सासूबाई प्रत्येकीला हवीच…. मला सासू हवी भाग 1

Written by

सासूबाई प्रत्येकाला हवीच…
  ©जयश्री कन्हेरे -सातपुते
काल सर्व मैत्रिणींनी गेटटुगेदर छान एन्जॉय केल.. जुन्या कॉलेजमधील गोष्टी, गमती मुलांची केलेली टिंगल… क्षणभर वाटलं पुन्हा आपण कॉलेजलाच आलो… या गप्पानंतर सर्वजनी आपापल्या कुटुंबाविषयी भरभरून बोलत होत्या..  “माझा नवरा ... माझा मुलगा ” . “माझी मुलगी.. ”  “माझं घर… ” आमची गाडी(चार चाकीच म्हणतेय मी )..माझी नोकरी… नवऱ्याची नोकरी…मुलांची शाळा…  ” मी यात सामील होतेच… कुणाला नाही आवडतं आपल चांगलं ते सांगायला… सर्व विषय झाल्यानंतर सर्व सुनांचा आवडता विषय सुरु झाला… ओळखलंत का?… हो.. अगदी बरोबर… तोच म्हणतेय मी

“सासूबाई ”

मग काय म्हणता.. जी एक… एक सुरु झाली सासूविषयी बोलायला.. विचारूच नका..
पुढील प्रमाणे मैत्रिणींनी सासूचे केलेले वर्णन..
सरला :-  खरंच बाई.. दोघांचाच संसार चांगला असतो..
सासू, सासरे यांची लुडबुड नकोच… ते(सासू -सासरे)  असेल कि आम्हाला (तिची दोन मुलं व ते नवरा -बायको )कुठे जाताच येत नाही.. राज (तिचा नवरा )म्हणतो “अग आई बाबांना पण सोबत नेऊ.. नाहीतर जाऊच नाही…” याला काही अर्थ आहे का? आपण कधी एन्जॉय करायच ग…

अश्विनी :-  हो ग.. बरोबर बोलतेयस.. या वयात यांना त्रास होतो व सहन आपल्याला कराव लागत… माझ्या सासूला दमा आहे.. त्याचा त्रास विचारूस नको.. कंटाळा येतो ग….

स्वाती :- माझ्या कडे तर सासरे पण टोकत असतात.. कुठे जातेस?… कधी येशील? यांना कशाला पाहिजे ग नसत्या चौकशा.. आपल्या मनासारखं वागताच येत नाही..

नेहा :- अग माझी सासू तर फारच भारी आहे… बसता उठता “तुझ्या आईनं असच शिकवलं का?… तुला काही करताच येत नाही… फक्त चार पुस्तकं शिकलीस… संसार कसा करायचा ते नाही शिकवलं घरच्यांनी तुला “ असा राग येतो न आईच नाव घेतलं कि…. पण…. नवरा म्हणतो “माझ्या आईला बोलायचं नाही काही ”
प्रीती :- मी एका शब्दात सांगू का माझी सासू म्हणजे “सारख्या सूचना ” हे असच का केल, ते तसंच का केल,  ते झाकलं नाही नीट, पाणी भरल्या हाताने का दिल… नुसता डोक्याला ताप ग या सासूचा… जसं आपल्याला काही करताच येत नाही, सगळं शहाणपण देवाने यांनाच दिल…
रेखा :- सगळ्यांच्या सासू सारख्याच ग थोड्याफार प्रमाणात, माझ्या सासूबाईला तर माझी नोकरी पण पाहिजे व घरचे काम पण मीच केले पाहिजे… म्हणते कशा “मी पण नोकरीं, घर वर तीन मुलं सांभाळली.. तुला तर एकच मुलगी आहे… ” 

प्रिया :- आमच्या इथे पण सेम कंडिशन आहे.. पण माझा नवरा म्हणतो “जाउ दे ग.. पटलं ते ऐकायचं..बाकीच सोडून द्यायचं… ” मग मी पण जास्त मनाला लावून घेत नाही बोलणं त्यांच..
स्वाती म्हणाली… सगळे जण बोलत आहे पण आपली बडबडी जयश्री गप्प गप्प का…
काय बोलू ग मी…ऐकते सगळ्यांच…पण खरंच मला काय वाटते माहित आहे का…
दोघांचा संसार इतका सोपा नसतो ग सरला… दोघांचं बोलण संपलं कि दोघे असूनही.. घरात एकट वाटते…

मुल झाल्यावर वाटत.. याची आजी -आजोबा हवे होते… आपण लहान असताना आई-बाबा आपल्याला घरी एकट सोडून गेले का ग सरला कधी फिरायला...?
मग आई -बाबांना सोडून फिरण्याचा विचार कसा येईल ग तुझ्या नवऱ्याला…  ??? मुलांना मोठं करण्यासाठी… त्यांनी पण तर हौसमौज तूझ्या शब्दात एन्जॉयमेंट  केली नसेलच न….
अश्विनी तुझ्या सासूला दमा आहे नाही का….. खूप त्रास होतो न त्याचा… पण तुझा नवरा वयाच्या 35वर्षात कितीदा आजारी पडला असेल ग.. तू येण्याआधी.. त्याची काळजी कुणी घेतली …?? त्याचा त्रास तुझ्या सासूला झाला नसेल का…???
स्वाती मला आठवत मी तुला बर्थडे पार्टीला जाण्यासाठी बोलवायला यायचे घरी तेंव्हा तुझे बाबा तुला तर विचारायचेच पण मला पण विचारून खात्री करायचे “काय ग जयश्री कुठे जातंय? कधी याल परत..? जास्त वेळ लावू नका… लवकर या.. स्वातीला घरी सोडशील आधी ” यात फक्त काळजी होती ग बापाची… तेंव्हा तुला वाईट नाही वाटायचं.. पण तेच सासरे विचारतात तर नसत्या चौकशा का….? असं का ग…?

नेहा.. तुझी आई कितीदा म्हणायची ग..” जरा कामात मदत कर… शिक्षणासोबत मुलींना कामाची पण सवय हवी…. नाहीतर सासरी उद्धार व्हायचा माझा..”तुझ्या आईने हेच शिकवलं का” तेंव्हा तू काय म्हणायचीस आठवते का…?  “आई मी इतकी शिकेन कि प्रत्येक कामाला बाई लावीन ” आता सासू बाई बोलतात तर.. खूपच राग येतो न….  तुझ्या नवऱ्याचं पटलं मला.. का बोलायचं तू त्याच्या आईला… ?
प्रीती… सारख्या सूचना काय… तुझी सासू लग्न करून आली तेंव्हा पासून आज पर्यंत 35,38वर्ष झाली असेल.. त्यांच्या पण सासूने… त्यांना अश्याच सूचना देऊन, देऊन सरळ केल असेल… आता त्यांना सवय झाली तस बोलण्याची….. प्रिती तुझी आई नाही का रोज बाहेर जाताना “सगळं घेतलं का नीट,  रुमाल, पाण्याची बॉटल…..” असं विचारायची… सवय ग त्यांची. .. बाकी काही नाही…. त्यांच्या इतकं शहाणपण यायला अजून बराच वेळ आहे ग आपल्याला..
रेखा तुझ्या सासूबाईंनी नोकरी, मुलं व घर सांभाळल न…. स्वतःच्या अनुभवावरून सांगतात त्या… आपल्या कडे तर कपडे,भांडे व जमलं तर स्वयंपाक करायला पण आपण बाई ठेवतो… नाही का.. त्यांच्या वेळेस हे सगळं नव्हतं… घर, मुलं सगळं सांभाळावं लागत होत व नोकरीं पण…
प्रिया कडे बर आहे.. नवराच ऐकू नको म्हणते आईच….त्यांनी पण कधी ऐकलं नसेलच आईच….
प्रिया जरा रागानेच जयश्री “तु बरिच बाजू घेत आहेस ग सासूची… आमच्या सासूने काय तुला वकील बनून पाठवलं का आमची कानउघाडणी करायला… ”
सगळ्यांनी प्रियाच्या बोलण्याला  “हो.. हो…” म्हनुन दुजोरा दिला.
अग.. मी या सासू विषयालाच कंटाळले… माझ्या शेजारील  बाया… यांच्या मित्रांच्या बायका… सगळे हाच विषय घेऊन बसतात…मी जाम बोर होते ग त्यांच ते गाऱ्हाणं ऐकून… मला वाटलं या गेटटुगेदर मधे तरी तो विषय निघणार नाही..  आपण शिकलेल्या.. नोकरीं करणाऱ्या कदाचित सासूला समजून घेत असू.. पण तुमच सासुपुराण जे सुरु झालं ते बंदच होत नाही…
मान्य आहे मला सासू कधी आई होऊ शकत नाही… पण एक सांगा सुन मुलगी होते का…?
सगळा दोष सासुचाच किंवा सुनेचाच असते असं नाही न… दोघीनी समजून घेतलं तर….?
सगळे निगेटिव्ह पॉईंट सांगितले तुम्ही…

पण….
आता या…

पण नंतर च पुढील भागात…
क्रमशः……………. ©जयश्री कन्हेरे -सातपुते…
वाचकांनो माझा लेख लिहिण्याचा उद्देश फक्त माझे विचार तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आहे… त्यातून जर खरंच बदल घडत असेल तर मला फारच आनंद होईल…  तुम्हाला माझा लेख आवडल्यास like करा… तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे मी… नकारात्मक प्रतिक्रियेच  सहर्ष स्वागत आहे…  माझे लेख ?वाचण्यासाठी? मला फॉलो करा.. व आवडल्यास माझ्या नावासकट शेअर करा… सर्वांचे मनापासून आभार….. ?©जयश्री कन्हेरे -सातपुते ?

फोटो साभार गुगल 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत