे वापरलेले छोटेसे पात्र …..जे दर्शवत आहे नुकतीच विचार करायला लागलेली नी संभ्रमात पडलेली सर्वच लहान मुले …भावी पिढी…जी जवळ जवळ 96 टक्के अश्याच प्रश्नांनी तुमच्या विचारप्रवाहाला चालना देण्यास भाग पाडत असेल.
  लेख आवडल्यास न आवडल्यास कमेंट करून जरुर कळवा…?…)
 • ©️Punam Mahendra ,
  http://Punmayee.wordpress.com [2017_2019].
  Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to Punam Mahendra Lokhande and  ,http://punamtawade.wordpress.com with appropriate and specific direction to the original content.
Article Categories:
विनोदी

Comments

 • एकदम रास्त आवडलं बूवा आपल्याला! वर एक टोमणा आम्हा पुरूषांना रडता येत नाही तुम्ही बायका रडून दु:ख हलके करता. छान पुनम हसवत हसवत मध्येच रडवते पण तुझी लेखणी पण रडणं देखील गालातल्या गालात हसत हसत असते होना? ? ?

  Ujwala Rahane 12th ऑक्टोबर 2019 4:01 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा