सनकी भाग १

Written by

एक साधारण सत्तावीस -अठ्ठावीस वर्षांची मुलगी मलबार हिलमधील एका पॉश इमारती मध्ये असलेल्या साठाव्या मजल्यावर म्हणजे अगदी इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर लिफ्टने गेली . ती काया फॅशन हाऊस मध्ये शिरली .ती रागाने धुमसत होती.तिच्या हातात कसली तरी ब्याग होती .ती पाय आपटत त्या ऑफिसमध्ये गेली व एका तीस वर्षांच्या तरुणाच्या कॅबिनमध्ये घुसली. तिने ब्यागेतून एक ड्रेस काढला व त्या मुलाच्या अंगावर फेकला; तो मुलगा कामात व्यस्त होता .त्या मुळे तो दचकून उभा राहिला तशी ती मुलगी मोठं- मोठ्याने बोलू लागली.

मुलगी ,“ काय हीच का तुमची सर्व्हिस?” तणतणत बोलली.

मुलगा ,“काय झाले मॅडम?”

मुलगी ,“ हा माझा वेडिंग गाऊन तीन महिने अगोदर ओर्डर दिली होती .जो आज मिळाला .तो मला खूप टाईट होतोय .या साठी तुम्ही माझ्या कडून पाच लाख घेतलेत ना ?मग मुंबईतले सगळ्यात नावाजलेले फॅशन हाऊस आहे म्हणून इथे आले पण नाव मोठे आणि लक्षण खोटे ! दोन दिवसांनी माझं लग्न आहे हे नीट करून द्या आता ”असं ती रागाने तणतणत बोलत होती .

सगळा स्टाफ काम सोडून तिकडेच पाहत होता पण कोणाची हिम्मत नव्हती तिथे जाण्याची.हा सगळा गोंधळ एक तीस वर्षांची मुलगी तिच्या केबिन मधुन पाहत होती. ती तिच्या केबिन मधून बाहेर आली आणि त्या तरुणाच्या केबिनमध्ये गेली.ती केबिनमधून निघताच सगळा स्टाफ उठून उभारला. ती केबिनच दार उघडून आत गेली.तिला पाहून तो तरुण एसी मध्ये ही घामाने भिजला.

तरुण,“मॅम तुम्ही कशाला तसदी घेतलीत. मी पाहतो”तो चाचरत बोलला. त्याला हातानेच बोलण्याचे थांबवून.ती टेबला जवळ गेली फोन करून एका मुलीला कसलीशी फाईल घेऊन बोलावले; ती मुलगी फाईल घेऊन आली.तिने फाईल उघडली आणि बोलली,

ती,“तुमचे नाव काय आहे?”

मुलगी ,“सारा जैन ”जरा झटक्यातच बोलली

ती, “ age- 28,

Chest -41” ¼=10.25”

Waist- 40” ¼=10”

Shoulder-14” ½=7”

Length -58”. 58-16=42

Waist length -16”

Weight – 60

Am I right मिस सारा ” चेहऱ्यावरची एक ही रेष न हलू देता,तिने विचारले

सारा,“yes you are right पण ड्रेससाठी वजन कशाला घेतले होते ते नाही कळले मला” सारा बोलली.

ती ,“ तुम्ही अजून एकदा वजन करा या वजन काट्यावर उभं राहा प्लिज”

सारा ,“ व्हॉट द हेल इट इज?”अस ती तणतणत बोलली.

ती,“प्लिज”

सारा, “ओके ”अस म्हणून ती काट्यावर उभारली .

ती ,“63 किलो; तुमचं वजन तीन महिन्यात वाढलाय मग ड्रेस टाईट होईल नाही तर काय? वरून तुम्ही आम्हाला म्हणताय आमची चूक आहे ? ” हे बोलताना तिचा आवाज चढला होता

सारा हे सगळं पाहून जरा वरमली आणि म्हणाली

सारा,“ मॅम माझा गाऊन तेव्हढा नीट करून द्या प्लिज इट्स रिक्वेस्ट!”ती थोडी शांत झाली कारण चूक तिची आहे ते तिच्या लक्षात आले.

तिने गाऊन घेतला .तो उघडला व त्यावर तिने टेबलावर ठेवलेली कॉफी ओतली.

सारा,“ हे काय करतेस तू ;पाच लाखाचा ड्रेस आहे तो; त्याचे पैसे मी तुला आधीच दिलेत .”अस सारा ओरडली .

ती ,“शूssss ! ओरडू नकोस सुधीर या मुलीला पाच लाख रुपयांचा चेक दे आणि हकल; हा गाऊन खाली सिग्नलवर भीक मागतेय ना ती बाई तिला देऊन टाक”

अस म्हणून ती तिथून निघाली सारा व तरुण म्हणजे सुधीर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आ वासून पाहतच राहिले.

ती तीस वर्षांची मुलगी जी काया फॅशन हाऊसची मालकीण काया जयसिंग होती.तीन -चार वर्षांच्या छोट्या कालावधीतच फॅशन इंडस्ट्रीत एक ब्रॅण्ड एक मोठं नाव बनली होती.पण ती कोणाला भेटत नसे ,कोणाशी बोलत नसे ,ऑफिसमध्ये ही क्वचितच येत असे सगळं काम ती घरूनच करत असे तिच्या असिस्टंट सुधीर मार्फत. ती सगळ्यासाठी एक गूढ होती.ज्या लोकांना ती भेटे ते तिला सनकी म्हणत.

क्रमशः

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.