#सत्ताकारण

Written by

लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी त्यांच्या हितासाठी तयार केलेले राज्य, मग तिथे ना कोणी राजा ना कोणी प्रजा.‌ समाजातील गरीबी हटावी, समाज स्वावलंबी बनावा यासाठी केलेली तरतुद.‌ पण खरच समाज स्वावलंबी आहे? खरच गरिबी गटली आहे?
नाही अजुन आपला समाज पुर्णपणे स्वावलंबी नाही. मुळात ज्याच्यामुळे सगळ्यांच्या घरात अन्न शिजते तो शेतकरीच स्वावलंबी नाही. आपल्या So Called राजकारणामुळे सावकाराच्या कर्जावर अवलंबुन राहवे लागत आहे त्याला.
उत्तम पीकासाठी निसर्गावर अवलंबुन आहे तो, आणि दुष्काळ पडला तर राजकारणावर अवलंबुन रहावे लागते.
आता गरिबी बद्दल बोलायचे झाले तर जरी आपला देश पुढे जात असला तरी गरीबी पुर्णपणे हटली नाही. देशात अजुनही गरीबांची संख्या भरपूर आहे, आणि त्यात पण गरीब शेतकर्यांची ज्यांना आपण बळीराजा म्हणतो. कसला ओ बळीराजा ज्याच्या‌ स्वत:च्या घरातच अन्न शिजेल का नाही याची शास्वती नसते.
अजुन पण अशी बरीच गाव आहेत जिकडे दैनंदिन जिवनावश्यक सोयी देखील अपलब्ध नाहीत.
पण काही फरक पडतो याचा! काही समाजसेवक व सामान्य माणसं जमेल तशी मदत करतात, पण लोकशाहीतील लोकांचे प्रतिनीधी मात्र सत्तेच्या हव्यासापोटी सत्ता कोणाची यातच गुरफूटुन राहिले आहेत.
कधी कधी प्रश्न पडतो खरच लोकशाही चा फायदा सगळ्यांना होतो??? खरच सत्ता कोणाची याचा काही फरक पडतो???

सत्ता‌ स्थापण कोणाची‌‌ याचा आता काहिच‌ फरक पडत‌ नाही,
कारण प्रतेक जण फक्त आणि फक्त‌ सत्तेसाठी हपापलेला आहे.
लोकशाही हि फक्त नाममात्र राहिली आहे,
राजकारणातलं समाजकारण कधीच‌ गळुन पडलय
आणि राहिल आहे फक्त सत्ताकारण.
सत्तेसाठी सत्ताधिकार्याकडुन केलेले राजकारण म्हणजे सत्ताकारण’.

Article Categories:
राजकीय

प्रतिक्रिया व्यक्त करा