सावर रे…. (प्रेम कथा) भाग 6

Written by

© शुभांगी शिंदे 

सावर रे….

भाग 6

तिला घोळक्यात बघताना त्याच्या मनात एक गाण वाजत होत आणि तो त्या गर्दीत तिलाच न्याहाळत होता…

संध्याकाळ झाली होती… कबीर कँपसच्या बाहेर गार्डनला लागुन असलेल्या एका बेंचवर बसला होता… समोर मोकळा रस्ता… त्या दिवसाचा इवेंट संपल्यामुळे रस्त्यावर रहदारी कमी होती.. मावळतीला येणाऱ्या सूर्याचा तांबडा प्रकाश…. मोकळ आभाळ आणि गार अशी मंद हवेची झुळूक मनाला तजेला देत होती… कबीर बेंचवर बसून आपल्या पर्स मधल्या कायाच्या फोटोला न्याहाळत होता… त्याची मान खाली झुकलेली होती… अचानक गार वारा सुटला… तो बसला होता त्या बेंच शेजारी मोठ झाड होत… लाल, पिवळ्या फुलांनी बहरलेल… वाऱ्याच्या लहरींचा स्पर्श होताच त्याची फुल गळुन पडत…

कबीरला कोणीतरी आपल्या जवळ असल्याचा भास झाला त्याने बाजूला पाहिल तर शेजारी काया बसली होती.. त्याची तिची नजरभेट होताच गोड हसली ती…

काया : Hiiii (हलकेच हात हलवून)

कबीर : Hiii…( जीव तुटत होता त्याचा कारण आपलीच व्यक्ती अनोळखी असल्याप्रमाणे ओळख देत होती)

काया : Nice painting… ( बोलायला सुरुवात करावी म्हणून )

कबीर : Thanks (हलकेच हसून)

थोड्यावेळ कोणीच काही बोलत नाही… तिला अस जवळ बघून मन भरुन आलं होतं… वाटत होतं की तिला आत्ता आपल्या मिठीत घ्याव आणि मन मोकळं करावं…

काया : Friends??? (काहीसा विचार करून)

कबीर : (हलकेच हसून) हममम् ( आपले अश्रूंना आवरत घालत)

काया : (हात मिळवणी करत) That’s good… I am मधू..

कबीर : कबीर… (स्वतःची नव्याने ओळख करून देत)

काया : कॉफी माझ्या घरी…. तुझी हरकत नसेल तर …

कबीर : (तेच तर हव होत त्याला हे confirm करण्यासाठी की कायाच आहे…. मनाला आवर घालत अतिशय नॉर्मल) Are you sure?? I mean तुझ्या घरी अस अनोळखी व्यक्तीने येण???

काया : No problem…

दोघेही एकत्र उठले… तिने आपली guitar आपल्या पाठीवर चढवली आणि पाउल पुढे टाकणार तोच ती अडखळली आणि तिचा तोल गेला… कबीरच्या हे लक्षात येताच त्याने तिला सावरल…. तिचा हात त्याच्या हातात होता दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले…. गार वाऱ्याने त्या मोहरलेल्या वृक्षाला गदागदा हलवले आणि आपल्या फुलांचा वर्षाव करायला भाग पाडले… तांबडा पिवळा प्रकाश… दोन जीवांची भेट आणि वरून होणारा फुलांचा वर्षाव छान सांगड घातली होती आज निसर्गाने….

काही वेळाने भानावर येऊन दोघेही तिथुन निघाले… घरी पोहचल्यावर तिने तिच्याकडच्या चावीने दार उघडले… समोरच तिचे बाबा अर्थात मधूचे बाबा पेपर वाचत बसले होते…

मधू : Hiii Dad….

बाबा : Hii… बेटा…

मधू : (ओळख करुन देत) कबीर… meet my Dad… And Dad his कबीर…

बाबा : Hello… Please be seated…

मधू : (कँपसमधून कबीरने काढलेल पेंटिंग दाखवत) हे बघा… Nice na … कबीरने काढल…

बाबा : (आश्चर्य करत) वाहह!!! Beautiful….

कबीर त्यांना थँक्यू म्हणत तिच घर बघत असतो… मधू त्यांना तिथेच सोडून आत जरा फ्रेश होण्यासाठी निघून जाते… इथल्या तिथल्या गप्पा झाल्यावर काही वेळाने डोअर बेल वाजते… मधू जाऊन दार उघडते… आणि दारात आलेल्या व्यक्तीला आत घेऊन येते…

मधू : Look Dad… Who’s here??? (सोबतच कबीरलाही ओळख करून देत) कबीर… Meet my husband दिपक…

दिपकला इथे बघून कबीरला आश्चर्याचा धक्काच बसला आणि मधूने करून दिलेल्या ओळखीनंतर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते…. दिपकही कबीरला बघून दोन मिनिटे शांतच होतो…

दिपक : मधू!!! कॉफी आणशिल please…

मधू : sure… कबीर!!! One more coffee for you ??

कबीर : हो…. (रागातच दिपकवर नजर टाकत)

दिपक कबीरला बाहेर बाल्कनीत घेऊन जातो….

कबीर : (अतिशय रागात) दिपक!! ! तु इथे??? आणि कायाचा husband ???? काय आहे हे सगळं….

दिपक : (हसून) ती accident च्या आधी तुझी काया होती आणि आता ती माझी मधू आहे… (दिपक आज वेगळाच वागत होता) त्या दिवशी तु दुबईला रवाना झाल्यावर मी कायाला तुझ खर रुप सांगितल तेव्हा ती रागातच गाडी घेऊन तुला जाब विचारायला निघाली आणि रस्त्यात तिची डॉक्टरच्या गाडीला धडक लागली… डॉक्टर म्हणजे मधूचे बाबा…. गाडी ब्रीजवर अडकून पडली होती… डॉक्टरांनी तिला गाडीतून बाहेर काढले आणि गाडी नदीत कोसळली… कायाच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे तिची स्मृती हरवली… ओपरेशन नंतरही तिला काहिच आठवत नव्हते… त्या अपघातात डॉक्टरांची एकुलती एक मुलगी मधू गेली… कायाची कोणतीच ओळख पटत नसल्याने त्यांनी तिला मधू नाव दिले आणि ते इथे आले… डॉक्टर एका पेशंटच्या ओपरेशनसाठी भारतात आले होते परतीच्या वेळेवर त्यांची मुलगी गाडी चालवत होती.. गाडीवरच नियंत्रण सुटून कायाच्या गाडीला धडक बसली… त्यांच स्वतःच हॉस्पिटल असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले नाही…

सहा महिन्याआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला तीची माहिती मिळाली… मी तडक इथे निघून आलो… इथे आल्यावर कळल कि तिला तर काहिच आठवत नाही…. (आणि हसायला लागला)

कबीर : पण तुला अस वागायची काय गरज होती…???

दिपक : Relax कबीर… मला काया आधीपासूनच पसंत होती… मी दादाला सांगून तिला लग्नाची मागणी पण घातली… पण तिने मला झिडकारला… नेहाने जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा मी त्या गोष्टीचा फायदा घेत तुला तिच्या भावाच खोट नाव सांगितल… आणि तुला नेहाला झालेल्या त्रासाचा सुड घेण्यासाठी उत्तेजित केल… मला माहीत होतं तु तुझ्या दी साठी काहीही करू शकतोस… मी त्याचाच फायदा घेतला… पण तु तर खरोखरच तिच्या प्रेमात पडलास आणि माझा प्लान फसला…. म्हणून मीच तिला हा तुझा प्लान होता अस सांगितल… तुझ्यावर प्रेम केल्याचा खूप राग आला तिला… खूप त्रास झाला बिचारीला हे सगळं ऐकून आणि मला बर वाटल तिला अस तडफडताना बघून….

कबीरला दिपकच्या खोटेपणाचा आणि अशा विक्षिप्त विचारांचा खूप राग आला… त्याने दिपकची कॉलर पकडली आणि….. मधू आली कॉफी घेऊन… तिला बघताच कबीर गप्प बसला….

मधू :(त्या दोघांना अस बघून… तिला जाणवलं की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालय) Hey guys any problem??? काय झालं आहे कबीर तु दिपकची कॉलर का पकडली… Are you guys fighting….????

दिपक : हो अग… (मधूचा काळजीत पडलेला चेहरा बघून) अग मधू कबीर माझा फ्रेंड आहे आपल लग्न झालं तेव्हा तो इथे नव्हता ना म्हणुन रागावलाय… बस इतकच….

मधू : ओहहहह…. म्हणजे याला आपली लव्हस्टोरी नक्कीच माहित असणार…. कबीर सांगशील ना मला….

कायाच्या या बोलण्यावर कबीरला काहिच सुचेनासे झाले… त्याला आता हे असह्य झाल होत… दिपक कायाच्या अती जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता.. पण कायाने स्वतःला त्याच्यापासून दूरच ठेवल होत… कबीरला तिथे थांबण मुश्किल झाल होत… मनाचा आवंढा गिळत तो तिथुन निघाला…. तिच्या घरापासून दूर थोड्या निर्जन स्थळी आल्यावर त्याच्या मनाचा बांध फुटला आणि ढसाढसा रडू लागला…..

कैसे बताये क्यूँ तुझको चाहे, यारा बता न पाएं
बातें दिलों की, देखो जो बाकी, आँखें तुझे समझाए
तू जाने ना…
मिलके भी हम न मिले तुमसे न जाने क्यूँ
मीलों के है फासले तुमसे न जाने क्यूँ
अनजाने है सिलसिले तुमसे न जाने क्यूँ
सपने है पलकों तले तुमसे न जाने क्यूँ

निगाहों में देखो मेरी जो है बस गया
वो है मिलाता तुमसे हुबहू
जाने तेरी आँखें थी या बातें थी वजह
हुए तुम जो दिल की आरजू
तुम पास हो के भी
तुम आस हो के भी
एहसास हो के भी अपने नहीं
ऐसे हैं हमको गिले तुमसे न जाने क्यूँ
मीलों के है फासले…

कबीर हॉटेलवर न जाता तिथेच एका बेंचवर बसून असतो… थोड्यावेळाने हॉटेलवर निघून जातो…. दिड दोन तासानंतर त्याच्या मोबाइलवर मेसेज येतो.. त्याला अशीही झोप लागत नसते… तो फोन चेक करतो….. कायाचा मेसेज असतो… तो खूश होतो….

“Hiiiii Kabir… Can you join me tomorrow for festival… Deepak doesn’t like this type of festival… Is it possible to you… ”

कबीर लगेचच Yess म्हणून मेसेज पाठवून देतो…. कबीर ठरवतो की कायाला नव्याने आपल्या प्रेमात पाडायच आणि दिपकपासून तिची सुटका करायची…..

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 7

तिने निघूया का?? अस विचारताच कबीर भानावर येतो… ते दोघेही इवेंटच्या ठिकाणी पोहचतात.. इवेंट संपल्यावर तिला एका स्टुडिओत…

Geplaatst door ईरा op Dinsdag 3 september 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा