सुपरहिरो शिवम

Written by

शिवम खूप गुणी मुलगा होता. तो इयत्ता चौथीत शिकत होता. सगळ्यांचा खूप लाडका. आईचे सर्व काम ऐकायचा. सकाळी लवकर उठायचा, स्वतःचे अंथरून स्वतः घडी करून अगदी जागेवर ठेवायचा. मग ब्रश करून अंघोळ करायचा. आईला पाणी भरण्यात मदत करायचा. स्वतःची आणि त्याच्या छोट्या बहिणीची म्हणजे स्पृहाची तैयारी करून शाळेत जायचा तिला आधी तो तिच्या वर्गात सोडायचा आणि मग स्वतःच्या वर्गात जायचा. येतानाही तो तिला सोबतच घेऊन यायचा. आल्यावर हात पाय धुवून स्वतःचे कपडे जागेवर व्यवस्थित घडी करून ठेवायचा. रात्री पप्पा आले की त्यांना पाणी द्यायचा. त्यांच्याशी गप्पा मारायचा. त्याच बघून त्याची स्पृहा देखील त्याच्यासारखीच वागायची. एक दिवशी असच शाळा सुटल्यावर जेव्हा शिवम स्पृहाच्या वर्गात आणायला गेला तेव्हा ती तिथे नव्हती. तो तसाच धावत शाळेच्या गेटजवळ आला तेव्हा तिथे एक काका तिच्याशी गप्पा मारत बसलेले. शिवमला आईने दिलेल्या सूचना आठवल्या कोणीही अनोळखी व्यक्ती आपल्याला दिसली तर तिच्याशी बोलायचं नाही आणि तिने काहीही दिलेलं घ्यायच देखील नाही. ते लोक मुलांना फसवून कुठेही नेतात. आणि खूप मार देतात. डोळे काढतात. भीक मागायला लावतात. शिवमला काय करावं ते सुचत नव्हतं. स्पृहा त्यांचा हात पकडून चालू लागली. शिवम किंचाळतच पुढे गेला. वाचवा वाचवा म्हणून शिवम मोठ्याने ओरडू लागला. शिक्षकसुद्धा त्याच्या मागे पळू लागले. शिवमने पटकन पळत जाऊन स्पृहाचा हात पकडला. इथून आपल्याला आता आपली सुटका नाही हे जेव्हा त्या चोराच्या लक्षात आले तेव्हा तो पळू लागला. पण शिवमच्या आरडाओरडा केल्याने खूप माणस जमा झाली. शिवमने सगळ्यांना सांगितल की हा माणूस माझ्या बहिणीला कुठे तरी घेऊन चालेल. सगळ्यांनी मिळून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा त्यात असे देखील समजले की त्याने अश्या खूप साऱ्या मुलांना पळवले होते. खूप साऱ्या मुलांची शिवममुळे सुटका झाली. त्या सगळ्यांच्या आई वडिलांंनी शिवमचे आभार मानले. पोलिसांनी आणि शाळेने शिवमचा सत्कार केला.
जर शिवमने आरडाओरडा केलाच नसता तर आता त्याची बहीण त्याच्याजवळच नसती. कोणत्याही गोष्टीला घाबरून जायचं नाही. जिथे आपली शक्ती कामी येत नाही तिथे आपली युक्ती नक्कीच कामी येते.

#गोष्टी
#बालकथा
#लहानमुलांच्या गोष्टी

©भावना विनेश भूतल

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत