सुंदर ते ध्यान मनी वसले

Written by

#सुंदर_ते ध्यान_मनी_वसले
©सरिता सावंत
आज ती प्रचंड थकलेली. प्रसन्न सकाळ झाली तरी तिचा चेहरा कोमेजलेला. रोजही कामाचा ताण असतोच तिला. घरचं सगळ आवरा,सकाळी लवकर उठून सगळ्यांचा नाश्ता, पिटुकल्याच खाणं, त्याचे नखरे झेलणे, त्याला झोपवणे, सगळ्यांच जेवण अशी न संपणारी यादीच असते तिच्यासमोर.
आज तिचं पिटुकल जरा आजारी होत….त्यामुळे रात्रभर ना तिची झोप झाली ना पिटुकल्याची. पिटुकल सकाळी झोपी गेलं पण तिचा दिवस सुरू झाला ना… रात्रभर जागरण आणि पिटुकल्याची तब्येत याने जरा काळजीतच होती ती त्यात समोर कामाचा डोंगर….मग चिडचिड होणारच. त्यात काय ते डोकेदुखीने डोकं वर काढलं….कुठून कशी सुरुवात करू तिला समजत नव्हतं….तेवढ्यात तिचा ‘तो’ म्हणाला तू बस आज माझ्या हातचा नाश्ता खाऊन बघ……डोळे विस्फारले खरे..पण त्याच्या हातचा नाश्ता तिला जास्तच गोड लागला.
रोज स्वतःच्या हाताच कसतरी घाईत खाऊन जीभ बेचवच झालेली पण आज त्याच्या मायेची,काळजीची,प्रेमाची साखर जरा जास्तच पडलेली नाश्त्यात?.
थोडंस काय ते नाश्ता पासून तरी सुटका….पुन्हा जेवणाने हाक मारली…ते झालंच की पिटुकल्याचा आवाज….त्याचे नखरे परत झेलत पोटात कावळे ओरडायला लागले…..पण पिटुकल्याला तर झोप आलेली…आता आपल्याला जेवणही हातात कोण आणून देणार अस म्हणून पिटुकल्याला झोपवायची तयारी सुरू….तो झोपतोयच की जेवणाच ताट समोर?….परत डोळे विस्फारले…. जादू आहे का म्हणून परत बघावं तर “तो” ताट हातात घेऊन उभा?….आज स्वतःनेच बनवलेलं जेवण पण त्याच्या हाताने वाढते चार घास गेले….जरा आरामाचा विचार डोक्यात घोळत होता तोच पिटुकल्याचा गोंधळ कानी आला…त्याला घ्यावं तोच “तो” म्हणतो तू आराम कर मी सांभाळतो तोपर्यंत??…
असा तिचा “तो” म्हणजे तिचा नवरोबा उर्फ तिचं “ध्यान”.
न बोलता नजरेने समजून घेणारा आणि जाणवूनही न देणारा…प्रेम नाही म्हणत म्हणत प्रेम करणारा… त्याला बघून आज ती म्हणते “सुंदर ते ध्यान मनी वसले”.

असंच थोडंस सुचलेलं… स्वानुभवावरून?
लेेेख लेेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास काहीीच हरकत नाही.

©सरिता सावंत

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत