सैनिकी प्रेम 

Written by
  • 2 महिने ago

सैनिकी प्रेम

प्रेम केले तुझ्यावर झाले तुझी साउली,
आले तुझ्या घरी हळदीच्या पाऊली.

जग विसरून,  रंगले तुझ्या रंगी,
ओंजळ भरून फुले सांडली तुझ्या अंगणी.

वचनात तू बांधील होतास मातृभूमीच्या,
म्हणुनी देह ठेवला कुशीत रणांगणाच्या.

आजही तेच प्रेम आहे तुझ्यावर,
कारण मातृभूमीसाठी देह ठेवलास तू सरणावर.

देश नेहमी पहिला,
आणि प्रेम -त्याग दुय्यम मानेन.

माझ्या शब्दाला मी ही जागेनं,
आपल्या वंशालाही देशासाठी पाठवेन.
त्यालाही देशासाठी पाठवेन….

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा