सोवळ सासूबाईंच !!!

Written by

सोवळ सासूबाईंच !!!

राधा नवीनच लग्न करून सासरी आली… साधीसरळ अंगकाठी… सावळी असली तरी दिसायला सुंदर होती. लग्नाला महिनाच झाला होता… आणि राधाला पाळी आली… सासूबाईंनी डोक्यावर हात मारून घेतला … अगंबाई झालीस… राधाला काही कळले नाही नक्की आई अस का म्हणाल्या…. पुढच्याच क्षणाला सासूबाईंनी फर्मान काढले… लांब ऊभी रहा सांगते ते ऐक….

1. मोकळी होईपर्यंत कुठेही हात लावू नकोस..
2. किचनकडे जायच नाही…
3. खासकरून कोणालाही शिवायचे नाही..
4. तुला काही लागले तर मी देईन….
5. तुझ अंथरुण पांघरूण वेगळ ठेवायच चार दिवस….
6. सगळ संपल्यानंतर तुझ सगळ अंथरूण धुवून घ्यायच..
7. सगळ्यात शेवटी सगळ घर पाण्याने धुऊन काडायच…
8. आणि हो तुझे पॅड का काय ते घरातल्या कचऱ्याचा डब्यात टाकायचे नाही, ते तु परस्पर बाहेर फेकून द्यायचे, मला त्रास होतो यासर्वाचा…..

राधाने फक्त होकारार्थी मान डोलावली, नविनच लग्न झालं होतं, अजून घरात बरच काही शिकायच बाकी होत. असेल घरात कट्टर सोहळ…. म्हणून ती काहीच बोलली नाही.
राधाच्या माहेरी अस कसलच बंधन नव्हत .. राधा जास्त शिकलेली नव्हती पण योग्य – अयोग्य, श्रद्धा -अंधश्रद्धा यातला फरक तिला कळत होता….. तिचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता पण विरोध कसा करायचा???
याघरात हे वर्षानुवर्षे चालत आलेल असणार… अस म्हणून ती गप्प राहिली….

एकूण एक गोष्ट हातात मिळत होती पण देणाऱ्याच्या सोईनूसार, म्हणजे जर प्यायला पाणी हव असेल तर ते लगेचच मिळेल अस नाही… त्याला निदान दोन तीनदा तरी सांगाव लागणार… आणि नेहमी अस्पृश्यतेची वागणूक….

त्यांचे घर म्हणजे वनरुम किचन होत ते… लग्न झाल्यापासून हे नवीन जोडप किचनमध्ये झोपायच… पण आता राधाला किचनमध्ये जाण्यास मज्जाव होता… बर सासूबाईंनी सांगितले कुठेच शिवायच नाही एका कोपऱ्यात बसून राहायच… तिच्या त्या दिवसांत आणि झोपायचही तिथेच… आता गावच्या सारखी स्वतंत्र खोली मिळण इथे तरी कठिण होत…. बर यात गंमत म्हणजे तिच्या त्या दिवसांत सासूबाई फक्त स्वयंपाक करायच्या, बाकी भांडी घासणे, कपडे धुवून ते वाळत घालणे हे सगळं तर राधालाच करायला लागत असे….राधा मनोमन विचार करयची जर मी या दिवसात स्पर्श केलेली एकही गोष्ट चालत नाही तर घासलेली भांडी आणि कपडे धुतलेले कसे चालतात…. बर आणि हिला पाळी आलीये हे अख्या चाळीत कळायचे सासूबाईंच्या या वागण्यामुळे….

अस करता करता सहा महिने गेले, राधाला हे सगळं पचनी पडत नव्हत पण तिचा नाईलाज होता… एके दिवशी मोठी नणंद घरी आली माहेरपणाला छान दहा दिवस राहिली… या दहा दिवसांत नेमकी तिलाही पाळी आली…. पण आता वातावरण वेगळ होत कारण ती एकही नियम पाळत नव्हती…. राधाने त्याबाबत विचारणा केली तर ती चक्क जोरजोरात हसायला लागली, म्हणाली अग हे काय नवीन अस आपल्या घरी काही नाही…. राधाला आश्चर्य वाटलं…. तिने थेट सासूबाईंना विचारल तर त्या म्हणाल्या, नाही नाही ताईच चालत तुझ मला चालणार नाही … तु हे नियम पाळायचेच…… ताई माझी मुलगी आहे… आपल्याच मुलीचा चालत तु किती केल तरी बाहेरची…..

राधाच्या नंणदे सुद्धा स्वतःच्या आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही….. राधाला खूप वाईट वाटले आणि रागही खूप आला पण काय करणार त्यांच्या हट्टापूढे कोणाच काही चालत नसे….. याविषयावरून मग हळूहळू वाद वाढायला लागले.

एक दिवस अचानक सासूबाई चक्कर येऊन पडल्या… .खूप अशक्तपणा आला होता… नुसत्या झोपून असायच्या…. त्याच दरम्यान राधाला परत पाळी आली…. आता काय करायचं???? राधाने विचारले??? सासूबाई लगेच म्हणाल्या आता पूरत कर काही होत नाही, कधीतरी चालत…. याच संधीचा फायदा घेत राधाचा नवरा म्हणाला आई कधीतरी चालत ना मग नेहमीच चालवून घेऊया, तसे सासरेही म्हणाले आता वयोमानानुसार तुला दगदग झेपणार नाही…. इतक्या वर्षात कधी काही झालं नाही आणि सुनेच्या पाळीने त्रास व्हायला लागला तुला…. याच पाळीमूळे स्री परिपूर्ण समजली जाते, आपली वंशावळ तिच पुढे नेते तर ती परकी कशी?? आता ती आपलीच आहे…. माझ्या आईने म्हणजे तुझ्या सासूने अडाणी असून कधी तुझ्यात फरक नाही केला आणि तु तर शिकलेली आहेस तरीही असा विचार करतेस….

राधाच्या सासूबाईंना तेवढ्यापूरत पटल…. राधाला खूप समाधान वाटले की चला आतातरी आपल्याला हडतुड होणार नाही….. पण बर झाल्यावर सासूबाई जैसे थे अशीच परिस्थिती….

आता राधाच्या लग्नाला चार वर्ष झाली, तीला एक गोंडस मुलगी आहे…. सासूबाई वयोमानानुसार थकल्या आहेत आता राधाच्या त्या दिवसांत सासूबाई एका कोपऱ्यात बसून असतात, राधाने शिवलेल त्यांना अजूनही चालत नाही पण तिने केलेला स्वयंपाक चालतो……

समाप्त…..

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि मला follow करायला विसरू नका.)

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत