सासूबाईंच्या सूचना आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा

Written by

 

सासूबाईंच्या सूचना….. आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा.
अगं सुमे काय करतेस ग? झाली की नाही तुझी साफसफाई? चार दिवसांवर दिवाळी आली आणि तुझं अजून साफसफाईच चालू आहे का? काही फराळ पाण्याचं करणार आहेस की नाही यावर्षी? सगळा वेळ तुझा भिंती रंगवण्यातच चाललाय… सुमन च्या सासुबाई अगदी कणखर स्वरातच बोलल्या..

अहो आई तुम्ही काही काळजी करू नका ही काय पहिली दिवाळी आहे होय माझी गेली 15 वर्ष सगळं करते ना मी यावर्षी बघा कसा पटापट करते. तुम्ही निवांत राहा माझ्यावर जबाबदारी टाकली आहे ना मग करू द्या की मला माझ्या मनाचा आणि कुठे चुकले तर तुम्ही आहातच की मला मदत करायला.

हो माहिती आहे मला तुम्हा पोरींचा आज काल म्हणे रेडिमेट सगळं फराळाचं विकायला येत. गेल्या आपल्या दुकानात आणि आणल्या सगळ्या गोष्टी विकत, की दिल सर्वांना दिवाळीच्या दिवशी थोड थोड खायला. झाला त्यांचा फराळ. ते तसं विकतच,  रेडीमेड नाही चालणार बर का आपल्या घरी. म्हणूनच म्हणते कधी संपणार आहे घराची साफसफाई आणि कधी लागणार आहे फराळाचं करायला.

मला माहिती आहे आई तुम्हालाही चालणार नाही विकतच आणि आपल्या घरचे महारथी देखील खात नाही त्यांना माझ्या हातच्या पण तुमच्या पद्धतीने केलेला फराळात आवडतो. मग कसं बरं मी दुकानातून रेडिमेट आणेल तुम्हीच सांगा?? मी यावेळी देखील तुमची मदत घेऊन अस पटापट फराळाच करते बघा..

आता कुठे होत ग माझ्याने सगळं. फक्त तोंड चालवण्या पूरती सासू राहिली तुझी. बसल्या जागेवरून बोलल्याशिवाय काहीच जमणार नाहीये मला. सारख्या.. सूचना इतकंच राहिल माझं काम.

आई तुमच इथे बसून बोलणं खूप आहे माझ्यासाठी.
आधी घराची स्वच्छता, मग पोटापाण्याचा फराळ. साफसफाई करून द्या छान माझ्या मनाजोगी.

“जिथे स्वच्छता तेथे देवाचा वास” असतो, असं तुम्हीच म्हणता न. आणि गेली पंधरा वर्षे झाली आपण दोघेही करतोच ना सगळं. यावर्षी तुम्ही आराम करा, आणि मला काम करून द्या.

सुमे खर आहे तुझं पण यावर्षी माझी तब्येत बरी नाही माझी मदत काही होणार नाही फक्त तोंड वाजवायला राहिली मी म्हातारी.

आई काय बोलताय तुम्ही,  वयानुसार तुम्ही थकणारच आणि तुमच्या त्या तोंड वाजवल्याने जी एनर्जी मिळते मला काम करण्याची, 😜ती तुम्हाला काय कळणार😃😃😃

घरात कोणीतरी मोठं असावं ज्याने आपल्याला सारख्या सूचना द्यावा आणि आपण त्या निमूटपणे पाळाव्या. आणि कधी कधी सूचना देणाऱ्याला देखील काम करायला भाग पाडाव 😜😂😂..सुमन गमतीने बोलली

असं होय सुनबाई आणि दोघीजणी हसायला लागल्या😃😃😃

फक्त आजचा दिवस घर सफाई च काम राहिल आहे उद्यापासून मी तुमच्या देखरेखीत सर्व फराळ बनवायला सुरुवात करते. तुम्ही आराम करा, काळजी करू नका.

ते फराळाच सोड, कपड्यांची खरेदी झाली का?? बर कधी जाणार आहेस खरेदीला? आणि कधी घेणार आहे?? तुझ्या साडीला  पिको -फॉल, ब्लाऊज शिवून  कस मिळेल या चार दिवसात?

आई, तुम्ही कपड्यांच्या खरेदीचा विचार करू नका मुलांनी व यांनी ऑनलाइन केली आहे  खरेदी.  मला काही साडी घ्यायची नाही यावर्षी. इतक्या साडे आहेत मला,
बिचाऱ्या  साड्या ओरडत असतात माझ्यावर कपाट उघडले की “सुमे कधी घालते आम्हाला?? की फक्त आम्हाला कपाटाची शोभा वाढवायला आणि मैत्रिणींना साड्यांची संख्या सांगायला घेतेस का? ” असं

😃😃 त्या पण सुमीच म्हणतात मला. 😂😂😂तुमच्या सारख्या.

सुमे तू गृहालक्ष्मी ग बाई तुला साडी घ्यायलाच हवी…

आई अहो सगळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या साड्या आहेत माझ्याकडे. या वर्षी साडी  न घेता त्या पैशाचे कपडे किंवा ब्लॅंकेट काहीही जे होईल ते विकत घेऊन गरजूंना देईल म्हणते मी, आणि सोबतच मी बनवलेल्या फराळाचे पाकीट देखील.

आपण इतके श्रीमंत नाही आहोत,  की पन्नास-शंभर लोकांना मदत किंवा भेट देऊ शकू पण जे काही पाच-दहा लोकांना मदत करू शकू तेच खूप नाही का??

गुणांची ग सून माझी असे म्हणून सासुबाईने सुमीच्या अंगावरून उतरवून कडाकडा बोटे मोडली.

बस खूप झालं माझं गुणगान, तुम्ही आता आराम करा उद्यापासून किचनमध्ये खुर्ची टाकून बसायचं आहे पूर्ण फराळ तयार होईपर्यंत.

खरं सांगू आई तुमचं ते बोलणं सुद्धा खूप आवडत मला. आता सवय झाली या नोकझोक ची. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ज्या सूचना देतात त्यामुळे त्या पदार्थाला वेगळीच चव येते. चला जा रूममधे इथे धूळीत नका थांबू, आराम करा.

सुमनची साफसफाई पूर्ण होते. सगळे डबे रिकामे करण, त्यातील वस्तू वाळत टाकणं, मग सर्व डबे स्वच्छ घासून ते देखील कोरडे करणं. वाळत टाकलेलं सामान, डबे कोरडे झाले की त्यात भरून ठेवणं.

सर्व घरातील जळमट (जाळी ) काढणं, मजूरा कडून घराला दिवाळीच्या आधी कलर करून घेणं.

असं सगळं दिवाळीच्या आधी सुमन व तिच्या सासूबाई मिळून -मिसळून करायच्या.

 

सासूबाईच्या 100सूचना असायच्या अधेमधे, पण सुमनला त्याची सवय झाली होती.

मोठ माणुस आपला अनुभव सांगेलच “त्यातून फायदा होतं नसेल आपला तर वाईट तर नक्कीच होणार नाही.” हे तत्व मनी बाळगून सुमन गेली 15वर्ष संसार करत होती सासूच्या हाताखाली. त्यामुळे या सासू -सुनाच नातं खुप वेगळं आणि छान होतं.

या वर्षी सासूबाईला वयोमनानुसार सुमनला मदत करायला काही जमनार नव्हतं. सून एकटीच करतेय याची काळजी देखील होती त्यांना.

सगळं करून ऐन दिवाळीच्या दिवशी गृहलक्ष्मी आजारी नको पडायला या काळजीने त्या “बस झाली साफ -सफाई, पुरे आता, फराळाचं बघ ” असं म्हणाल्या. सुमनला त्या सासूबाईच्या बोलण्यामागची काळजी माहिती होती. त्यामुळे कितीही कणखर स्वरात बोलू दे न सासू.. तरी तिला त्याच वाईट नाही वाटायचं.

सगळं आवरून झाल्यावर सुमनने सासूबाईला चहा नेऊन दिला..
रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. दिवसभर कामामुळे सुमन खुप थकली होती. सासूबाईला जेवण दिल आणि आता  “ज्याला जेंव्हा भूक लागेल तेंव्हा, ज्याचं त्यांनी वाढून घ्या ” असं सांगून सुमन झोपायला गेली. कधी डोळा लागला कळलंच नाही तिला.

जाग आली ती एकदम पहाटे 5ला मग काय पुन्हा लगबग सुरु हिची दिवाळीच्या तयारी साठी.

पटापट स्वयंपाक करून ही फराळाचं बनवण्याच्या साहित्याचा विचार करत होती…आणि मग, चिवडा बनवण्याचं सामान उन्हात टाकणं, कांदे, मिरचे, खोबऱ्याचे काप, चकली साठी लागणार साहित्य धुऊन वाळू घातलं..

आता लवकर तयार होईल असे लाडू, शंकर पाळे, आणि करंजी हे प्रकार होते. लाडू सासूबाईंच्या मदतीशिवाय सुमन ने कधी केले नव्हते.. करता यायचे पण उगाच भीती मनात… काही प्रमाण कमी जास्त झालं तर..? 🤔🤔सासूबाईच्या हातचा लाडू म्हणजे अप्रतिम चव..

त्यांना किचन मधे बसवून.. त्यांच्या देखरेखीत लाडूचा बेत केला.. आणि आज हे(सुमनचा नवरा ) देखील लवकर आले घरी.. मग काय.. एक हात वाढला न मदतीला 😂😂

सासूबाईच म्हणाल्या “अरे सुरेश जरा मदतीला ये सुमीच्या. किती दिवसाची एकटीच करतेय.. खायला सगळेच तुम्ही. चल ये पटकन ”

“हो ग आई येतो, जरा फ्रेश तर होउ दे ”

ते येई पर्यंत लाडूच तयार झालं होतं फक्त वळायचे बाकी होते.. हे आले आणि माझ्या लाडूचे विविध आकार तयार व्हायला लागले 😂😂😂मी राहू द्या म्हणाले तरी आईचा हुकूम “सुमीला मदत कर रे ”

मग काय या दिवाळीला वेगवेगळ्या आकाराचे लाडू तयार झाले…

मुलं देखील आली मदतीला धावून “आम्ही करून बघतो, आम्हाला देखील करायचे आहे ” मग काय विचारता..लाडू पटापट तयार झाले आणि त्याला गोडी निराळीच मिळाली.

असच सांग्रसंगत.. शंकरपाळे, करंजी देखील तिघांच्या मदतीने एकाच दिवशी तयार झाले.

अहो ना..भारीच इंटरेस्ट आला यावेळी करण्यात मग काय.. रात्रीच्या जेवणासाठी फक्त खिचडी बनवली आणि स्वारी स्वतः चिवडा बनवायला बसले… खरंच अशा वेळी सगळ्यांनी थोडी मदत केली आणि घरातील वातावरण बोलून -चालून हलक -फुलकं केल तर जास्तीच्या कामाचा थकवा जाणवत नाही.

आणि सगळं घरी बनवायला खुप मज्जा येते.. अशाप्रकारे चकली साच्यातून पाडून देणे, शेव, अनारसे सगळं बनवताना.. सासूबाई सूचना देत होत्या..

आणि अहो, मुलं मला आवडीने मदत करत होते. बघता बघता.. तीन दिवसात, दोन.. तीन पदार्थ एका दिवशी करायचे,  याप्रमाणे सगळा दिवाळीचा फराळ तयार झाला देखील.

ते बनवत असतांना होणारा गोंधळ, हास्यकल्लोळ तर कधी मधेच माझा संताप आणि आईच त्या तिघांना रागवण या सगळ्यांची मज्जाच काही वेगळी होती.

आणि महत्वाचं या वेळी फराळाला कुणीच नाव ठेवणार नव्हते.. सगळे आवडीने आणि कौतुक खाणार होते कारण.. 😂😂😂 यावेळी स्वतः बनवलं होतं न सगळ्यांनी.. त्यात किती मेहनत लागते, करताना करणारीचा कसा कस लागतो हे देखील कळलं होतं.

या वर्षी आई जरी मदतीला नव्हत्या तरी घरातील पुरुष मंडळींनी केलेली मदत.. वेगळाच आनंद देऊन गेली. आणि हे सगळं करताना खुप.. खुप मज्जा आली.
मुलांनी  रांगोळी आम्हीच काढू म्हणून दिवाळीच्या दिवसच एक काम कमी केल माझं. अंगणात, घरी सर्वत्र दिवे लावण्याची जबाबदारी देखील.. पिता -पुत्रांनी घेतली होती. प्रदूषणाचा विचार करून इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचा निर्णय मुलांनी स्वतः घेतला होता. तो पैसा माझ्या ब्लँकेट /कपडे मदतीच्या कामात लावायला सांगितला.

बघता.. बघता सगळी पूर्वतयारी झालेली होती.. आता वाट होती ती दिवाळीच्या दिवसाची.. आईंसाठी खास नऊवारी यांनी ऑनलाईन मागवली होती सरप्राईज होतं ते मुलाच आईला. त्यामुळे आईला त्यांच्या कपड्यांविषयी मी विचारायचं टाळलेच होते.

अगदी दिवाळीच्या आदल्या दिवशी ती नऊवारी आली देखील घरपोच.

आणि मी ठरवल्याप्रमाणे माझ्या कपड्यांच्या पैशातून आणि मुलांच्या फटाक्यांच्या पैशातून 20ब्लॅंकेट घेऊन ठेवले. रात्रीच्या वेळी थंडीत कुडकुडणारे गरजू दिसलें की त्यांना ते द्यायचे होते.

तर अशी झाली दिवाळीची पूर्व तयारी… ती करताना आलेला थकवा आणि खुप सारी मज्जा.. 😍😍😍😍

सर्व वाचकांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🎇🎇

समाप्त… ©जयश्री कन्हेरे -सातपुते

लेख आवडल्यास like कमेंट करा, शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा. ©जयश्री कन्हेरे -सातपुते
फोटो साभार गुगल

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत