सिनरी रांगोळी काढण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत

Written by

सर्वजण उत्सुक आहात ना आपली पहिली सिनरी काढण्यासाठी?

मग निश्चिन्त व्हा, रांगोळी पाहिल्यावर तुमचे मिस्टर आणि मुलं अवाक होणार आहेत, त्यांचे एक्सप्रेशन पाहायला तयार राहा ???

आजच्या रांगोळी साठी हे साहित्य जमा करून ठेवा.

रंग: लाल, पांढरा, हिरवा, पोपटी, पिवळा, चॉकलेटी (optional), केशरी

इतर: गाळणी, खराब फडकं आणि फ़ोटो काढायला मोबाईल ?

सर्वप्रथम एक आकार निश्चित करून घ्या, त्यात खालीलप्रमाणे outline काढा, कुठल्याही रंगाने.

आता आपण पाहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे गवताला शेडिंग देणार आहोत. तीन पट्टे आखा. आणि त्यात हिरवा, पोपटी आणि पिवळा रंग देऊन शेडिंग करा, शेडिंग साठी पहिला भाग वाचा.

आत मधल्या पाण्याला रंग द्यायचा आहे, त्याचे खालीलप्रमाणे 5 भाग करा.

शेवटच्या 2 भागात डार्क निळा, शेवटून दुसऱ्या 2 भागात आकाशी आणि मधल्या भागात आकाशी व पांढरा मिक्स करून देणे आणि शेवटी शेडिंग करणे. (फोटो मध्ये लाईट मुळे रंग वेगळी दिसू शकतात)

आता गाळणीत फक्त पांढरा रंग घ्या, आणि मधल्या भागात गाळणी उंच धरून हलक्या हातांनी रंग पाडा.. पाण्याचा वर केशरी आणि पिवळ्या रंगाची शेडिंग द्या.

सुंदर दिसतंय ना? थांबा अजून अर्धे काम बाकी आहे…

खाली हिरव्या रंगावर पिवळ्या रंगाने गवत दाखवा..त्यावर फुलं काढा, पिवळ्या भागावर हिरव्या रंगाने गवत काढा…ज्यामुळे गवत आणि पाणी जिथे वेगळे दिसताय तो भाग झाकला जाईल.

पांढऱ्या, गुलाबी अथवा लाल रंगाची फुलं काढा..

आता पाण्यात कमळ आणि बदक दाखवा..

पाणी आणि आकाश जिथे वेगळं होतंय तिथे हिरव्या रंगाचे डोंगर दाखवा आणि पिवळ्या रंगाने त्याला बॉर्डर द्या.

आता नारळाच्या झाडांची outline काढून घ्या..यासाठी चॉकलेटी किंवा लाल आणि डार्क हिरवा रंग मिक्स करून तो वापरा.

त्यावर हिरव्या रंगाचे पानं काढा, पानं काढतांना एकमेकांवर दाट अश्या रेषा द्या, म्हणजे एक रेष सुद्धा वेगळी दिसायला नको, सलग एक पान दिसायला हवे.

सूर्य, पक्षी दाखवा, त्यांची सावली खाली पाण्यात एकदम हलक्या हाताने काढा

आता शेवटची आणि महत्वाची गोष्ट, रांगोळीच्या चारही बाजू कपड्याने पुसून एक आकार द्या

झाली आपली रांगोळी तयार…!!!

त्याची सुरक्षा करा, कारण पाहण्याऱ्याला रांगोळी एक पोस्टर वाटून तो उचलायला जातो आणि रांगोळी पुसली जाते ?

तुम्ही वरील रांगोळी try केली की मला कंमेंटमध्ये फोटो नक्की पाठवा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्री ला ही रांगोळी यावी अशी माझी इच्छा आहे, म्हणून हा लेख जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचवा..शेयर करा..

पुढील रांगोळी ची वाट बघताय ना? मला फॉलो करा म्हणजे मी लवकर तूमच्यापर्यंत पोहोचेल.

आणि हो, खाली ❤ बटण आहे ते क्लिक करायला विसरू नका ???

तुम्ही माझ्या फेसबुक पेज ला भेट देऊ शकता

https://m.facebook.com/SanjanaRangolis/?ref=bookmarks

 

Article Tags:
·
Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा