सांगा ना आई बाबा, माझे काय चुकले???

Written by

सांगा ना आई बाबा, माझे काय चुकले???

@अर्चना अनंत धवड

राहुल सोनल वर ओरडला.तिच्या कडे किल्ली फेकली अणि म्हणाला”तू जा अणि नेऊन दे बाबाकडे.तुला मोठेपणा घ्यायची हौस असेल पण  मला नाही अणि यानंतर मला चांगुलपणाच्या गोष्टी शिकवू नको”

सोनल च्या डोळ्यातुन अश्रू आले. फार वाईट वाटले. तिला चिडलेल्या नवर्‍याला समजावण्याचे धाडस नव्हते. खरच, काय चुकीच बोलतोय राहुल. किती दुखावला असेल न बिचारा. आपण इतक चांगले वागून आपले आई बाबा आपल्याशी अस वाईट कस वागू शकतात.

सोनल ला तिचा भूतकाळ आठवला.
सोनल अणि राहुल चा प्रेम विवाह. राहुल अभियंता, दिसायला रुबाबदार, हुशार. सोनल पण हुशार अणि सुंदर अणि समजदार . राहुल एक मध्यमवर्गीय परिवारातील तर सोनल श्रीमंत आईवडीलाची एकुलती एक मुलगी. सोनल च्या बाबांनी हुशार, होतकरू, मुलगा म्हणुन लग्नाला संमती दिली….

लग्न झाले. सोनल सासरी आली. दुपारी दोघी सासा – सुना बसल्या होत्या. सासुबाई म्हणाल्या बघ तुझ्या बाबानी किती दागिने घातले तुझ्या अंगावर. आम्हाला तर बाई काहीच मिळाले नाही. सोनल ला थोडे वाईट वाटले. ही माझ्याबद्दल ची असूया तर नव्हे? तिनी आपल्या मनाला समजावले.  छे, एका आईच्या मनात असूया कशी असू शकते.  आपले जुने दिवस आठवले असेल त्यांना. तिला सासुबाई बद्दल फार वाईट वाटले.तिनी ठरवले की आपण यांची हौस पूर्ण करायची.

राहुल ची कन्सल्टन्सी होती अणि सोनल ची सरकारी नोकरी.घर छोटे पडायचे.सोनल म्हणायची आपण वर घर बंधू या.राहुल नाही म्हणायचा.तो म्हणायचा आपण वेगळा फ्लॅट घेऊ या. इथे एवढे पैसे गुंतवून काहीच उपयोग नाही. सोनल त्याला समजायची.अरे पैसाच महत्वाचा नाही.अरे एकमेकाना साथ होईल.आपले मुले लहान आहेत.आपण बाई जरी ठेवलीय तरी आईच लक्ष राहील अणि तिनी  घर बांधायला राहुल ला तयार केल.कर्ज घेऊन राहुल नी घर बांधले. जवळच भाड्याने ऑफिस घेतले…

सासऱ्यांना सोनल चे खूप कौतुक… एक तर मुलगी नाही…. अणि सोनल सगळ अगदी प्रेमानी करायची….वेगळी जरी राहत असली तरी काही वेगळा पदार्थ केला की आवर्जून आणून द्यायची… दीराशी आपुलकीने वागायची… परंतु सासर्‍यांनी केलेले कौतुक पण सासू बाईला खटकायचे… एक वेगळीच स्पर्धा असायची सासुबाई ची सोनल शी….परंतु वरून वरून चांगल्याच वागायच्या. सोनल पूर्णतः दुर्लक्ष करायची…. सोनल ला विश्वास होता आपल्या चांगुलपणानी आपण सासुबाई च मन जिंकूच.. …

सोनल सासुबाई ची हौस पुरवावी म्हणुन भारी भारी साड्या, कधी मोबाइल कधी कानातल्या कुड्या भेट द्यायची…. दोघांचा दवाखाना, कुठे फिरायला जायचे असेल तर तिकीट सगळे राहुल करायचा… तरी बाबांना पेंशन होती… आपण वेगळे राहतो म्हणुन निदान पैशांनी तरी मदत करावी अस दोघांना वाटायचे….. तरी सासुबाई आपल्याशी अस का वागतात…. खूप प्रश्न पडायचा सोनल ला….

. लहान दिराचे लग्न झाले … सोनल नी हौसेने सासुबाई ला पाटल्या, सासर्‍यांना गोफ केला… सासरे खूप कौतुक करायचे. सासुबाई सगळ घालायच्या, पण काय झाल केल तर…. माझ्या मुलाची कमाई नाही काय, असा भाव असायचा….

लहान दिराची परिस्थिती थोडी नाजूक होती….खाजगी नोकरी अणि पगार थोडा कमी…. सोनल त्याला मदत करायला तयार असायची…पण तो आपल्याच तोऱ्यात असायचा…. एक वेगळाच द्वेष असायचा…. आता दीर, जाऊ अणि सासुबाई एक झाल्या होत्या… सासू बाईचे वागणे बदलले होते…. सासरे आताही सोनल ला जीव लावायचे पण आता सासुबाई अणि दीरा समोर त्यांचे फारसे चालत नव्हते…. सासर्‍यांनी जर भाग घेतला तर दीर भांडण करायचा…. सोनल विचार करायची… आपण वेगळे राहतो…. काही संबंध नसताना देखील का आपला द्वेष करतात हे लोक…..

अशा वातावरणात रहाण्यापेक्षा वेगळा फ्लॅट घेऊ या … असा विचार करून कर्ज काढून फ्लॅट घेतला…. फ्लॅट चे काम पूर्ण झाले… अणि सासू सासरे त्यांची जायची वाट पाहू लागले…. कारण त्यांना लहान मुलासाठी ते घर हवे होते… पण सोनल ची मुलगी बारावीत होती अणि क्लासेस इकडच्या एरियात होते.. त्यामुळे पुढच्या वर्षी शिफ्ट होऊ असा विचार राहुल अणि सोनल नी केला… सासुबाई ला वाटले हा जात का नाही… त्यांना वाटले हा घर सोडतो की नाही…. त्या सासर्‍यांच्या मागे लागल्या अणि सासर्‍यांनी राहूल ला स्पष्ट म्हटले कधी खाली करतो घर….. राहुल ला धक्काच बसला… स्वाभिमानी राहुलला फार वाईट वाटले…. .राहुल चे म्हणणे होते अरे, मी कर्ज काढून घर बांधले…. बर तुम्हाला लहान भावासाठी घर हवे होते तर स्पष्ट पणे सांगायचे ना… मी आनंदाने दिले असते….. परंतु आम्हाला तुमचे उपकार नको या वृत्ताने वागायचे अणि आई बाबा नी त्याला साथ द्यायची यामुळे राहुल खूप दुखावला गेलाय.. त्याला हेच कळत नाही की आपले काय चुकले….. आपण इतके प्रेमानी वागल्यावर सुद्धा आई बाबा असे का वागले… म्हणुन त्यानी किल्ली सोनल कडे फेकली….
सोनल ला आताही सासू सासर्‍यांच्या राग येत नाही…. तर तिला सासू बाई मध्ये एक आई दिसते….. अणि ती आताही आपल्या बाजूने चांगलीच वागण्याचा प्रयत्न करते….
आपण नेहमी बघतो की… बर्‍याच ठिकाणी आई वडील भेदभाव करतात…. आपल्याला भेदभाव दिसतो पण त्यामागचे कारण दिसत नाही…. सोनल ची परिस्थिती तिच्या दिरापेक्षा सधन आहे…. सासुबाई लहान मुलाला साथ, तो बरोबर अणि सोनल चुकीची म्हणुन देत नाही तर आई वडिलांना आपल्या कमजोर मुलांबद्दल जास्त सहानुभूती वाटते….  ते चुकीचे जरी वागले तरी ते कमजोर मुलांना साथ देतात…. अणि त्यामुळे नकळत भावा भावा मध्ये फुट निर्माण होते….. कदाचित आई वडिलांचे प्रेम सारखेच राहत असेल पण कमजोर मुलगा चुकीचा जरी असला तरी त्याला आई वडील साथ देतात…. अणि इथेच आई वडील चुकतात….. त्यांच्या अशा वागण्यामुळे भावा भावा मध्ये दरी निर्माण होते……

आई वडिलांनी समजून घ्यायला हवेत की प्रतेक जण आपले नशीब घेऊन येतो… त्यामुळे कुणी गरीब तर कुणी श्रीमंत असू शकतो…. तेव्हा कमजोर मुलगा भावाचा विनाकारण द्वेष करीत असेल तर त्याला साथ न देता त्याला समजवायला हवेत…. ज्याचे बरोबर आहे त्याचीच साथ द्यायला हवी. .
. सोनल तर समजली की असे वागण्यात सासू बाई चा दोष नसून तिच्यातील आईचा दोष आहे…. जिला कमजोर मुलासाठी जास्त जिव्हाळा वाटतो पण हे राहुल ला कस समजवणार….. तो तर हाच विचार करतोय की माझी काहीही चूक नसताना आई बाबा असे का वागले??

©अर्चना अनंत धवड

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

शेअर करायचे असल्यास नावासकट करायला हरकत नाही

धन्यवाद

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा