सॉरी बाळा……..

Written by

आज नेहाने   एक  गोष्ट  नक्की ठरवली की काहीही झाले तरी यापुढे परत ही चूक करायची नाही ..इतरांचा राग बाळावर काढायचा नाही …असंच होत रोज आपण सगळयाना खुश ठेवन्यासाठी खूप प्रयन्त करतो …. कधी कधी अगदी मनाविरुद्ध वागतो .. आणि शेवटी राग माञ हक्काच्या बाळावर निघतो ..

असंच झालं होत आज . सकाळी उठायला थोडा उशीर झाला ..आणि दिवसाचे सगळे गणितच बदललं .. स्वयंपाक करुन स्वतःची तयारी करेपर्यंत घरीच पाच  मिनीट उशीर झाला ..मग अर्थातच late mark मिळाला ..

ऑफिस मध्ये कामही ईतक होतं कि दिवसभर साधी मान वर करायला सुद्धा वेळ मिळाला नाही ..

ती  घरी आली .. तशी तिची लाडकी लेक पिहू पळत आली… आई तू आली ..मी कधीची तुझी वाट बघतेय अग .. चलं ना आपण आता खेळू …तिला पाहून  खरंच खुप बर वाटलं ..  दिवसभराचा थकवा जसा पळून गेला … असं वाटलं फक्त तिला कुशीत घेऊन निवांत बसावं … अगदी शांत … काहीही करू नये …

पण घरातली सर्व  कामे वाट पाहात होती … स्वयंपाक केला .. सर्वांची  जेवणं  झाली  ..

जेवणं झाल्यानंतर सगळी आवराआवर झाली तेव्हा ती प्रचंड थकल्यासारखी झाली …

अंथरूण  टाकत असताना पिहू आई  आई करत पळत पळत आली  आणि खाली पडलेल्या तिच्याच टेडीवरुन पाय घसरून पडली …आणि जोरात रडू लागली …

तिचे रडणे ऐकून नेहा उठली … तिला उचलून घेतलं … आणि “नीट खेळता येत नाही का गं”?  .. असं म्हणत एक जोरदार दणका तिच्या पाठीत दिला …

पिहूने अनपेक्षितपणे आई कडे पाहिलं … पडल्यापेक्षा माराचेच तिला जास्त वाईट वाटले …नेहाने तिला गादीवर टाकले …

पिहू रडत रडत तशीच झोपून गेली …

नेहाला मात्र झोप लागेना .. तीला वाटलं आपण दिवसभर एवढी पळपळ करतॊ …अगदी मनाविरूध झालं तरी मागे टाकतो .. मग या हक्काच्या बाळा वरच का आपला सगळा  राग निघाला ?

उलट वयाच्या मानाने पिहू   किती समजून घेते … बऱ्याचदा तिच्या शाळेत काहीतरी कार्यक्रम असतो आणी नेमक तेव्हाच ऑफिसचे महत्वाचे कामं असते … इच्छा  असूनही तिथे जाता येतं नाही .. तरिही फक्त एका चॉकलेट वर सगळा राग पळवला जातो …

पिहू खुप आजारी असते .. तिला सोडून कुठेही जाऊ नये असे अगदी मनापासून वाटतं असते मात्र  नेमकी तेव्हाच ऑफिस मध्ये महत्त्वाची मीटिंग असते ..दिवसभर कितीही फोनवरून विचारपूस केली तरी तो दिवस आपल्या लेकीनं आई शिवायच काढलेला असतो …ती  जरी फार कुरकुरली नाही तरी आपल्या मनातला सल जात नाही …

खरंचं आपल्या  मोठया चुका अगदी सहज  स्वीकारल्या जातात …एवढ्या कमी वयात कुठून येते ही maturity या आपल्या  लहानग्यामध्ये ….

पिहूचा रडवेला चेहरा तिला आठवला … तिला ऊठवून लगेचं तिची माफी मागावी … तिला sorry म्हणून मन थोडं तरी हलकं होईल असं वाटलं …

पिहूच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून ती मनोमन म्हणाली बाळा मला माफ कर …

आणि आता तिने मनाशी पक्क ठरवलं की उगाचच वड्याचं तेल वांग्यावर काढायचं नाही … दिवस भरं आपलं पिल्लू आपल्या शिवाय घरी राहत त्या मुळे आल्या नंतर तिला पूर्ण वेळ द्यायचा जेणेकरून तो quality time राहील … ऑफिसचे  टेंशन , घराबाहेरचं ठेवून घरी यायचं … आणि सगळ्यात महत्वाचे  बाळाला गृहीत धरायचे नाही ..

अशा या सुंदर उद्याची स्वप्नं रंगवताना कधी झोप लागली ते तिचं तिलाचं समजलं नाही …

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत