सुखी ठेव तिला. . .

Written by

लेक सासरी जायची वेळ झाली होती…. वडिलांचे डोळे भरुन आले होते,  मनात अनेक प्रश्न उभे होते …. लेकीचं कसं होईल? शिक्षण झालं आणि लगेच लग्न करून दिलं होत..  त्यामुळे घरातली कामंही जेमतेम जमत होती..  वडिलांना राहावले नाही… त्यांना वाटले जावयाला भेटुन सांगावे कि आमच्या लेकीला आम्ही खुप लाडात वाढवले आहे तिला कश्याचीही कमी पडु देउ नका,  चुक झाली तर सांभाळुन घ्या,   तिला जीव लावा, पोर लहान आहे अजुन समज नाही कशाची.  लेकीच्या काळजीने वडिल हळवे झाले होते, जावयाला आवाज देणार तोच समोर पत्नी तिच्या वडिलांसोबत दिसली आणि आपल्या लग्नातील हात जोडुन उभे असलेले तिचे वडिल आठवले आणि का कुणास ठावुक ओठावर आलेले शब्द तसेच विरुन गेले. काहीही न बोलता लेकीला फक्त अश्रूंनी निरोप दिला. . .

कदाचीत सगळ्या वडिलांना हेच सांगायच असतं पण नवर्‍याच्या अहंकारा समोर वडिलांची माया कमी पडली होती. . . आणि एका मुलिच्या बापाचा खरा प्रवास सुरु झाला होता. . . आणि मनात एकच इच्छा होती. . . देवा. . . सुखी ठेव माझ्या काळजाच्या तुकड्याला

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत