सत्यवान सावित्रीचा……

Written by

 

@अर्चना अनंत धवड

 

 

सत्यवान सावित्रीचा……

अनघा तयार होऊन बसली होती… छानसा वन पीस गाऊन घातला होता… कपाट उघडताच पैठणीकडे लक्ष गेलं परंतु मनाशीच बोलली… नाही जमणार मला नेसायला. सगळे दागिने, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर असा सगळा श्रुंगार केला होता. स्वतः ला आरशात बघून लाजली… किती सूंदर दिसते ना मी… आज वटपौर्णिमा होती आणि ती अजय ची वाट पाहत बसली होती.. चार वाजता येतो बोलला… अजून कसा आला नाही… तीच मन गतस्मृतीत गेलं…

अनघा आणि अजयच अरेंज मॅरेज… चांगला कांदेपोहेचा कार्यक्रम होऊन लग्न झालेलं .अजय सॉफ्ट वेअर इंजिनियर आणि एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला…

नोकरीनिमित्त दोघे दिल्लीला राहत होते.. पहिली दिवाळी होती… अजयनी आठ दिवसाच्या सुट्या घेतल्या होत्या..

अनघा खुप खुश होती.. चार महिन्यानंतर माहेरी जायला मिळणार होत…

खुप शॉपिंग केलं होत.. आई बाबा आणि सासू सासरे दोघांसाठीही गिफ्ट घेतले होते….

सगळी तयारी झाली होती….. एकदम तीला आठवलं आपण लक्ष्मीपूजेला नेसायच्या साडीवरच ब्लाउज शिवायला टाकलं होत ते आणायची विसरली होती…

अजय, मी पाच मिनिटात ब्लॉऊस घेऊन येते… जवळच्याच बुटीक मध्ये दिलय…

तिनी स्कुटी काढली. आणि घाईघाईत निघाली….

अजय तयार होऊन बसला होता… कॅब बुक करायची म्हणुन मोबाईल हातातच होता….तेवढ्यात अनघाचा फोन आला…

अरे, आता हिला काय काम पडलं असं म्हणत फोन उचलला…

हॅलो, मिस्टर कोण बोलतेय…..

मी, अजय…. तुम्ही का फोन केला… आणि अनघा कुठे आहे.

मॅडम चा ऍक्सीडेन्ट झाला.

अजय चा छातीचा ठोकाच चुकलं. कुठे काय सगळी माहिती घेतली आणि अजय तडक घटनास्थळी पोहचला….

अनघा स्कुटी घेऊन डिव्हायडर वर पडली होती त्यामुळे तिच्या कमरेला लागले होते….

अजय नी ताबडतोब हॉस्पिटल मध्ये नेले. इतर कुठेही इजा झाली नव्हती… फक्त पाठीला लागल्यामुळे तीला चालता येत नव्हत….डॉक्टरांनी CT स्कॅन, MRl केलं. पाठीमध्ये फ्रॅक्चर होते. ताबडतोब ऑपरेशन थिएटर मध्ये नेले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऑपेरेशन यशस्वी झाले होते.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर तीला तपासायला गेले…

अनघा, कस वाटतंय आता…. बर वाटतं ना…

अनघा, थोडा पाय हलव….

तिनी पाय हलवण्याचा प्रयत्न केला…

डॉक्टर मला पाय आहेत का? डॉक्टर मला काहीच सेंसेशन होत नाही… ती जोरात ओरडली…

अजय तर प्रचंड घाबरला…. डॉक्टर पण तिचे पाय तपासू लागले… सुई टोचून पहिली,चिमटा घेऊन पहिला पण तीला काहीही सेंसेशन होत नव्हते…

डॉक्टरांनी परत सगळ्या तपासण्या केल्या… सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या .. पण काहीही उपयोग झाला नाही…

डॉक्टरनी अजय ला केबिन मध्ये बोलावले.
हे बघ अजय, अनघा आता चालू शकणार नाही… तिच्या नर्व्ह खराब झाल्या….

डॉक्टर मी कितीही खर्च करायला तयार आहे… मी तीला विदेशात पण ट्रीटमेंट साठी न्यायला तयार आहे…

नाही अजय, तू कुठेही नेलं तरी ती चालू शकणार नाही… कारण एकदा नर्व्ह खराब झाली की परत चांगली होत नाही.

चार दिवसात सुट्टी झाली… अनघा व्हीलचेअरवर घरी आली…. अजय तीला धीर द्यायचा…

अग तू ठीक होशील….

डॉक्टर नी सांगितल्यावर सुद्धा अजयनी अनघाला बऱ्याच डॉक्टरांना दाखविले… अगदी हकीम, वैद्य सुद्धा केले… होमीओपॅथी पासून नॅचरोपॅथी… सगळे इलाज केले पण अनघा चालू शकली नाही…

आणि ते सत्य दोघांनीही स्वीकारले…. अजय नी अनघाला विश्वास दिला की माझं तुझ्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही… आज दोन वर्षपासून ती व्हीलचेयर वर फिरते….आणि अजय पण अगदी प्रेमानी तिच्याशी वागतो.

अनघा मनात म्हणाली, आज वटपौर्णिमा, मागच्या वर्षी तर वर्षभर दवाखानाच पुरला त्यामुळे मनात असून वडाला जायला मिळाले नाही… आज मात्र तिने अजयला सांगितले की मला वडाच्या पूजेला जायचं आहे.. तू लवकर घरी येशील…

ती त्याची वाट बसली होती.

मोगऱ्याच्या सुगंधाने अनघा भानावर आली. तिने वळून पहिले तर अजयच्या हातात गजरा होता…त्यानी आपल्या हातानी गजरा अनघाच्या केसात माळला….तिची हनुवटी वर उचलत म्हणाला, खुप छान दिसतेस ग तू आज…..

चल आपण पूजेला जाऊ या…. अजय नी तीला व्हील चेअर वर बसविले आणि आणि गाडीतून वडाच्या झाडाजवळ नेले….

अनघा, तू फक्त नमस्कार कर.. मी पूजा करतो.

अजयने सगळी पूजा केली व वडाच्या झाडाला धागा गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या…. आज सत्यवानाने सावित्रीसाठी वटपौर्णिमा केली होती………. सावित्री भरल्या डोळ्यांनी ही पूजा पाहत होती….

©अर्चना अनंत धवड

मी दवाखान्यात काम करते… बायका नेहमीच नवऱ्याच्या आजारपणात साथ देतात पण बरेचदा लग्न झाल्या झाल्या बायकोला काही गंभीर आजार झाला तर, नवरे आजारी बायकोला माहेरी सोडतात, तर काही सेवा तर करतात पण चिडचिड करून… काही असेही अजयसारखे असतात जे प्रेमानी करतात……

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

शेअर करायचे असल्यास नावासकट करायला हरकत नाही

धन्यवाद

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत