“सार्थक जिवनाचे”

Written by

“सार्थक जिवनाचे”

आज जरा दमलो होतो म्हणून दुपारी च घरी निघालो.

शांततेत घरी निघाल्यामुळे रोज न जाणाऱ्या सर्वच गोष्टींकडे लक्ष जात होते. रिमझीम पाऊस सुरू होता. मन आपसुकच गावातल्या मातीच्या सुगंधाकडे वळलं. पावसात दुचाकीवरणं फिरणारी जोड़पी बघून सौं ची आठवण झाली आणि विचार केला की घरी जाऊन छान सौ च्या हातचा कड़क चहा घेऊन आपण ही त्यांना फिरायला नेऊ. आज काहीतरी वेगळ करूया. सौं न्ना सुखद धक्का देऊया. असं मनाशी ठरवून घरी आलो.

बघतो तर काय……

सौं ची कसलीतरी लगबग सुरु होती.

आवराआवर , पुसने, झटकने,सुरु होते.

showcase मधल्या special dishes, cups, glasses ओट्यावर कोणाची वाट बघत आहेत काही कळेना झाले.

सौ म्हणाल्या … “अहो, बरं झाले लवकर आलेत. आता आलेच आहात तर पटकन फ्रेश होऊन या बरं. मी चहा करते आणि मग … “

सौं न्ना अड़वत म्हणालो… “अहो हे काय सुरु आहे ?”

“कसली तैयारी ही?”

“कोणी येणार आहे का?”

ती “हो” म्हणाली आणि किचन मधे निघुन गेली.

मी फ्रेश होऊन आलो… चहा ready होता अगदी मला जसा हवा होता तसाच.

सौ तयार होऊन आल्यात..

भारीतली साड़ी, एक दोन दगिने, केसांचा अंबाड़ा ,त्यावर गजरा, हलकसं गुलाबी लिपस्टिक…

बघतच रहावे असा त्यांचा साज होता. अगदी लग्न झालेल्या दिवसांची आठवण झाली.

आता जरा पोक्त वाटत असल्या तरी चेहऱ्यावर तेच तेज आणि हास्य कायम होतं.

माझी लागलेली तन्द्री मोडत सौ म्हणाली “हे घ्या तुमच्यासाठी छान ड्रेस आणला, हा घालून ready होऊन या.”

मला काही कळेच ना कि यांच काय चालले आहे.

माझ्या मनातले हिने ओळखले आणि म्हणाली.. “अहो”, सांगते की, आज आमच्या महिला मंडळानी चालू केलेल्या उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने आज छोटासा कार्यक्रम ठेवला आहे आणि आज हा कार्यक्रम आपली मुले साजरी करत आहेत . आम्ही फक्त त्यांना मदत करत आहोत.”

“आमच्या लग्नाला 40 वर्ष झालेत ते ही आजच की हो…”

लग्न होऊन बरीच वर्ष झाली होतीपण आम्हाला मुलबाळं होत नव्हते म्हणून सगळे नातेवाईक, शेजारी नेहमी सौं ना काही ना काही बोलायचेच. बरं दवाखाने, देव देव, उपास,व्रत,वारी ,नवस सगळे करूनही हाती काहीही नव्हते.

सगळे उपाय करून झाल्यावर आम्ही एखादं मूल दत्तक घ्यावे असे ठरवल होतं. सगळी जमवाजमव सुरू झाली.

अनाथ आश्रमात जाऊन कायद्याने मूल दत्तक घ्यायचे ठरले आणि एक चांगला दिवस बघून निघालो.

दोघांच्याही मनात फार विचार सुरु होते.

सौ तर गप्प गप्प च होत्या.

गाडीच्या काचातुन त्या फक्त बाहेर बघत होत्या.

मधेच सौ म्हणाल्या .. अहो आपण एकचं मूल दत्तक घेणार आहोत का ? मी गाड़ी कड़ेला लावली आणि आमच्यात फार मोठं disscussion सुरू झाले.

सौं ची ईच्छा बदलली होती. त्यांना एकच मूल नको होते

आणि मग काय आम्ही घरी परत आलो.

मैडम लगेच कामाला लागल्या. काही दिवसांत ह्यांनी ज्यांना मुलबाळं नाहित पण मुलांविषयी प्रेम असणाऱ्या अशा काही महिलांना जमवून भीशी सुरु केली.

त्यातून येणाऱा पैसा त्या काही अनाथ , गरीब, मुले ह्यांच्यावर खर्च करणार होत्या.

किमान 500 रुपये ची भीशी सुरु झाली. दर महिन्यात ज्या ची भीशी लागेल त्यांनी या मुलांसाठी काही उपयोगी वस्तु घ्यायच्या असे ठरले.

आणि हा उपक्रम चालू झाला तो ही आमच्या लग्नाच्या वाढदिवसापासून.

काही दिवसांतच महिला मंडळ मोठे झाले.

नवनवीन उपक्रम सुरु झालेत.

नंतर काही गरीब, अनाथ मुले , भिक मागणारी अशी मुले शोधून त्यांना समजून-समजाऊँन 4 ते 5 मुले जमवलीत. त्यांना शिक्षण , शालोपयोगी वस्तु देणे असा हा उपक्रम होता. त्यात नंतर जेवण, काही जीवनावश्यक वस्तु देणे अश्या अनेक गोष्टी वाढत गेल्या. हळुहळू मुलांची संख्या ही वाढत गेली…

अनेकांनी मदतीला हात पुढे केलेत.

ज्यांना पैशांनी मदत करता येत नव्हती ते स्वतः मदत करायला पुढे आलेत जसे कोणी शिक्षक होऊन तर कोणी स्वयंपाकाला मदत करायला पुढे आलेत.

नंतर काही वर्षांनी ” मातृछाया” ही छोटीशि संस्था त्यांनी चालू केली.

काय चमक होती त्या दिवशी ही च्या डोळ्यात.

ती च चमक ,आत्मविश्वास ,आनंद आज ही होता.

सौ. आज कितीतरी मुलांची आई, आया, शिक्षिका, मार्गदर्शिका, सर्वस्व होती.

मी माझ्या भावनांना आवर घातला आणि कार्यक्रमात सहभागी झालो.

सौं चे भाषण झाले. त्यांना आपल्या मुलांची काळजी होती आणि अभिमान ही होता. भरभरूंन बोलत होत्या त्या आज.

तेव्हा मला कळले की आज आमच्या सौ फक्त माझी बायको नाही तर ही ह्या सगळ्या मुलांची आई आहे.

आणि मला तिचा अभिमान आहे.

क्षणिक सुखाच्या मागे तर आपण सगळेच आहोत.

परंतु या समाजाचे आपण देणे लागतों, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अस सगळेच म्हणतात पण सुरूवात आपण करायला हवी हे कोणालाच मान्य नसतं आणि हीच सुरुवात आमच्या सौं नीं केली.

“जीवनाचे सार्थक झाल्याचे आज समाधान होते सौं च्या डोळ्यांत आणि माझ्याही।”

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत