“सार्थक”

Written by

भावनिक झालेल्या रमाबाई बोलत होत्या…

गावातल्या जमिनी सावकाराच्या ताब्यात… लाचारी आणि प्रत्येक घासासाठी तरसणारी मुलंबाळं…

मी घरच्यांचा विरोध पत्करून गावातल्या बायांना एकत्र करून लढण्याची उमेद दिली…

लोकांच्या शिव्या-श्राप,दगड-धोंडे,चारित्र्याचे शिक्के सगळं अंगावर घेतलं…
जीवे मारण्याचेही प्रयत्न झाले…

पण जेव्हा प्रत्येकाची जमिन घरातल्या-बाईने परत आणली तेव्हा मात्र अक्खा गांव आमच्यासोबत होता आणि सावकार लोकं एकटे…

आता अनेक गांव या चळवळीत सामील होत आहेत…

कुठल्याही अडचणी आम्ही मिळून सोडवतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला फार समाधान मिळतं…

विश्वास होतो की आपलं आयुष्य सार्थकी लागत आहे.

कारण आपण सगळे इथे विशिष्ट उद्देशाने आलो आहोत…

दाटून आलेला हुंदका सावरत रमाबाईंनी सगळ्यांना हसत अभिवादन केले…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा