साथ दे तु मला( भाग-२)

Written by

( भाग-1 इथे लिंक वर वाचा.
https://irablogging.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a5%81-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7/)

व भाग-2 पुढील प्रमाणे –

दोन दिवस निघुन जातात. मानसीच्या एकाच क्षणात प्रेमात पडलेला मयंक तिला contact करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याला काही यश मिळत नव्हतं. मानसी मात्र चिंतेत असते सर्व आईबाबांना सांगावं का कि मयंकला हे लग्न मान्य नाही. परंतु त्यांचा उत्साह पाहून प्रत्येक वेळेस स्वतःला थांबवत होती.
दुसऱ्या दिवशी मयंकच्या घरी बोलणी करण्यासाठी पाहुणे मंडळी येतात सर्वानुमते लग्न साध्या पद्धतीने करायचे ठरते. तारीख ठरवली जाते आणि खर्च दोन्हीकडचे यांनी वाटून घेण्याचा निर्णय होतो .
मयंक च्या लक्षात येतं की मानसीने अजून घरी काहीच सांगितलं नाहीये परंतु तिने असं का केलं असे अनेक प्रश्न त्याच्या मनात असतात.तो बर्‍याच जणांना तिचा नंबर मागण्याचा प्रयत्न करतो परंतु सर्वजण त्याला चिडवून नंबर देणे टाळत असतात त्यामुळे मयंक गुपचूप आईच्या मोबाईल मधून तिचा नंबर घेतो.
मानसीची बहिण भूमी आज सकाळपासूनच शॉपिंगसाठी जाण्याचा आग्रह करत असते त्यामुळे संध्याकाळी शॉपिंग ला जाण्याचा निर्णय होतो व तेवढ्यात मानसीचा फोन वाजतो. मानसी फोन बघते तर अनोळखी नंबर असतो. मानसी फोन घेते व तिकडून आवाज येतो.
” हॅलो, मानसी सुर्वे का? मी नक्षत्र फॅशन इन्स्टिट्यूट मधून समर बोलतोय”.
मानसी-” हो बोला सर, मी मानसी बोलते”
समर- “मॅम, आपण फॅशन डिझायनरच्या पोस्ट साठी अप्लाय केलं होतं तर तुम्ही आज इंटरव्यू करिता येऊ शकाल का?”
मानसी-” हो सर नक्कीच येईल. किती वाजता येऊ ”
समर- “तुम्ही तीन ते चारच्या दरम्यान या आणि मला भेटा ”
मानसी- “ओके सर, थँक्स”

मानसी घरी सर्वांना सांगते व लगेच तयारीला लागते. भूमी जरा नाराजच होत।
भूमी-” हिचं हे असं असतं मध्येच. चार दिवसावर लग्न आणि मॅडमला नोकरीचे डोहाळे लागलेल.”
माणसी तिच्याकडे दुर्लक्ष करते व तयारी करत असते.
आणि बरोबर तीन वाजता मानसी ऑफिसमध्ये पोहोचते .
रिसेप्शनिस्टला इंटरव्यूबद्दल विचारते व रिसेप्शनिस्ट तिला थोडावेळ वेट करायला सांगते. मानसीच्या घरी भुमीची बडबड चालूच असते त्यामुळे तिची आईसुद्धा काळजीतच असते.
ऑफिसमध्ये बराच वेळ वाट पाहत असणाऱ्या माणसीला रिसेप्शनिस्ट एका केबिनमध्ये जाण्यास सांगते. मानसी ही घाईघाईने व जरा घाबरतच केबिनमध्ये प्रवेश करत.
समोरील व्यक्ती तिला बसण्यास सांगते व तिचा इंटरव्यू होत. तिच्या अनेक डिझाइन्स ही ती दाखवते व तिला काही दिवसातच ऑफिस जॉईन करण्यास सांगितलं जातं परंतु तारीख नंतर कॉल करून कळवू असं सांगतात .

मानसीही आनंदाने तेथून निघते. ऑफिसच्या बाहेर पडते तोच समोर तिला मयंक दिसतो. सोबत दोन व्यक्ती असता। मयंक त्यांना जाण्यास सांगतो व मानसी कडे येतो .
मयंक-” तू इथे?” आश्चर्याने विचारतो.
मानसी-” हो इंटरव्यू करता आले होते. काही दिवसातच जॉईन होणार आहे .”

मयंक-“ओ नाईस, माझंही ऑफिस याच बिल्डिंगमध्ये आहे सेकंड फ्लोअरला. चांगलं आहे लग्नाच्या अगोदर भेट तरी होत राहील .”

मानसी- “लग्न? पण तुला तर हे लग्न मान्य नाही ना. मग कशाला सर्वांचे भावनांशी खेळतो”

मयंक-” हो मला याबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं ”
मानसी-” हे बघ मयंक मला ह्या विषयावर चर्चा करण्यात काहीच रस नाही तू फक्त तुझा निर्णय लवकरात लवकर सर्वांना कळव म्हणजे झालं”

आणि ती काहीच न ऐकता तेथून निघून जाते.

घरी भूमी व आई मानसीची वाट पाहत असतात. माणसी आनंदातच पेढे घेऊन घरात येते.
मानसी-” हे घ्या पेढे मला जॉब मिळालाय आणि लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे”. भूमी -“अगं पण लग्नाचं काय तुझ्या? सासरच्यांना विचारावे लागेल ना.?”

मानसी-” मला नोकरी करायची आहे आणि हा माझा निर्णय आहे त्यात त्यांना काय विचारायचं वाटलं तर फोन करून कळवेल त्यांना जॉब मिळाल्याचं ”

भूमी-” अगं मानसी आता तूझं लग्न ठरले त्यामुळे तुझे सर्व निर्णय तेच घेतील आम्ही किवा तु नाहीस”

मानसी -“नाही ताई असं नाही होणार. माझ्या आयुष्यात काय करायचं हे मी ठरवणार आणि हो त्यांना नाही दुखवणार मी हेही तेवढच खरं ”

आणि ती तिथून निघून जाते.

मानसी सारखी साधी सरळ मुलगी अशी उत्तरे कसे देऊ शकते याचं भूमीला आश्चर्य वाटतं परंतु मनातून ती आनंदी असते थोडावेळ तिलाही वाटतं आपणही थोडसं धाडस केलं असतं तर आपलं आयुष्य वेगळं असतं.

मानसी तशी कुणाचेही मन दुखावणारी मुलगी नव्हती परंतु मयंक तिच्याशी जे काही वागला होता त्यामुळे ती दुखावली गेली होती आणि हे लग्न होऊ शकत नाही याची तिला खात्री होती .

संध्याकाळी मानसीचे बाबा घरी येतात मानसीच्या जॉब बद्दल कळतं व ते खूप आनंदित होतात.
बाबा-” काहीतरी गोडधोड कर आज. इतका आनंदाचा दिवस आहे” आईला उद्देशून बोलतात .

भूमी-” अहो बाबा पण नोकरी करायलाच हवी का आणि लग्न झाल्यावर घर आणि नोकरी कसं कळणार करणार माणसी सर्व?.”

बाबा -“करेल हो मला विश्वास आहे मानसी वर. ती नक्कीच सर्व सांभाळून घेईल”
बाबांचे शब्द ऐकून मानसी त्यांच्या गळ्यात पडते आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.

बाबा -“अगं वेडाबाई रडायला काय झालं? सगळं किती छान घडतंय आणि सासरही उत्कृष्ट मिळाले आहे तुला. नशीब काढलं बघा पोरींनं”
बाबांचे शब्द ऐकताच मानसीला मयंकच बोलणं आठवतं.

आणि तेवढ्यात मानसीचा फोन वाजतो. मानसीच्या सासूबाईंचा फोन असतो मयंकने मानसीच्या नोकरी बद्दल घरी सांगितलेलं असतं त्यामुळे त्या अभिनंदन करण्यासाठी फोन करतात व त्याच बरोबर उद्या सोनाराकडे लग्नासाठी सोनं खरेदी करण्यासाठी जायचं आहे असा निरोप देतात .

भूमी व आई-बाबा हे सर्व ऐकतच असतात .

भूमी -“आता उद्या नको काही काढू तुझं काम”
.
परंतु माणसी वेगळ्याच विचारत असते. आई बाबांपासून असं लपवून ठेवणं तिला पटत नव्हतं आणि ती बाबांना सगळं सांगण्याचा निर्णय घेते.

मानसी-” बाबा मला बोलायचं आहे तुमच्याशी ”

बाबा -“हो बोल ना ”

मानसी-” बाबा ,मयंकला मी पसंत नाही त्याला नाही करायचं माझ्याशी लग्न ”

आई- “काय? अग काही काय बोलतेस”

भूमी-” याच्यासाठीच म्हणत होते मी नको जाऊस इंटरव्ह्यूला. हिलाच करायचं नसेल लग्न आणि आता मयंकच नाव सांगते ”
.
मानसी- “अग मी का खोटे का बोलेल त्याने स्वतः कार्यक्रमाच्या दिवशी सांगितलं आहे मला.”

बाबा तर खालीच बसून घेतात. त्यांना काय बोलावे काही सुचत नाही.

आई-” हे बघ, तुझे थोडं कौतुक केलं म्हणजे तू काहीही वागशील असं होणार नाही. उद्या बाहेर जायचं आहे त्यामुळे काही काम काढू नकोस”
.
मानसी -“अगं आई पण. . . . ”
आई मानसीला मध्येच थांबवते.

आई-” बस आता, मला काहीच ऐकायचं नाही. माझी शपथ आहे तुला परत हा विषय काढला तर”

मानसी बाबांकडे बघते पण तेही काहीच न बोलता रूममध्ये निघून जातात .
क्रमशः

काय करेल माणसी? सर्वांना कसं सांगेल?.आणि मयंक त्याच्या मनातील भावना मानसीला सांगू शकेल का? यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.

©प्रज्ञा लबडे

कृपया नावासहित शेअर करा.
धन्यवाद

Article Categories:
प्रेम

Comments are closed.