सेलिब्रेशन

Written by

#सेलिब्रेशन?

©स्वप्ना मुळे(मायी)

आज परत अजयकडे बोलवलं आहे ग आपल्याला भजे पार्टीचा प्लॅन आहे,…यंदा कोणत्या वस्तूच सेलिब्रेशन ते काही सांगितलं नाही त्याने,… तू येताना तिकडेच उतर मी पण ऑफिसातून पोहोचेल तिकडेच,…असं म्हणत सुजय ऑफिसला निघूनही गेला,…
रितू घाईत होती त्यामुळे ती काही बोलली नाही आणि ती पण कुलूप लावून निघाली ,…ड्रायव्हर तयारच होता गाडी काढून,…ती गाडीत बसली आणि तिला अजयची परिस्थिती डोळ्यासमोर आली,… अजय सुजयचा बाल मित्र ,…अजयच लग्न आपल्यासोबत त्याच वर्षी झालं होतं,..घर किरायचं,… घरात अगदी मोजक्या वस्तू,…आपला आलिशान फ्लॅट,…उंची सामान, गाडी ,नोकऱ्या ह्यात कुठंच न बसणार हे कुटुंब पण किती आनंदी असतं,… आणि त्या आनंदी क्षणाचे सोहळे करून क्षण अगदी आठवणीत राहतील असे साजरा देखील करतं सतत सेलिब्रेशन करून,.. अगदी सुरवातीला मिक्सर घेतला तर केलेली अप्पे पार्टी,…मग वर्षभराने फ्रिज घेतला म्हणून केलेली आईसक्रीम पार्टी,…टू व्हिलरची कॉफी पार्टी ,…अगदी जगण्याचं सेलिब्रेशन करतात,…सगळ्या वस्तू नाहीत याची खंत नाही ,..उलट मजा येते म्हणे एखादी नविन वस्तू घ्यायची असली की करायची पैश्याची जमवा जमव मग त्यातली कलर चॉइस, मग ती घरात अणे पर्यंतची धावपळ आणि मग हे सेलिब्रेशन,..दोघेही मस्त एन्जॉय करतात कारण दोघेही तेवढेच समाधानी,…कधीच वखवखपणा नाही,..नसल्याबाबत कुरकुर नाही,…सतत आनंदी,…
या उलट आपलं झालंय आपण लग्ना आधीच किती अटी घालून बसलो होतो,…मुलगा वेल सेटल,…घरदार,…गाडी,…पैसा, अडका,…मग अगदी तसंच तोडीस तोड ठिकाण येईपर्यंत थांबलो पण होतो,…. खरंतर आजी म्हणायची,…”अग कशाला ग वेल सेटल नवरा शोधते,…उलट अपूर्णतेची मजाच वेगळी,…चिमुकला संसार दोघांनी कष्टाने,प्रेमाने फुलवायचा,..काटकसरीने संसार करत सजवायचा,…मग त्या वस्तुंना सुद्धा फार महत्व राहतं संसारात,….आपल्या कष्टाने आवडी निवडीने सजलेलं घर बघण्यात एक वेगळंच सुख असतं,…..”
तिला वाटलं आपल्याला आजीच म्हणणं आज अजयचा संसार बघून पटत,…आपण हे सगळं मिस करतो कारण आपण ठरवलेल्या अटी नुसार सगळं रेडी होतं फक्त येऊन रहायच होतं,… कशाची कमी नाही त्यामुळे अशी छोट्या छोट्या वस्तूंची खरेदी सेलिब्रेशन असं आपल्याला मिळालंच नाही,…ड्रायव्हरच्या हाकेने ती विचारातून बाहेर आली,…ऑफिस सुटल्यावर अजयकडे गेली मस्त गरम भजे,चहा सुदंर मैफिल जमली,…
सुजयने विचारलं अरे हे सेलिब्रेशन आता कोणत्या वस्तूसाठी त्यावर अजय म्हणाला,”आता घरातील वस्तूंचं अपूर्णत्व सम्पलं आहे रे,…आवश्यक ते आलं आहे घरात आता हा वॉटर फिल्टर आम्ही समोर एक अनाथालय आहे त्यासाठी घेतलाय,…समाजच आपण देणं लागतो ना,…आपल्याला मिळतंय त्यातून काटकसर करून असं गरजूंच्या उपयोगी पडलं की हे सेलिब्रेशन अजून सुंदर वाटतं,..”

अजयच्या बोलण्याने रितूला एकदम काहीतरी गवसल्यासारखं झालं,…आणि असे सेलिब्रेशन मग तिच्याही घरात नेहमीच व्हायला लागले?….
एक नविन विचार समाजासाठी कथेतून मांडण्याचा प्रयत्न कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा,..धन्यवाद..
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद….

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा