साईड इनकम साठी करा freelancing (घरबसल्या काम)

Written by

आज प्रत्येकाला स्वावलंबी बनायचे आहे, आर्थिक गरजांकरता साईड इनकम महत्वाचा असतो, त्यातलीच एक माहिती तुम्हाला मी आज देऊ इच्छिते जिथे इंटरनेट चा वापर करून कोणीही कमवू शकतो…
इंटरनेट च्या जमान्यात असे खूप सारे platform आहेत जिथे आपण online कामं करून पैसे कमवू शकू.

त्यापैकीच काही साईट्स खालीलप्रमाणे:

worknhire.com

ही एक local site आहे ज्यात खूप सारे projects पोस्ट होत असतात. भारतातील अनेक कंपन्या त्यांची छोटी मोठी कामं फुल टाइम workers पेक्षा कॉन्ट्रॅक्ट वर करून घेणं पसंद करतात.

freelancer.com

या साईट वर देशो विदेशातील लोकं त्यांना लागणारी कामं पोस्ट करतात. या साईट चे वैशिष्ट्य असे की अत्यंत गतीने काम दिली आणि घेतली जातात. प्रत्येक सेकंदाला नवीन काही प्रोजेक्ट ची enquiry आपल्याला दिसेल.

upwork.com

ही सर्वात टॉप ची साईट असून या साईट वर सहसा लवकर signup करता येत नाही, त्यासाठी आपले स्किल आणि अनुभव ताकदीचा हवा. पण एकदा आपली प्रोफाइल approve झाली की मोठमोठ्या देशातील प्रोजेक्ट्स आपल्याला मिळू शकतात.

fiverr.com

या साईट वर आपल्याला आपला portfolio म्हणजेच आपण केलेलं काम upload करून आपली प्रोफाइल बनवावी लागते, एक प्रकारे आपल्या स्किल्स ची जाहिरात आपण करतो आणि योग्य customer ला आपल्या पर्यन्त पोहोचता येते.

guru.com

या साईट वर graphic design आणि इतर काही प्रोजेक्ट्स ला डिमांड आहे. Online काम सुरू करण्यापूर्वी खालील काही महत्वाच्या गोष्टी: १. आपण स्वतःची माहिती अचूक आणि चांगल्या प्रकारे represnt करावी.

२. आपण पूर्वी केलेही कामे sample म्हणून जोडावे.

३. कंटेंट writing, डाटा एन्ट्री, c#, c++, java, moodle, whiteboard अनिमेशन, लोगो design पासून ते powerpoint प्रेझेन्टेशन पर्यंत प्रोजेक्ट्स आपल्याला मिळू शकतात.

४. “Bid” option: bid म्हणजे दिलेल्या प्रोजेक्ट वर बोली लावणे, तुम्ही जर नवीन असाल तर कमीत कमी किंमत लावा.bid करताना ते काम तुम्ही किती दिवसात, किती पैशांत कसे कराल हे विचारले जाते.

५. एखादे काम दिलेल्या deadline मधेच पूर्ण करावे, ही कामं अत्यंत professional असतात, इथे कुठलीही कारण चालत नाही.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत