सावर रे…. (प्रेम कथा) भाग 2

Written by

© शुभांगी शिंदे 

सावर रे….

भाग 2

काया आज सकाळी जरा घाईतच निघत असते कारण आज तिच्या पेंटिंगच exhibition होत… तिने दादालाही आठवणीने उपस्थित राहण्यास सांगितले पण नेहमीप्रमाणे तो त्याच्या फोनमध्ये व्यस्त होता… ड्रायव्हरला सुचना देऊन ती exhibition center ला निघाली… अर्ध्या रस्त्यावर येऊन गाडी अचानक धक्के खाउ लागली… ड्रायव्हरने खाली उतरून गाडी चेक केली..

ड्रायव्हर : मॅडम गाडीचा गॅसकीट उडाला आहे…

काया : काय??? काय उडालाय?? (काहीच न कळल्यामुळे)

ड्रायव्हर : गाडी गॅरेजमध्ये न्यावी लागेल….

काया : Ohh no…. shittt…. ( रागात गाडीला लाथ मारून)

थोडा विचार करून कॅब बुक करते… पण कॅब यायला पण पंधरा मिनिटे लागणार होती… त्यामुळे ती अजूनच चिडते… तेवढ्यात एक काळी स्कोडा गाडी बाजूला येऊन थांबते… त्या गाडीतून दिपक बाहेर पडतो….

दिपक : Good morning Kaya…. इथे काय करतेस ??? (मुद्दाम चिडवत)

काया : (आणखी चिडून) morning walk करतेय… दिसतय ना??…. गाडी बिघडली आहे माझी आणि मला urgently… Exhibition center ला जायच आहे…

दिपक : Just chill…. हव तर मी सोडतो… On the way च आहे….

काया काहीच ओपशन नसल्याने त्याच्या गाडीत बसते… गाडीत ड्रायव्हर सीटवर कबीर बसलेला असतो… तो तिला hii करतो पण ती इग्नोर करते…

दिपक : कसल exhibition आहे.. ??

काया : paintings च…

दिपक : Ohhh really… आम्ही पण येतो…

कबीर : आपल्याला मीटिंगला जायचे आहे… हा फालतू टाईम पास नको… माहित नाही ते चित्र विचित्र रेघोट्या ओढलेले त्या कागदाला काय म्हणून लोक न्याहाळत असतात कोण जाणे….

काया : (आता तिला जरा जास्तच राग येतो) तुम्हाला नाही कळणार ते….

थोड्याच वेळात ते लोक सेंटरला पोहचतात… कबीर नाही म्हणत असतानाही दिपक त्याला आत घेऊन जातो आणि एक एक करत पेंटींग पहात असतात… एव्हाना बऱ्यापैकी गर्दी जमलेली असते… ते दोघ एका पेंटिंग जवळ येऊन थांबतात… काया पण तिथे येते…. दिपक त्या पेंटिंगची तारीफ करत असतो तसा कबीर एक एक नुक्स काढायला लागतो…. काहीही हे काय रेघोट्या मारल्या आहेत आणि लोक हे लाखो रुपये खर्च देऊन विकत घेतात…. तुला सांगतो जर कोणी खरच हुशार असेल तर या अशा रंगोट्या विकत घेणार नाही…. दिपक कबीरला शांत करतो कारण त्याला माहित असत की ह्या कायाच्या पेंटिंग आहेत….

काया : (रागात जाऊन कबीरला मागे खेचत) Hey Mr.. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जाऊ शकता… दिपक तुझ्या फ्रेंडला इथुन घेऊन जा….

दिपक : okkk we are going….

इतक्यात तिचा मॅनेजर तिथे येतो…. आणि तिच्या सर्व paintings विकल्या गेल्याच सांगतो… काया खूप खुश होते…. जवळपास पन्नास लाखाला तिच्या paintings विकल्या जातात पण खरेदी करणार्‍या माणसाने त्याच नाव गुप्त ठेवलेले असते …. मॅनेजरने दिलेला पन्नास लाखांचा चेक ती मोठ्या अटीट्युड ने कबीरला दाखवते… आणि परत नाक उडवून तिथुन निघून जाते…. कबीर तिला बघून मनोमन हसतो….

इथे बिझिनेस प्रपोजलमूळे राजेश आणि कबीरची ओळख वाढत चालली होती… अशाच एका बिझिनेस प्रॉफिटमूळे राजेशने त्याला आणि दिपकला घरी जेवणाचे आमंत्रण दिले… ठरल्याप्रमाणे दोघेही राजेशच्या घरी आले… दारावर बेल वाजली तर कायाने दार उघडले…. समोर कबीरला बघून तिला रागच आला पण मागून राजेश आला आणि त्यानेच त्यांना आमंत्रण दिलंय हे सांगितल्यावर ती तिचा राग तात्पुरता आवरते… कबीर आत येतो तसा काया मागून त्याला चिडवते हे कबीरच्या लक्षात येऊन तो मागे वळतो तस ती काहीच नसल्याच भासवते…

काही औपचारिक गप्पांनतर ते चौघे जेवायला बसतात… आज कबीरची चांगलीच खोड मोडायची अस ठरवून काया मेडला काही सुचना देते…

राजेश : चला सुरूवात करुया….

कबीर : हो… (आणि समोर असलेल सुप प्यायला लागतो)

तसा त्याला ठसका लागतो… (अती तिखट असल्यामुळे)

राजेश : Are you okk????

काया : (प्लान वर्क झाला म्हणून खूश आणि कबीरला चिडवून) तिखट जमत नाही वाटतं….

कबीर समजून गेला की कायानेच हे केल आहे पण तो काही न बोलता गप्पपणे सूप पीत राहतो… सूप खूपच तिखट होत… नाका तोडांतून पूर्ता धूर निघत होता… कबीरचे डोळे लाल झाले होते आणि डोळ्यातुन पाणी येत होत…

काया आधी तर मनोमन खूप खुश होती पण आता कबीरची अवस्था पाहून घाबरली होती कारण दादाला जर कळल तर आपली खेर नाही हे तिला माहीत होतं… एक बाउल सूप संपवल्यावर कबीरचा संयम तुटला आणि त्याने wash basin चा रस्ता विचारला त्याला राजेशने दिशा दाखवताच तो पळत सुटला… बेसिनमध्ये जाऊन त्याने गार पाण्याचे थबके तोंडावर मारले… फ्रिजच गार पाणी गटा गटा प्यायला…. तोंडाची नुसती आग आग झाली होती…. काय कराव काहीच सुचत नव्हतं… खिशातला रुमाल काढून त्याच्यात तोंड दाबल…. पण सगळ व्यर्थ…. बर्फाचा तुकडा तोंडात कोंबला आणि डोळे मिटून ती आग शांत होण्याची वाट पाहू लागला….

त्याची गंमत पाहण्यासाठी त्याच्या मागोमाग आलेली काया आता त्याची तडफड बघून कासावीस झाली होती पण तस न दाखवता तिने गुळाचा खडा त्याच्यासमोर धरला… त्याने तिच्याकडे पाहिलं… तिने पुढे केलेल्या हाताला धरून तिला स्वतःकडे ओढल आणि काही कळायच्या आत आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले… तिने स्वतःला सोडवण्याचा अतोनात प्रयत्न केला पण पुढची दोन मिनिटे तरी तिला ते जमल नाही…. काही क्षणाने त्याने तिला सोडल आणि त्या हातातला गुळाचा खडा आपल्या ओठांनीच तिच्या तळहातावरुन उचलून खाल्ला…. कायाने रागाच्या भरात त्याच हाताने त्याच्या गालावर आपली पाच बोटे उमटवली….

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 3 इथे वाचा ?

काया : (एकदम दचकून) तु इथे आणि या वेळेस???कबीर : (मिश्किल हसत) सुप खूपच तिखट होत… म्हणून परत तोंड गोड करायला आलोय…….

Geplaatst door ईरा op Donderdag 29 augustus 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा