सावर रे…. (प्रेम कथा) भाग 5

Written by

© शुभांगी शिंदे 

सावर रे….

भाग 5

गाण ऐकता ऐकता कधी झोप लागते कळतच नाही त्याला… सकाळी जाग येते तेव्हा लक्षात येत की काल तो इथेच झोपून गेला.

हात पाय ताणून एक आळस झटकून तो फ्रेश होण्यासाठी जातो… आणि परत आपल्या केबीनमध्ये येतो… केबिनच्या मोठ्या काचेतून बाहेरची परिस्थिती पाहत असतो… पाऊस बऱ्यापैकी थांबला होता… जमलेले पाणी ओसरत चालले होते…

रेवाही आता निघण्याच्या तयारीत होती… निघण्या आधी कबीकबीरला भेटायला आली…

रेवा : (दार उघडून आत येत) Good morning Sir… Your morning coffee is here…

कबीर : (अजूनही बाहेरच्या वातावरणात मग्न) हममम्

रेवा डेस्कवर कॉफी कप ठेवतच असते तीच तिची नजर कबीरच्या पर्स मधल्या फोटोवर जाते…

रेवा : Ohh my god…. हि तर मधू आहे… सर तुम्ही ओळखता हिला… I am her biggest fan… She’s owsom…

कबीर : (मागे वळून) काय बोलतेस रेवा?? आणि कोणाबद्दल???

रेवा : तुमच्या पर्समध्ये मधूचा फोटो आहे मी त्याबद्दल बोलतेय…

कबीर : (थोडा गंभीर होत) मधू??? (एक नजर रेवावर टाकत)  ही तर काया आहे….

रेवा : कोण काया?? I am sure हि मधूच आहे…. Wait I will show you…

अस म्हणून रेवाने आपला मोबाइल काढला आणि Face book application आॅन केल… आणि कबीरला काहीतरी दाखवु लागली…

रेवा : हो… मधूच आहे ही हे काय… बघा ना…

कबीर : (अंधारात आशेची किरण सापडल्याप्रमाणे रेवाच्या हातातला मोबाईल घेतो… आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो… ) काया!!!!….. (नाव घेताना कंठ दाटून आला होता…. डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते)

रेवा : (अजून पुढे सांगू लागली ) सर पंधरा दिवसांनी कॅलिफोर्नियात Art festival आहे …. मधूचा मोठा फॅन क्लब आहे त्यांनीच या इवेंटबद्दल FB वर पोस्ट टाकली आहे… मधूचा स्पेशल शो आहे तिथे… As a guest म्हणून…. काय सुंदर guitar वाजवते ती… Outstanding…. जादू आहे तिच्या बोटांत….  Social media मुळे फार कमी वेळात नावारुपाला आली आहे ती… मी पण तिला फॉलो करते…

कबीर : (तिला बघून मनात विचार करत) हि मधू नाही माझी कायाच आहे… मी येतोय काया …. आता तुला कुठेच जाऊ देणार नाही….

रेवा कबीरला भानावर आणते तस कबीर तिला त्याची तिथे जाण्याची अर्जंट व्यवस्था करायला सांगतो.. त्याप्रमाणे रेवा त्याची फ्लाईटची टिकीट आणि हॉटेल बुकिंग करण्याच्या तयारीला लागते.. ती केबिनमधून बाहेर पडणार तोच कबीर तिला गळ्यात भेटून थँक्स म्हणतो… ती नजरेनेच रिस्पॉन्स देत निघून जाते….

कबीर आज भलताच खुश होतो… त्याच्या पुढे आता कायाच काया त्याला दिसत होती… सगळी तयारी करून कबीर एकदाचा तिथे पोहचला… हॉटेलवर न जाता त्याने आपल सामान ड्रायव्हर मार्फत हॉटेलवर पोचत केल आणि स्वतः डायरेक्ट कँपसमध्ये गेला जिथे काया अर्थात मधूचा म्युझिक गृप असतो….

ब्लू जीन्स, क्रीम कलरचा टी शर्ट, त्यावर ब्राऊन लेदर चा जॅकेट… डोळ्यांवर गॉगल… हातात स्पोर्ट्स वाॅच… पायात गम बुट… एकदम stunning look… कँपसमधल्या मुली तर त्याच्यावरच नजर ठेवून होत्या… पण कबीरची नजर तर कायाला शोधत होती… इतक्यात त्याला guitar ची धून ऐकायला येते….

पहला नशा, पहला खुमार
नया प्यार हैं नया इंतज़ार
करलूँ मैं क्या अपना हाल
ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार
तू ही बता

(उड़ता ही फिरूँ इन हवाओं में कहीं
या मैं झूल जाऊँ, इन घटाओं में कहीं ) – २
एक करलूँ आसमान और ज़मीन
अब यारो क्या करूँ क्या नहीं
पहला नशा, पहला खुमार …

Guitar ची धून ऐकताच सगळे तिथे जमा व्हायला लागतात. कबीरसुद्धा त्याच दिशेने जातो…कँपसच्या मध्यावर गोल चौथरा असतो… तिथे समोर एका चेअरवर बसून काया guitar वाजवताना त्याला दिसते… तो डोळ्यांवरचा गॉगल काढत तिलाच बघत बसतो… आसपासचे लोक धक्का मारून पुढे जातात तरी तो तिला बघण्यात गुंग असतो… आज कितीतरी महिन्यांनी तो तिला पाहत असतो… तितकीच सुंदर… तितकीच गोड… तितकेच निरागस भाव तिच्या चेहर्‍यावर त्याला दिसतात…

गाण संपताच सगळे टाळ्या वाजवून तीच कौतुक करतात.. आजची तिची प्रॅक्टिस संपलेली असते.. हळूहळू गर्दी ओसरल्यावर कबीर आनंदाच्या भरात तिला “काया” हाक मारत तिच्या समोर उभा रहातो… तिची नी त्याची नजरभेट होते… पण तिच्यासाठी कबीर अनोळखी असतो….. सॉरी…. I am not काया… My name is मधू…. पण कबीर मानायला तयार नसतो त्यामुळे तीचे आसपासचे फ्रेंडस त्याला पकडून दूर करतात… आणि तिथून हटकतात… तो तिच्या नजरेत नजर घालून बघत असतो…. न जाणो त्याच्या नजरेने तिच्या मनात काय भरल… तिने तिच्या फ्रेंडसना त्याला मोकळ सोडण्यास सांगितले आणि ती तिथून निघून जाऊ लागली… कबीर आपल जॅकेट सावरत तिच्या पाठमोर्‍या आकृतीला डोळ्यात साठवत होता….

कबीर हॉटेलवर जाऊन फ्रेश झा़ला आणि बेडवर निवांत पडला…. आपल्या कायाला आठवत… तिचाच विचार करत झोपी गेला… रोज तिला भेटण्यासाठी कँपसमध्ये जात होता… आर्ट फेस्टिवल पुढचे पाच दिवस चालणार होत… काया कडून काहिच रिस्पॉन्स येत नाही म्हणून कबीर थोडा अपसेट असतो… पण मनातील इच्छा शक्ती मजबूत असते… आज फेस्टिवलमध्ये होणार्‍या पेंटिंग स्पर्धेत तो भाग घेतो…

तो पेंटिंग काढत असताना एव्हाना त्याच्या भोवती बरीच गर्दी जमा होते… त्याने कायाला पहिल्या भेटीत जस पाहिल होत… तिच जे सौंदर्य बघून तो घायाळ झाला होता आणि प्रपोज मारताना पण जे पेंटिंग त्याने तिला दाखवल होत… आज परत तेच हुबेहुब उतरवल होत त्याने… कायाच पेंटिंग बघून तिचे चाहते आणखी गोळा झाले… गर्दी आणि लोकांना आकर्षित होताना बघून तीही उत्सुकतेने तिथे गेली… पेंटींग बघून ती आवासून उभी राहिली… कबीरला वाटल निदान हि पेंटिंग बघून तरी ती चलबिचल होईल पण नाही… कायाने अर्थात मधूने पेंटिंगच कौतुक करत त्याला मिठी मारली आणि तिथून निघून तिच्या फँनस् च्या घोळक्यात बिझी झाली….. पण तिने मारलेल्या मिठीने कबीर शहारून गेला पण ज्यासाठी येवढ केल तिला त्यातल काहीच कळल नाही… पण तिच्या थोडथोडक्या प्रतिसादामुळे त्याला थोडा का होईना पण आनंद मिळत होता… तिला घोळक्यात बघताना त्याच्या मनात एक गाण वाजत होत आणि तो त्या गर्दीत तिलाच न्याहाळत होता…

जिसे ज़िन्दगी ढूंढ रही है…क्या ये वो मक़ाम मेरा है..
यहाँ चैन से बस रुक जाऊं
क्यूं दिल ये मुझे कहता है
जज़्बात नये से मिले हैं
जाने क्या असर ये हुआ है
इक आस मिली फिर मुझको
जो क़ुबूल किसी ने किया है

किसी शायर की ग़ज़ल
जो दे रूह को सुकूं के पल
कोई मुझको यूँ मिला है
जैसे बंजारे को घर
नए मौसम की सहर
या सर्द में दोपहर
कोई मुझको यूँ मिला है
जैसे बंजारे को घर

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 6

काया : Friends??? (काहीसा विचार करून)कबीर : (हलकेच हसून) हममम् ( आपले अश्रूंना आवरत घालत)काया : (हात मिळवणी करत)…

Geplaatst door ईरा op Zaterdag 31 augustus 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा