सात समुद्रा पारच्या एका नाविकाची गोष्ट…

Written by

 

लग्न करेल तर आर्मी नाही तर नेव्ही ऑफिसरशी असे मी लहानपणा पासनंच म्हणायेच. शिपने विशवभ्रमण करणे हे तर माझ्या बकेट लिस्ट मध्ये अगदी प्रथम क्रमांक वर होते. ते स्वप्न खरेच झाले ३ जानेवारी २०१६ ला माझे लग्न रोशन या मर्चंट नेव्ही १st  engineer  शी झाले. लग्ना आघी मी खुप उत्सुक होते. शिपवरचे अनुभव ऐकून खुप जळायचे. ४ एप्रिल २०१६ ला ते परत शिपवर गेले. लग्नानंतर लगेच ३ महिन्याची ते मला सोडून गेलेत. त्यांचा चेहेरा सतत डोळयांसमोर यायचा. दिवस कटता कटे ना. whatsapp कॉल किंवा मेसेजेसवर आमच बोलणं व्हायचं. मी सारखी त्यांच्याशी भांडायचे. तुम्हाला माझी आठवण नाही येत, मला वेळ नाही देत, मला विचारत नाहीं, नुसतेच त्यांच्याशी शुल्लक -शुल्लक कारणांवरून वाद करायेच.

          इतरांप्रमाणे मलाही  वाटायचे कि, शिपवर राहाणे म्हणजे  नुसती मज्जा करणे, मस्त वेगवगळे पदार्थ खाणे जग फिरणे, खुप सारे पैसे कमविणे आणि घरी परत आले कि ४-६ महिने आराम…. नाविकांचे जीवन म्हणजे मस्त ऐश …………………. unexpectedly  एकादिवशीयांच्या कंपनी मधन मला कॉल आला . १५ जून ला मला शिपवर ज़ायचे आहे, असे ते बोलले. एकूणच माझा आनंद गगणात मावेना. अगदी  TItanic  चे शिप माझ्या नजरे समोर येवू लागले . माझे लहानपणा पासनचे स्वप्न पूर्ण होणार होते . जाण्याचा दिवस आला. पहिल्यादाच आंतरराष्ट्रीय प्रवास मी एकटे करणार होते. नागपूर ते दोहा , दोहा ते कायरो (इजिप्त ) नंतर ५ तास गाडीने प्रवास कडून सुएझ नंतर एक तास बोटचा प्रवास असा लांबचा मार्ग मला  गाठायचा होता .

मानत खुप भीती होती .पण नवऱ्याला भेटण्याची हुरहूर त्यापेक्षी जास्ती होती .अगदी सात समुद्र पार कडून मी कायरो ला पोहोचले एक अरबी एजेंट मला घ्यायला आला होता  .बघून आधी भीतीच वाटली पण बोलल्या नंतर भला माणूस वाटला तो. शिप अगदी समुद्राच्या मधोमध ऐंकर वर होते .रात्री १० ला बोट ने आम्हाला जायचे होते .मी अगदी सज्ज होते . सुएझ वरन बोटनी आम्ही निघालो . एवढा मोठा समुद्र मी पहिल्यादांच बघितला होता . खूपच भयावह नजारा होता तो.  काळा  किट्ट अंधार , सोसाट्याचा वारा , चमकणारा चंद्र आणि लाटांचा आवाज सारखा माझ्या कानाला छळत होते.

रात्रीचे जवळपास ११ वाजले होते दुरूनच  दिव्यांनी लखलखणारी शिप आम्हाला दिसली. एजेंट बोलला ” Your Dream Home Is There ma’am” बघताच डोळे लख्ख झाले. पहाडाएवढी शिप आणि मला बधून हात दाखविणारे रोशनराव दोघांनीही माझ्या ह्दयाचा ठोका चुकविला. मध्य रात्री चंद्र आणि तारे आमच्या भेटीचे साक्षिदार झाले. सगळं अगदी स्वप्न सारखा वाटत होते आणि तिथन माझा शिपचा प्रवास सुरु झाला. 

      हे पाहाटे ४ लाच वॉच वर गेले .मी उशिराच उठले . अवाढय समुद्र, गार वारा, जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी बघुन मन सुखावले. खूप सारे चॉक्लॉट्स, खूप सारी आईस्क्रीम , वाटेल ते खायला, कामाचे तर नो टेंशन नुसतेच खाणे, पिणे, झोपणे आणि मूवी बस ऐवढेच. ऐकल्या प्रमाणे नुसती एेशच ऐश… मला कधी उलट्या, सी सिकनेस, सर्दी, खोकला कसलाही त्रास झाला नाही. पाहाता पाहाता ५ दिवस निघून गेलेत.  नेक्स्ट पोर्ट       U .K मधील Hamburg होते . मला तिथे बाहेर जायला मिळणार होते. मी खूप उत्सुक होते. आम्हाला shore leave मिळाली. आम्ही खूप फिरलो , खूप वेगवेगळं खाल्लं , मज्जा  मस्ती करत रात्री १२ ला परत आलो . एवढी मज्जा आधी कधीच केली नव्हती .हे परत  पाहाटे उठुन वॉच वर गेलेत. माझं मजेदार रूटीन सुरु होत . पण यांच तस नसायचं काहीही झालं तरी त्यांना वॉच टिमिंग्स पाळावच लागायचे. पाहाटे ४ ते १२ मग दुपारी ४ ते ८ आणि पोर्ट वर असले कि १५ -१५ तास तर कधी २०-२० तास कामे करावी लागायची . वाटेला येईल तेवढी कामे ते करायचे .मी तर फक्त त्याची रूममेट होते .इतर वेळी त्यांचा आणि माझा काहीच संपर्क नसायचा.  यु .के जर्मनी , बेल्जीयम , फ्रान्स , स्वीडन, पार्तुगाल,, इटली, ग्रीस , सुएझ कॅनल सर्वच फिरून झाले होते .१ महिना भरकन निघून गेला . U.K. चा जर्मनी वरन रिटर्न कॉल होतो . ७ दिवसांची लाँग सॅलिंग होती . शांत असणारा समुद्र अचानक कोपु लागला. हवामान खूप खराब झाले . जोराचा वारा होता .सगळी कडे धुकेच धुके.   बाहेरचे काहीच दिसेना. समुद्रात आर्वत वादळ ( cyclone ) आले होते. शिप ५० ते ६०डिग्री स्विंग करू लागले. एकही वस्तू जागेवर राहेना . चालणे, उभे राहाणे, अशक्य झाले . कटेनर्सचा हलन्याचा आवाज येवु लागला . एवढ्या खराब परिस्थितीही हे नियमित वॉचला जायचे .पण मला न झालेले सगळे त्रास होवू लागले होते. डोके दिवस भर भारी असायचे .उल्ट्यांचा अलगद त्रास होवू लागला . रात्र रात्र झोप नाही यायची. इतरांसाठी हे काही नवे नव्हते. जेवणाच्या वेळी इतर क्रू मेंबर्स म्हणाले ” It’s just a trailer ma’am, long to go”, ऐकून धडकीच भरली . अन्नाचा एक घासही घश्याच्या खाली उतरेना. सतत ५ दिवसांच्या त्रासानंतर हवामान  बदलू लागले आणि समुद्र  शांत होऊन ३६ कोटी देवीदेवतांची आठवन करवून गेला .आता थोडा मोकळा श्वास घेत नाही तर भर दुपारी जोरात अलार्म वाजला . मी खूप झोपेत होते . खळबळून उठले .काय करावे काही कळेना . तेवढ्यात फोन वाजला . “लगेच लाईक जॅकेट घेवून ब्रिजवर जा”,असे हे म्हणालेत. आता काय झाले असावे . pairets बद्दल मी नेहमी ऐकायचे .माझ्या मेंदूला मुंग्या ऐवु लागल्या होत्या. ७-८ किलोचे लाईक जॅकेट घेवून टॉप फ्लोवरील ब्रिजवर  मी पोहचले . घामाने चक्क होवून गेले होते. मनात वाईट -वाईट विचार येत होते .मला इतक्या टेंशनमध्ये बधून  captain (शिप वाहक ) ) म्हणालेत “Don’t Worry Ma’am, It’s Just A Drill”. पण मागे पुढे काही झाले तर असच घावतपळत यावं लागेल .बापरे किती बर वाटले ऐकून. कसेबसे मी परत रूममध्ये आले. यांना सगळं माहिती असनूही मला उगचच घाबरविले म्हणून मी खूप रागात होते .

सकाळी पांढऱ्या शुभ युनिफाँर्म मध्ये हँडसम दिसणारा माझा नवरा पूर्ण ऑईलने भरून आला होता .रोज असच व्हायचे पण आज रागाच्या ओघात ओरडलेच मी त्याचावर ” काय हो , किती घाण केलाय युनिफाँर्म रोज काय ऑईलमध्ये लोळता काय?” रोज रोज मी हेच काम करायचे काय . मला रागात बघून ते शांतपणे बोलले. चल दाखवितो उदया तुला मी काय काम करतो ते. रात्रभर मला खूप खंत वाटली. उगाच मी ओरडले पण मनात खूप उत्सुकता होती. एवढ्या मोठे शिपचे इंजिन पहिल्यांदाच बघणार होते . पोटात गुडगुदया होत होत्या. लिफ्ट ने ग्राउंड फ्लोवर आलो .इंजिन रूमचे दार उघडताच मी कान बंद केले. खूप ककर्श आवाज होता. इंजिन रूम पूर्ण मोठ्या -मोठ्या मशिनरीज आणि पाईपने भरलेली होती. आत खूप गर्मी होती. जनरेटरचा खूप मोठयाने आवाज होत होता . ऑईलचा एक वेगळाच वास येत होता . बघता बघताच मी घामाने पूर्ण ओले झाले होते. पण इतर लोक आपली -आपली कामे करीत होती . यांनी मला सगळे समजवून सांगितले. एवढ्या आवाजाने आणि गर्मीने मी खूप irritated झाले होते . ते तर २०-२० तास काम करायचे इंजिनची सगळे कामे त्यांना करावी लागायची .कधी काय अपघात होईल काही सागंता नाही यायचे.घरी सगळं हाता हातात हवं असणारी व्यक्ति इथे एवढे परिश्रम करतो. रात्रंदिवस राबतो बघून माझे डोळे पाणावले. खरतर यात पैसा खूप आहे .पण जिवाला धोका त्या पेक्षाही जास्ती. 

माझा आणि आपण सर्वांचा केवढा मोठा भ्रम आहे. नाविक म्हणजे नुसती मज्जा , ऐश. माझा भ्रम चुकिचा ठरला .मी नुसतीच भांडत असायचे. मला वेळ देत नाही, माझी आठवण करीत नाही , फोन करीत नाही ,मी काय तर प्रत्येक नाविकांच्या बायका हेच करत असतात .पण प्रत्यक्ष पाहाता त्यांचा कडे खरच किती वेळ असतो . वॉच टाईमिंग अगदी वेगळे असतात. धड़ झोपही होत नाही. त्यात सततचे ADVANCE आणि RETARED यांनी वेळेचा पत्ताच लागत नाही .समुद्रात कधीही बदलणारे वातावरण .कधी काय होईल काही सांगता येत नाही. नकळत होणारे  अपघात. अथांग समुद्र, मोठ्यामोठ्या मशिनरी , खूप सारे ऑईल आणि आपल्या प्रेमळ आठवणी बस एवढंच असत त्यांच्या जवळ. आपण घरची ४ कामे करून थकुन जातो. ते लोक तर रात्रंदिवस मेहनत करतात .कितीही त्रास झाला, अपघात झाला तरीही आपल्या पर्यत त्यांचे टेन्शनस येवु देत नाही आणि आपण नुसतीच रडरड करीत असतो. मी २ महिन्यात कंटाळले ते हाई काही कामे न करता तर हे कसे राहत असतील. रात्रभर हेच विचार माझ्या मनात खुपत होते .२ महीने खुप आनंदात गेलेत.   सुएझ वरन मला परत ज़ायचे होते. पाणावलेल्या डोळ्यांनी आम्ही एकमेंकाना निरोप दिला . परतीचा प्रवास सुरु झाला .

      २ दिवस ईजिप्टला थांबुन मी गीजा पिरॅमिड बघायला गेले. सगळं एखाद्या स्वप्नाप्रमाने सुरू होते. असे वाटयचे चिमटा घेतला तर मोडेल की काय. देवाला लाख -लाख धन्यवाद करत होते . सगळे स्वप्न एकाच जन्मी पूर्ण झाले होते. शिपच्या प्रवासाचा हा अनुभव कधीही न विसणारा आहे . मला प्रत्यक्षात बघायला मिळालं माझा नवरा काय करतो. काही खूप चागले तर काही थरकाप सोडणारे अनुभव आलेत. माझा नवरा खुप मेहनत करतों. मला त्यांने निवडलेल्या व्यवसायाचा गर्व आहे.शिपवरन परत आल्यानंतर माझ्या मनात त्यांच्या विषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला. मी त्यांना अजून जवळून समजु शकले.मला अभिमान आहे कि माझा नवरा एक नाविक आहे. मी देवाचे आभारी आहे की मला ही संधी मिळाली आणि त्यापेक्षा त्या आई – वडिलांचे आभारी आहे ज्यांनी या शूर पुत्राला जन्म दिला……. 

 Not Everyone Can Bear The Dignity of this uniform, proud to be sailor’s wife…

 लेख आवडल्यास तुमच्या भावना नक्की कळवा….    

शुद्धलेखनाच्या चुकांना कृपया माफी द्यावी…. ??

©️अश्विनी  दुरगकर…✍?

 

 

 

 

 

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा