सौंदर्य

Written by

तू म्हणालास खूप सुंदर दिसतेस

मोहक डोळयांनी सारं काही बोलतेस

चेहरा रूपवान तुझा तरी

भाळलो मी मनाच्या सौंदर्यावर

साथ तुझी कधी ना सोडणार

हात हातीचा कधी ना सुटणार

 

मी ही हुरळून म्हणाले

माझ्याहून तुला मन माझे भाळले

हे ऐकूनच तुझ्या प्रेमात पडले

गुलाबी प्रेम आता बहरू लागले

नवनवीन स्वप्नं सजू लागले

 

तुझ्यावरच्या प्रेमाने कोणा तिसऱ्याचं मन दुखावलं

त्याची नाही तर कोणाचीच नाही हे त्याने ठरवलं

विध्वंसक विचाराने तो उठला

त्याचा आवडता चेहराच ॲसिडने पेटवला

षंढ लोकं उघड्या डोळ्याने बघत राहिली

मी त्याच्या सूडाच्या आगीत जळत राहिली

 

समाजमान्य सौंदर्य त्याने हिरावलं

मनाचं सौंदर्य तू नाकारलं

विद्रुप चेहरा पाहून तू पळ काढला

आधाराचा हात हातातून निसटला

माझा मार्ग एकलाच सुरू झाला

 

चेहराच संपला होता पण मन जिवंत होत

आत्मतेज माझं जग उजळवीत होत

रणरागिणी,दुर्गा बनून मीच जिंकले

शापित सौंदर्याहून आत्मिक सौंदर्यच

श्रेष्ठ ठरले

©सरीता सावंत भोसले

 

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.