सहज सुचलं😂

Written by

 

सहज सुचलं
“ही वाट कोठे जाते!”

आम्ही सुट्टी म्हणून फिरायला गेलो, म्हटलं रस्ता थोडा शांत, रहदारी कमीच, आपणच चालवावी गाडी…..
डोक्यावर शस्त्र (हेल्मेट) चढवलं, आणि गाडी आता रस्त्यावर——– वळवणारच,एवढयात…….
“अहो, हो रस्ता कुठे जातो??
मी-तोंड फाडून🤔
परत, “अहो , ऐकताय ना, सांगा तरी हा रस्ता कुठे जातो?
मी- हा रस्ता कुठे काही बोलतोय😂
तो कुठे जात नाही? तो इथेच असतो 😝
पण एक मात्र खरं, आपल्याला जिथं जायचंय ना, याच वाटेवरुन आपण हमखास पोहोचतो.तो चालत नाही, आपणच चालायचं, मग पोहोचू की योग्य ठिकाणी…🙂

©️✍️लता राठी

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा