सावर रे….. (प्रेम कथा) भाग 8

Written by

© शुभांगी शिंदे 

सावर रे….

भाग 8

कबीर कॅब घेऊन पोहचतो… कबीरला पोहचायला दहा मिनिटे उशिर झाला होता… तिथे पोहचल्यावर तो मधूला फोन करतो… पण तिचा फोन बंद येतो… तो संपूर्ण ठिकाणी तिला शोधतो… पण ती तिथे नसते… परत बाहेर येऊन बघतो…. तर ती बाहेर एका बेंचवर बसलेली होती.. कबीर धावतच तिथे गेला आणि तिच्या समोर उभा राहिला… आपल्या गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून धापा टाकत होता… तिला बघताच क्षणी त्याच्या जिवात जीव आला….

कबीर : (थोड रागातच) Have you gone mad?? तुला आतच बसून रहा सांगितलं होतं ना?? मग इथे का बसलीस ?? तुला काही झालं असत तर??

मधू : (तीही रागातच आहे) yess I am mad… आणि मला काही झालं असतं तर दिपकला फरक पडायला हवा… तुला काय फरक पडतो??

कबीर : (तिला हळूवार समजावत) हे बघ काया मला तस म्हणायच नव्हत…

मधू : काया??? (प्रश्नार्थक मुद्रेने) येवढ्या मध्यरात्री दिपक मला असाच इथे रागात सोडून गेला आणि तु!!! …., तुला एक हाक दिली तर तर तु धावत आलास…… माझ्यासाठी….., त्यादिवशी ट्रेनमध्ये मला प्रोटेक्ट केलस अंगावर लोड येऊनही साधा मला स्पर्श होऊ नये म्हणून किती दक्षता घेत होतास…. त्या रात्री होटेल मध्ये मी तुला एक प्रश्न विचारला तर त्याच उत्तर तु टाळलस… तुला ठसका लागला तेव्हा नकळत मी तुझ्या काळजीने व्याकुळ होऊन तुझी पाठ थोपटली… त्यावेळी झालेल्या तुझ्या स्पर्शाने मी मोहरून गेले… “दिपक”…. जो स्वतःला माझा नवरा म्हणवतो त्याच्या सोबत असूनही का मला ती ओढ जाणवत नाही जी तुझ्या सोबत असल्याने जाणवते….

कबीर : (अजूनही समजावण्याच्या प्रयत्नात) हे बघ मधू… आता शांत हो… आपण बोलू नंतर…

मधू : काय बोलू नंतर कबीर??? आत्ता का नाही???? ज्याला माझी काळजी असायला हवी तो मला इथे सोडून जातो… आणि तु इथे माझी काळजी करत येतोस… तु का आलास कबीर???? का कबीर का??? बोल ना कबीर?? का तुला नी मला एकमेकांची ओढ जाणवतेय??? बोल ना कबीर बोल?? (त्याच्या शर्टाला धरून रडत रडत विचारते)

कबीर : (तिच्या प्रश्नांचा भडीमार असह्य झाल्याने) Because I love you dammit…. I love you so much….. (तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन, पाणावलेल्या डोळ्यांनी मनावरचा संयम सुटल्याने)

मधू त्याच्या डोळ्यांत एकटक पाहत बसते… त्याचे पाणावलेले डोळे खूप काही सांगून जातात… मधूही रडतच असते….तिच्या डोळ्याच्या किनारातून अश्रूंची धार ओघळते ….

कबीर तसाच आपल्या हाताने तिचा चेहरा अजून आपल्या जवळ घेतो… दोघांच्याही हृदयाचे ठोके वाढतात… पोटात फुलपाखरू उडायला लागतात, श्वासांत श्वास मिसळले आणि दोघांचेही ओठ एकमेकांच्या ओठांवर टेकले… मधू काहीच प्रतिसाद देत नव्हती… पण आज कबीर थांबणार नव्हता… तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि स्वतःच्या मनाची घालमेल आज त्याला सोडवायचीच होती… तो तसाच आपले ओठ तिच्या ओठांवर क्रश करत होता… आता तिचाही संयम तुटला होता… भावनांचा बांध मोकळा झाला होता… आणि तिही त्याच्यात हरवून गेली होती……

हो हो….
सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची
वाट हळवी वेचताना सावर रे मना
सावर रे
सावर रे
सावर रे एकदा
सावर रे
सावल्या क्षणांचे भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना सावर रे मना
सावर रे
सावर रे
सावर रे एकदा
सावर रे
भान उरले ना जगाचे ना स्वतःचे
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे
फितूर झाले रात दिन तू सावर रे
सावर रे मना
सावर रे
सावर रे एकदा
सावर रे
मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
येतील आता आपुले ॠतू
बघ स्वप्न हेच खरे
पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्याचे
पानगळ ही सोसताना सावर रे मना
सावर रे मना
सावर रे
सावर रे एकदा
सावर रे
सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची
वाट हळवी वेचताना सावर रे…..

काही वेळाने दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली…त्यांच्या हृदयाचे ठोके आता एकाच वेगाने धडधडत होते….. दोघांनीही एकमेकांच्या नजरेत पाहिले….कबीरने कायाचा चेहरा परत आपल्या हातात घेतला आणि तो वेड्यासारखा तिच्या चेहर्‍यावर किस करू लागला….

कबीर : I love you … I love you… I love you so much काया…. I love you…

मधू : (काया हे नाव ऐकून तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले) काया??? कोण आहे मी कबीर??? तुझी काया की दिपकची मधू??? (अश्रूंनी डोळे भरलेले….. घसा एव्हाना कोरडा पडला होता) हे द्विधा आयुष्य मला नाही जगायच कबीर…. मला माझी खरी ओळख हवी आहे कबीर………. I want my life back कबीर…. I want my life back ….. (ती जिवाच्या आकांताने रडून रडून विचारत होती)

कबीर स्तब्ध होऊन जातो…. त्यालाही आता रडू येत होत… मधू आपल्याच आयुष्याने आपल्या सोबत खेळलेल्या खेळीला वैतागून रडत होती…. कबीर निरुत्तर राहून तिथेच बेंचवर आपल्या हाताच्या ओंजळीत आपल तोंड धरून रडत बसतो…. मधू सगळं असह्य झाल्याने रडतच पळत सुटते….कबीरच्या लक्षात येताच तो तिच्या मागे जातच असतो इतक्यात भरधाव गडीने मधूला धडक दिली…. तिच्या डोक्याला जबर मार लागला… गाडी तर पुढे निघून गेली आणि त्या निर्जन रस्त्यावर कबीर मदतीची भीक शोधू लागला…. तो वेड्यासारखा मदतीची हाक मारत होता…

इतक्यात समोरून येणार्‍या गाडीला थांबवून कबीरने मदतीची विनंती केली… नशीबाने ते लोक मदतीला तयार झाले… कबीरने मधूला उचलून गाडीत घेतली.. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होत… त्याने आपल्या हाताने तीच डोक दाबून धरल…. वाहणार रक्त प्रवाह थोडा कमी होत होता… त्यांनी जवळच्याच हॉस्पिटल मध्ये तिला नेले आणि डॉक्टरांनी ताबडतोब उपचाराला सुरूवात केली… कबीरने तिथून निघतानाच मधूच्या वडिलांना फोन करून परिस्थिती सांगितली होती… तेही तिथे हजर झाले… त्यांच्या येण्याने डॉक्टरांना कायाच्या केसमध्ये मदत झाली….

कायाला operation theater मध्ये नेले… कबीर रागाच्या भरात भिंतीवर आपल्या हाताचे मुठ्ठी मारू लागला…खुपच काळजीत पडला होता सारखा स्वतःलाच दोष देत होता… मी हे काय केलं…. मी स्वतःवर संयम ठेवायला हवा होता… काया…. काया…. Ohh god please…. (अजूनही आपले हात भिंतीवर आपटत होता )

पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान

दूर दूर चालली आज माझी सावली………२
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले सोबती ………….२

काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना…….२ मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबती ………….२

कबीरला खूपच एकट पडल्यासारखे वाटते… तो नेहा आणि राजेशलाही बोलावून घेतो…

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 9 अंतिम

सगळं शांत झाल्यावर नेहा कबीरला हॉटेलवर जाऊन आराम करण्यास सांगते… पण कबीर तिथून जाण्यास तयार नसतो… त्याला कायाची खूपच…

Geplaatst door ईरा op Zaterdag 7 september 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा