साला एक मच्छर ………

Written by

दुनियाभरचा राग काढायला माझ्याकडे अगदी हुकुमी मंडळी आहेत; ती स्वतः हुन येतात माझ्याकडे, आणि मी पण दे दणादण हात धूऊन घेते.

नाही नाही पोरं नाहीत हं माझी (ती मलाच धुतात), आणि नवरोबा तर अजिबातच नाही.(त्याला डोळे वटारणं पुरतं)???

ही आहेत वन ऍण्ड ओन्ली महावस्ताद D कंपनी म्हणजेच डास कंपनी हो…………

ही कंपनी एवढी कोडगी आहे की कशाला म्हणजे कशाला जुमानत नाही. ओडोमॉस लावा, ऑल आऊट लावा, गुडनाइट चा नॉर्मल मोड लावा, ऍक्टिव्ह मोड लावा, फॅब्रिक रोलचे चार ड्रॉप लावा, मेले साऱ्यांना पुरून उरलेत.

नाही म्हणायला त्या बॅटची शॉक ट्रिटमेन्ट बरी पडते, पण प्रत्येक वेळेला ती काय जवळ असते, आणायला पळेपर्यंत दिसलेला डास छुमंतर होऊन जातो. खूप डास मनसोक्त हुंदडत असतात आमच्या घरी, असं काही नाहीये, ते आपले हळूहळू गटागटाने येतात, साधारण चार पाच जणांचा गट असतो, तो धारातीर्थी पडला की दुसरा….मग तिसरा आणि त्यांना चारी मुंड्या चीत करणारी अर्थातच मी आणि माझे दोन हात असा गेम सुरू असतो नेहमी !!!

साला एक मच्छर ………(पुढचं तुमचं तुम्हीच गात बसा?)

एकदम तरबेज झालीये मी आता डासमारेगिरी करण्यात ,अपनी नजरसे और हाथसे एक भी मच्छर छुटता नही मालूम……… ?

खरंतर अगोदर आम्ही एकमेकांकडे ढुंकूनही बघत नव्हतो, पण एकदा त्यांच्यातल्या त्या डेंगीणीने माझ्या पोरीला हॉस्पिटल वारी घडवून आणली, आणि मग बस्स…… मैंने मेरे रास्तेमे आनेवाले हर डास की खांडोळी खांडोळी करनेकीं कसम खाली, how dare you to take माँ से पंगा, हा ????

आणि त्या डासांनीही काहीही झालं तरी माझ्यासमोर शरणागती पत्करायची नाही अशी कसम खाल्लेली असावी बहुतेक, कारण जरा म्हणून मला छळायची संधी सोडत नाहीत अगाऊडबडे.

आता बघा ना, रात्री मच्छरदाणी लावून देखील एखादा डांबरट डास चोरपावलाने आत घुसतो, महत्प्रयासाने झोपलेला पोरगा; डास बघ ना मम्मी उगाच पप्प्या घेत बसलाय म्हणून वळवळत उठून बसतो.

बघ डासा , झालं गेलं विसरून मी तुझ्या चाव्याला पप्पीचं नाव देऊन, तुला संधी देऊ केली, म्हटलं कशाला अजाण जीवाच्या मनात तुझ्याविषयी स्वतःहून राग निर्माण करायचा, पण नाही तू काही संधीच सोनं केलं नाहीस, तू ही आमच्यासारख्याच निघालास, स्वतःच्या हेकेखोर तत्वांना चिकटून बसणारा…….तुझा पण नारा आमच्यासारख्याच वाटतं?

हम नहीं सुधरेंगे, थोडा और बिघडेंगे ……..

Ohh no…… ट्रॅक सुटला माझा?

डासमारेगिरी करता करता कुठे पोचले मी……..

Sorry ha , extremely sorry ?

 

©️स्नेहल अखिला अन्वित

 

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा