सह्यगिरीची बाळी

Written by

सह्यगिरीची बाळी

हिरवंगार रान वरती
मोकळं आभाय
खडकावरती बसलय
येक पाखरु गुमान

लुगडं नेसून बसलेय
कशी काटक ही नार
चवळीची शेंग जशी
दिसतेय झ्याक

सांजसावळा रंग हिचा
असे देखणं रुप
सह्याद्रीची कन्या ही
हिचं आम्हाला कौतुक

किल्ले संवर्धन मोहिमींत
घेते हिरीरीने भाग
उत्साह हिचा पाहून
पडतो डोंगरही चाट

कडेकपारी हिच्या सखेसोयऱ्या
लिलया सर करी
लिंगाणा,तैलाबैला
अन् तो सरळसोट वजीरसुळका

भिती न हिला मुळी कुणाची
कन्या असे ही सह्यगिरीची
मन मात्र असे म्रुदू
शहाळ्याच्या मलईपरी

मिळो सुवर्णा तुज तुझ्यापरी
वेडा गिरीप्रेमी
दोघं मिळून करा
मग खूप भटकंती

सुवर्णा नाम शोभे हिस
लेक वायंगणकरांची
यशवंत,किर्तीवंत होवो
ही सह्यगिरीची बाळी

———गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.