सुषमा स्वराज : धगधगत्या रणरागिणीचा अस्त…!!

Written by

?सुषमा स्वराज : धगधगत्या रणरागिणीचा अस्त….!!

यशस्वी राजकारणी , उत्तम संसदपटू , कुशल प्रशासक असा अलौकिक त्रिवेणी संगम असलेल्या सुषमा स्वराज ह्या पेशाने वकील होत्या .भारतीय जनता पक्षाच्या त्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या.अनेक दिग्गज नेत्यांना साथ देताना भाजपमध्ये त्यांनी कतृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता.सडेतोड भाषाशैली , अमोघ वाणी , राजकिय मुत्सदीपणा याव्दारे त्यांनी राजकारणाच्या व्यासपीठावर आपली मोहर उमटवली होती.सात वेळा खासदार , तीन वेळा आमदार अशी त्यांची कारकिर्द होती .राज्य आणि केंद्रिय मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सुषमाजीनी यशस्वीरित्या सांभाळल्या होत्या .
सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियानातील अंबाला कॕटोन्मेटमध्ये झाला.हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी यांच्या त्या कन्या .त्यांचे वडील हरदेव हे संघाचे कार्यकर्ते होते.अंबाल्यातील सनातन महाविद्यालयात सुषमाजींचे शिक्षण झाले.नंतर त्यांनी चंदीगडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.१९७३ पासुन सर्वाच्च न्यायालयात वकील म्हणून काम सुरु केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमांतुन सुषमाजींनी राजकिय सुरवात केली.त्यांचे पती स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडीस यांचे निकटवर्ती होते.१९७७ ते १९८२ व १९८७ ते १९९० या काळात सुषमा स्वराज या हरियाना विधानसभेच्या आमदार होत्या . १९७७ मध्ये हरियानात त्या २५ व्या वर्षी मंत्री झाल्या .एवढया लहान वयात मंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्या २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ या काळात त्यासृ परराष्टमंत्री होत्या .इंदीरा गांधी नंतर या पदावर विराजमान होणार्या केवळ दुसऱ्या महिला होत.
सदैव पसन्न चेहरा , सोभाग्याच लेण आसलेली कपाळावरील मोठी टिकली , भांगेत उठून दिसणारे कुंकू , परिटघडीची सुंदर साडी , त्यावर हाफ जॕकेट किंवा शाल हा घरंदाज पेहराव असलेल्या सुषमाजींची प्रतिमा आणि प्रतीभा वेगळीच होती.आपल्या ओजस्वी वाणीने राजकिय जीवन सदाबहार करणाऱ्या या भाजपच्या रणरागिणीला विनम्र अभिवादनासह भावपुर्ण श्रद्धांजली …!!

नांव होत सुषमा …
अगाध हि महिमा..
वाणीला हा प्रणाम…
सरस्वतीला या सलाम….

????????

—-✍नामदेव पाटील .

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा