सासुबाई तुम्ही हव्या होत्या,..😢

Written by

सासुबाई तुम्ही हव्या होत्या,…
©स्वप्ना मुळे(मायी)
भावाच्या लग्नासाठी सुमी 8 दिवस आधीच गेली,..देवब्राह्मण होता म्हणून सकाळी मुहूर्त सुरू झाल्या,..सगळ्या जणी छान काठच्या साड्या घालून मिरवत होत्या,..सुमीच्या चुलत बहिणी आल्या होत्या त्यांच्या सासवा सुद्धा,..जात्यावरचे मुहूर्त विडे उचलायचे होते कोणीतरी म्हणलं आधी करवली बाई उचला,..तेवढ्यात मावशी म्हणाली आग मनी आहे ना सासू सासऱ्याची सवाष्ण आधी तिला जास्त मान ग बाई,..सगळ्या हसल्या हो बाई सासू सासरे असलेल्या या आधी मग घे सुमे तू,….सुमीला एकदम सासुबाई आठवल्या,..त्यांची उणीव भासली,…मग सगळं लग्न होई पर्यंत ती भासतच राहिली,…सुमीच लेकरू रडत तिच्या मागेच फिरत होत,..बाकीच्या बहिणी आपले लेकरं, मोबाईल सासुकडे देऊन मस्त हिंडत होत्या,..
लग्न आटोपून सुमी आपल्या घरी आली,..काही दिवसांनी तिची भावजयी सासूबाईला म्हणजे सुमीच्या आईला गाडीवर घेऊन आली सुमीकडे,… तेंव्हा सुमीला खुप छान वाटलं आईला नेहमी बोलवलं तर कोणी आणलं तर तिला यायला मिळायचं आता संक्रांतीच्या हळदी कुंकवाला सासू सुना सगळी कडे जाऊन आल्या ,आई अगदी आनंदाने सांगत होती,..सुमीला खुप आनंद वाटला,…त्यांना बाय करून आल्यावर मात्र सुमीला सासूबाईंच्या जाण्याची पोकळी फार जाणवली,..आणि बरेच वेळा तिला आठवतात…
परंपरेने चालत आलेलं नातं त्या दोघीत नव्हतंच कधी,…त्या म्हणायच्या तू मनात अढी ठेवू नकोस,सासू इतकी वाईट नसतेच ग,…खरंतर बाईची दुःख बाईलाच कळतात म्हणून तर पाळीच्या दिवसात त्या तिला शेकायला गरम पाण्याची पिशवी देत होत्या,…चहा देत होत्या,…गर्भारपणात त्यांनीच तर पुरवले होते डोहाळे सुमीला सगळं आठवलं,…त्या गेल्यावर आलेलं मोठं दुःखण तर किती जड गेलं आपल्याला,…खरं माणसं निघून जातात पण त्यांची आठवण काही जात नाही आणि सणवार,आनंदी क्षण किंवा दुःखाचे डोंगर त्यांची आठवण येतेच,…नातं मनातून जुळलेलं असलं कि हा त्रास होणारच आणि त्यात अश्या जोड्या फिरताना पहिल्या की सुमीला हमखास वाटतं सासुबाई तुम्ही पाहिजे होत्या,…😢

Article Tags:
·
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.