सावर रे… (प्रेम कथा) भाग 3

Written by

© शुभांगी शिंदे 

सावर रे….

भाग 3

कायाने रागाच्या भरात त्याच हाताने त्याच्या गालावर आपली पाच बोटे उमटवली…. तसा तो कायाच्या अजून जवळ जाऊ लागला… आता काया थोडी चलबिचल झाली…. आता हा काय करणार या विचाराने ती आपल पाऊल मागे टाकत असते… तसा तो आणखी जवळ जाऊ लागला…. तसा मागून राजेशचा आवाज ऐकू आला…. तसे ते दोघेही परत जागेवर येऊन बसतात…

राजेश : कबीर…. Any problem???

कबीर : काही नाही…. सूप खरच खूप छान आहे…. आवडला मला… (कायाकडे बघून गोड हसत)

काया : (रागात ) घ्याना अजून थोड सूप….

कबीर : नाही नाही ठीक आहे… माझ पोट भरल…. (घाबरून)

जेवण झाल्यावर दिपक आणि कबीर घरी जातात…. काया सुद्धा थोड्यावेळाने झोपायला जाते… पण तिला सारख बैचेन वाटत असत… न राहवून सारखा मगाजचा किसचा प्रसंग आठवत असतो… त्याचा तो स्पर्श, त्याच्या परफ्यूमचा मंद सुवास तिला बैचेन करत असतो… मोठ्या मुश्किलीने तिला शांत झोप लागते…. रात्री अचानक तिला जाग येते…. शरीर पूर्ण घामाघूम झालं होतं ती अस्वस्थ होऊन उठून बसते…. घड्याळात बघते तर बारा वाजायला दहा मिनिटे बाकी असतात… घश्याला कोरड पडल्यामुळे ती पाणी प्यायला जाते पण टेबलावरच्या जग मध्ये पाणी संपले होते म्हणून ती उठून किचनमध्ये जाते… फ्रिजमधली पाण्याची बाटली घेऊन तहान भागवते…. परत रुममध्ये जाण्यासाठी मागे वळते तर समोर कबीर उभा असतो….

काया : (एकदम दचकून) तु इथे आणि या वेळेस???

कबीर : (मिश्किल हसत) सुप खूपच तिखट होत… म्हणून परत तोंड गोड करायला आलोय…. आता तुला नाही सोडणार….

काया : (थोडी घाबरून) हे बघ मी दादाला बोलावीन…. तु जा इथुन…

कबीर : बोलव…. तो गार झोपला आहे… (परत हसून तो कायाच्या जवळ जातो… )

काया त्याला तिथून जाण्यासाठी सांगत असते पण तो अजूनच तिच्या जवळ जातो… आपला उजवा हात तिच्या कमरे भोवती घेऊन तिला स्वतःच्या जवळ ओढतो… कायाच्या चेहर्‍यावरून घामाची धार ओघळून मानेवर उतरते… ती आता पूर्ती घाबरते… तो तिला अजून आपल्या जवळ ओढून आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवायला जातो तशी ती दादा…. दादा… म्हणून जोर जोरात हाक मारु लागते…. आणि….. आणि…. घाबरतच झोपेतून उठते…. आपण स्वप्न बघत होतो हे तिच्या लक्षात येत…. डोळे चोळत घड्याळ बघते तर घड्याळात बारा वाजलेले असतात…

Happy birthday to you… 
Happy birthday to you… 
Happy birthday… happy birthday… 
Happy birthday to you….

काया : दादा…. (अगदी लाडिक)

राजेश : Happy birthday काऊ…. (कायाला मिठी मारून)

काया : Thank you…. दा…. (समोर सजवून ठेवलेले गिफ्ट पाहून) आsss… हे सर्व माझ्यासाठी?? Love you भाई… Thank you….

राजेश : You’re welcome बच्चा… झोप आता सकाळी उघडून बघ सगळे गिफ्ट्स…. ( आणि तो दार लावून जातो)

काया एक मस्तपैकी आळस देते आणि आपण स्वप्न पाहत होतो हा विचार करून मनोमन हसते… समोर लहान मोठे गिफ्ट्स सजवून ठेवले होते त्यावर एक नजर फिरवते… अचानक तिची नजर एका ठिकाणी येऊन थांबते… समोर एक गडद लाल रंगाच गुलाब असत सोबत छोटस ग्रिटींग… त्यावर एक मजकूर लिहीलेला असतो….

A beautiful rose for a beautiful woman…
Happy birthday Kaya….

रोझ आणि कार्ड बघून ती खूप खुश होते… ते फूल आणि कार्ड असच हृदयाला कवटाळून ती बेडवर पडते… कोणी दिल असेल हे??? याचाच विचार करत झोपी जाते…

सकाळी अगदी हॅपी हॅपी मूड मध्ये ती उठते… छान तयार होऊन आरशात स्वतःलाच न्याहाळत असते…आणि स्वतःशीच बोलते…. “Happy birthday Princess…” स्वतःलाच आरशात बघून flying kiss देते…

बाहेर हॉलमध्ये येते तिथे एक गुलाबांच्या फुलांचा गुच्छ आणि एक मोठ चॉकलेट ठेवलेल असत…. पुन्हा एक मेसेज….

Again a beautiful roses for a beautiful Princess….
तुझ्यातला या चॉकलेट सारखा गोडवा या फूलांप्रमाणे बहरत राहो….

काया या सगळ्या सरप्राइज ने खूप खुश होऊन जाते… पण दिवसभर बर्थडे सेलिब्रेट करायला कोणच नसत… दादा आॅफीसमध्ये बिझी… संध्याकाळी पार्टी आणि पार्टीत गेस्ट कोण तर दादाचे बिझिनेस फ्रेंडस… How borring…

आपल्या कॉलेज फ्रेंडसना घेऊन मुवी आणि शॉपिंगला जाते… संध्याकाळी घरी आल्यावर दादा तिला तयार होण्यास सांगतो… आज बर्थडे बाहेर सेलिब्रेट करु अस सांगून तिला तयार होण्यास सांगतो… काया सुद्धा जास्त आढेवेढे न घेता छान तयार होऊन येते…

लेमन कलरचा ओफ शोल्डर लॉंग प्रिंसेस गाउन… पीनप करून मोकळे सोडलेले केस… कानात हिर्याचे स्टडस्…. हातात साजेसा wrestle… अगदी परी सारखी दिसत होती ती… राजेश तिला एका ठिकाणी घेऊन येतो… गाडी पार्क करण्याच्या बहाण्याने तिला एकटीलाच आत जाण्यास सांगतो… डोअर कीपर दार उघडून देतो तशी ती आत जाते… सगळीकडे धुकट असा प्रकाश असतो… ती आसपास नजर फिरवते… सगळीकडे तिच्या exhibition वाल्या पेंटिंग्ज लावलेल्या असतात… ती हॉलच्या मध्यावर येऊन थांबते… तिथे तीच पोर्ट्रेट असत… ती मनोमन विचार करते की माझ इतक सुंदर चित्र कोणी काढल… त्या चित्रात तिचा तोच फर्स्ट लुक होता जो पाहून कबीर घायाळ झाला होता…. ती मागे वळून बघते तर समोर कबीर उभा असतो… तिचा हात हातात घेत…. तुझ्या कलेची कोणी बोली लावावी हे मला नाही पटत म्हणून मीच ती सगळी ठेवून घेतली… तुला त्या दिवशी पार्टीत पाहिल आणि तिथेच माझी विकेट पडली…. त्या दिवसापासून तुला हुबेहुब या चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करतोय बघ जमलाय का?? I love you काया…. I love you so much… आणि सगळीकडे प्रकाश होतो.. सगळे टाळ्या वाजवायला लागतात… राजेश कायाला सांगतो की हा सगळा सरप्राइज प्लान कबीरचा होता… त्याच तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याला तुझ्याशी लग्न करायच आहे…

कबीर कायाला त्याने आणलेला डायमंड सेट तिला गिफ्ट देतो… तस गर्दीतून आवाज येतो अरे असा हातात काय देतो तिच्या गळ्यात माळ…

सगळे त्याला चीअर करायला लागतात… तो नेकलेस एका हातात घेतो दुसऱ्या हाताने तिच्या मानेवर हात फिरवत तिचे केस बाजूला करत नेकलेस तिच्या गळ्यात घालतो… त्याच्या स्पर्शाने ती शहारून जाते…

काया लाजेने चूर होते.. एक नजर कबीरकडे बघते आणि नजर चोरत दूर पळायला बघते तस कबीर तिच्यासाठी गाणं गातो….

सुनो ना संगेमरमर….
कि ये मीनारें …..
कुछ भी नहीं है आगे तुम्हारे
आज से दिल पे मेरे राज तुम्हारा
ताज तुम्हारा…..
सुनो ना संगेमरमर
कि ये मीनारें
कुछ भी नहीं है आगे तुम्हारे
आज से दिल पे मेरे राज तुम्हारा
ताज तुम्हारा

काया पळत जाऊन कबीरला बिलगते…. दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावतात…

इथे बर्थडे पार्टी संपवुन काही दिवसांच्या आतच कबीरच्या इच्छेनुसार ते दोघे रजिस्टर मॅरेज करतात… आज कायाला सगळं खर सांगून टाकू असे दिपक कबीरला सुचवतो पण कबीर टाळाटाळ करतो… कबीरला कोणाचातरी फोन येतो आणि तो तडक काहीही न सांगता निघून जातो… जाताना दिपकला कायाची काळजी घेण्यास सांगतो….

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 4

दी तुला आनंदी बघुन मला खूप…. खूप…. खूप बर वाटतय…. I am so much happy for you….Who’s the lucky guy??? I’m so excited…

Geplaatst door ईरा op Vrijdag 30 augustus 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत