सिक्रेट नसलेलं सिक्रेट!!

Written by

सौरभने नवीन स्पोर्टशूजसाठी हट्ट धरला,ऋचानेही पुरवला हट्ट कारण जॉब,घर त्यात तिला वेळ नव्हता त्याच्यासाठी,त्याच्या फुटबॉल मॅच बघण्यासाठी. आज त्याला सरप्राईज म्हणून धडकली ती शाळेत, बघते तर सौरभ टीममधे नव्हता,मॅच जिंकली तसा एक मुलगा धावत आला आणि म्हणाला”थँक्स यार सौरभ,तुझ्यामुळे खेळू शकलो आणि जिंकलो,आईला काम नाही सध्या तर पैसे नव्हते  शूजसाठी “! ऋचा गुपचूप सगळं ऐकून टीचर रूममधे गेली..सरांनी सौरभचे कौतुक केलं आणि अनिकेतच्या बिकट परिस्थितीची कल्पना दिली..सौरभ खोटं जरूर बोलला पण त्यामागे हेतू शुद्ध होता म्हणून ऋचाला मुलाचा अभिमान वाटला.सौरभला बोलवलं सरांनी..आईला बघून सौरभला धडकी भरली पण सरांनी डोळ्यांनी खुणावले जणू'”तुझं सिक्रेट माझ्याकडे सुरक्षित आहे हं!” तसा त्याचा चेहरा खुलला.

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत